Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी भारतीय पत्रकार पत्रकार संघाच्या बैठकीत येथील पत्रकार , छायाचित्रकार शाह एजाज़ गुलाब यांना भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सचिव पदी निवड़ करून नियुक्ती पत्र देण्यात आले भारतीय पत्रकार संघ(-खग) असोसिएशन ऑफ़ इंडियन जर्नलिसट्स राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सईद शेख,महाराष्ट्र राष्ट्रीय सचिव व गोवा प्रभारी जयपाल पाटील, राष्ट्रीय संघटन सचिव रविन्द्र नेरकर, यांच्या अनुमतीने व महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र उत्तम गर्दे, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, महाराष्ट्र मुख्य सचिव विवेक देशपांडे, यांच्या आदेशाने पत्रकार , छायाचित्रकार शाह एजाज़ गुलाब यांची भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड़ करण्यात आली . यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी राज्यात गुटखाबंदी असतांनासुद्धा मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटका विक्री होत आहे.तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ १३ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास बर्‍हाणपूरकडून मुक्ताईनगकडे येत असलेल्या चारचाकी वाहनांमध्ये लाखो रुपयाचा गुटका पकडण्यात आल्याची चर्चा होती.या संदर्भात पोलिसात मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान महाराष्ट्राची सीमा असलेल्या इच्छापूर मध्यप्रदेशकडून महाराष्ट्राकडे एका चार चाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गुटका वाहून नेत असल्याच्या माहितीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ सदर वाहनाची तपासणी केली.तपासणी दरम्यान या वाहनांमध्ये लाखो रुपयांचा गुटका असल्याचे आढळून आल्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठी भाषा संवर्धनाचे काम प्रमाणभाषेइतकेच बोलीभाषाही करीत असतात. बोली, प्रमाण आणि प्रशासकीय तसेच साहित्याची भाषा या सर्वच दृष्टीने मराठी भाषेला समृद्ध करण्याची परंपरा खूप जुनीच आहे. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होऊन तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सत्यशोधकी साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ शाखा यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन आज झाले, त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रम आज दुपारी चारला येथील…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी शहरासह तालुक्यात वाळूची वाहतूक आतापर्यंत रात्रीच्या वेळेस सुरू होती परंतु गेल्या आठ दिवसापासून वाळू माफिया सर्रासपणे दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. १२ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ या महामार्गावर बोदवड चौफुलीजवळ दुपारी बारा वाजता ट्रॅक्टर नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेले होतेे.याविषयी स्थानिक पत्रकारांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार श्वेता संचेती यांना शहरात होत असलेल्या दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक माहिती देत नादुरुस्त बंद पडलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरचा फोटो दाखवला व तात्काळ त्या ठिकाणी जाऊन महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली परंतु मंगळवारी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कामांमध्ये ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात मोबाईल चोरणारी टोळी सक्रीय झाली असून मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत मात्र पोलीस यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे चित्र दिसत आहे. मू.जे. महाविद्यालयाच्या पाठीमागे पायी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या हातातून दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन मोबाईल लांबविल्याची घटना काल सायंकाळी घडली. दुसर्‍या घटनेत काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी दरम्यान शतपावली करणार्‍या विवाहितेच्या हातातून दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला. रामानंदनगर पोलिस स्टेशनला दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मानव छोटुलाला पाटील (वय १८) रा. गुलमोहर कॉलनी जळगाव हा बारावीचा विद्यार्थी काल सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मू.