Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी अमृत योजनेंतर्गत अपार्टमेंटला एकच नळ कनेक्शन देण्याचे धोरण ठरत असताना त्याला आता विरोध सुरू झाला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवक सचिन पाटील यांनी आयुक्तांना निवेदन देऊन प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत सत्ताधारी भाजप, विरोधी पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले आहे. यात एका अपार्टमेंटला एक नळकनेक्शन देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, सत्ताधारी भाजपतूनच याला विरोध सुरू झाला आहे. नगरसेवक सचिन पाटील यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार त्यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. त्यात ३० ते ४० वर्षांपूर्वी नगरपालिका असताना नगररचना विभागाकडून मंजुरी प्राप्त करून बांधकाम केले आहे. त्यावेळच्या नगररचना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डिलर्स असोसिएशनची निवडणूक पारदर्शी पद्धतीने न राबवता आपल्याकडे सत्ता कायम रहावी, या उद्देशाने न्यासाच्या मंजूर घटना व नियमावली विरुद्ध घेतली जात आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व त्यांचे पदाधिकारी हे न्यासाचे लेखा परिक्षण अहवाल मंजुरी पूर्वी दिलेल्या दस्तांमध्ये मोठ्या रकमांचा विनियोग केव्हा, कोठे व कसा केला, याबाबत माहिती देत नाहीत. याविरोधात आपण खंडपीठात आव्हान दिले आहे. तर संघटनेच्या १९ जानेवारीला होणार्‍या सभेतील विषयांवर आपण हरकत घेतल्याची माहिती मेडिकल व्यावसायिक व असोसिएशनचे सदस्य दीपक जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली. मेडिकल संघटनेचे पदाधिकारी सुनील भंगाळे व त्यांच्या कार्यकारी मंडळाचे ४ फेरफार अर्ज धर्मदाय उप आयुक्तांनी फेटाळले आहेत.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार आहे.या लसीकरणानंतरही नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, महानगरपालिकेचे शिवाजीनगर येथील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र,धामणगाव,ता.जळगाव येथे ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून ड्राय रनचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालयात ड्राय रन कोविड १९ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा ड्राय…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात आज शुक्रवारी चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), महापालिकेचे शिवाजीनगरातील डी.बी. जैन हॉस्पिटल, तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सकाळी ८ वाजता या लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर २५ जणांना डमी लसीकरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज सकाळी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना डमी लसीकरणाची सुरूवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण आदींची उपस्थिती होती. ‘ड्राय रन’मध्ये नोंदणी ते दुसरी लस देण्यापर्यंत आठ टप्पे आहेत.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अनेक दशकांपासून स्व. नारायण अप्पा सोनावणे यांच्या प्रेरणेने सुरू असलेली ग्राम पंचायत बिनविरोधची परंपरा याही वर्षी जि.प.चे गटनेते व यावल तालुका काँंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनावणे यांंच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या सहयोगाने अबाधित राखली आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंंचायत काँग्रेसच्या खात्यात बिनविरोध करुन इतिहास रचला आहे. राज्यात काँग्रेसच्या सहभागाने आघाडी सरकार अस्तित्वात असले तरी जिल्ह्यात पक्षाची परिस्थीती अतिशय हलाखीची आहे. अशाही परिस्थितीत एक आमदार, चार जिल्हा परिषद सदस्य , मोजक्या सहकारी संस्था या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्ते, नेते मंडळींनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यात यावल तालुक्यातील वढोदे गाव हे पारंपरिक काँगेस विचारांनी प्रेरित असलेलं जी प गटनेते व काँग्रस…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी अश्विन झाला व त्यांच्या पत्नी निर्मला झाला या दांपत्याने गुजरात विद्यापीठातून गुजराथी व हिंदी भाषेत गांधीजींच्या जीवनावर पीएच.डी केली आहे. त्यांचे दोन्ही संशोधन प्रबंध गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषेत मुद्रित (पुस्तक प्रकाशन) करण्याचे निश्चित असून मराठीतही भाषांतरीत केले जाणार आहे. या दोघं अभ्यासकांनी आपले संशोधनपर प्रबंध भवरलाल जैन यांना अर्पण केले आहेत. झाला दांपत्याचे संशोधन गुजरात विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. भंवरलाल जैन यांची प्रेरणा फंड रेझिंग विषयासंदर्भातील प्रथम संशोधन गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. भवरलाल जैन यांनी झाला दांपत्याला गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी विवेकानंद निवासी विभागात मुलांच्या निरामय आरोग्यासाठी दररोज सूर्यनमस्कार, योगासन व खेळावर मार्गदर्शन करण्यात येते. विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातील नववी-दहावीची मुले पुन्हा व्यायाम, खेळासाठी मैदानावर आली आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या वापराने विद्यार्थी कंटाळल्याने तसेच विद्यार्थ्यांमधील प्रतिकार क्षमता वाढावी म्हणून त्यांना व्यायाम, मैदानी खेळाची गोडी लागावी यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातर्फे त्यांना मैदानी खेळांचे मार्गदर्शन विदर्भातील क्रीडा प्रशिक्षक संतोषकुमार वाळसे व संजय अंबोदकर सकाळी