जे. महाविद्यालयाच्या पाठीमागे गणपती मंदिराजवळ…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यात २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या ५२ गावातील शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने न्याय मिळवून देण्यात यश मिळत असल्याचे समाधान असून आता पुन्हा लाभापासून वंचित जुलै ते ऑगस्ट २०१९ मधील बाधित १५ गावांतील शेतकर्‍यांना पीक कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा करून २ कोटी ४७ लाख ६३ हजार निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर आणि यावल या दोनच तालुक्यांना हा लाभ मिळाला असून या गावातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीक कर्जापोटी एक हेक्टर मर्यादेपर्यंत कर्जाची रक्कम आणि ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत संपूर्ण व्याज शासन माफ करणार आहे. कर्जमाफीबाबत शासन आदेश नुकतेच प्राप्त…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अंजोर प्रकाशन,औरंगाबादच्या वतीने खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या १४० व्या जयंतीवर्षानिमित्त ‘गारुड’ हा हस्तलिखित डिजिटल विशेषांक काढण्यात आला असून वाचकांना त्याचे पीडीएफ व्हाँट्सअँपवर ९०४९६७९७९० या मोबाईल क्रमांकावरून उपलब्ध करून देण्यात येईल.या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा नुकताच झाला.विशेष म्हणजे हा अंक कवयित्री व लेखिका कविता महाजन ह्यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे. प्रा.सुरेखा दंडारे वसेकर व अशोक दंडारे यांनी दीपप्रज्ज्वलन आणि बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.चित्रलेखा मेढेकर यांनी शारदास्तवन तर अंकिता मुळे हिने सरस्वती कौतुकम हे नृत्य सादर केले.त्यानंतर बहिणाबाईंवरील स्वरचित कविता वाचन प्रतिभा धामणे व इतरांनी केले.प्रास्ताविक सुरेखा दंडारे वसेकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बीएचआरप्रकरणात पुण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातील खान्देश मील कॉम्प्लेक्समधील दोन गाळे सील केले होते.या गाळ्यांमध्ये इतर कंपन्यांचे कार्यालय असल्याने १५ जानेवारीपर्यंत गाळ्यांचे सील काढण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये शॉप क्रमांक ४२ आणि ४३ हे पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी सील केले आहे. बीएचआर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे येथून घेऊन हे कार्यालय सील केले होते. यासंदर्भात या ठिकाणी कार्यालय असलेल्या सुरज सुनील झंवर, सालासर ट्रेडिंग कंपनी, दीपक श्रीपतराव शिंदे, सुनील श्यामलाल कलंत्री, युगश्री जयसाई वेअर हाऊस प्रा.लि. श्री साईबाबा कोल्डस्टोरेज, श्री साई मार्केटिंग अ‍ॅण्ड…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गेले जवळपास वर्षभर कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरु आहे.आपल्या देशातही हे संक्रमण भयंकर प्रमाणात फैलावले होते. भारत सरकारने केलेल्या लॉकडाऊन मध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, मनपा कर्मचारी इत्यादी हे कार्यरत होते. त्याचप्रमाणे बँक कर्मचारी सुद्धा पहिल्या दिवसापासून जनतेच्या सेवेत कार्यरत होते.इतर कोरोना योध्दांप्रमाणे बँक कर्मचारीही आपली ग्राहक सेवेचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत होते. दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेने कोरोना काळात दिलेल्या बँकींग सेवेबद्दल बँकेच्या एमजे कॉलेज शाखेचे ग्राहक शैला तुकाराम बिराजदार व तुकाराम श्रीपतराव बिराजदार यांनी एमजे कॉलेज शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बँकेने दिलेल्या सेवेबद्दल सौ. व श्री. बिराजदार यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्याबाबत जिल्हा मऩियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी पोलिस तक्रार दाखल केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहात अपघात झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरुध्द रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शहरातून जात असलेल्या चौपदरी मार्गाबाबत अजिंठा चौक ते इच्छादेवी या दरम्यान होत असलेल्या अपघाताबाबत व त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या २७ जुलै २०१८च्या तपासणी अहवालाप्रमाणे काम होत नाही. यात स्थानिक गरजा, जागेवरील आवश्यकता,सुरक्षा, सर्विस रोड,अस्तित्वात असलेल्या रोड ड्रेनेज,रुंदी करून आवश्यक सेवा, अंडरपास व फुटवेअर ब्रिजचा समावेश असावा तसेच अस्तित्वातील असलेल्या ६० मीटर…

Read More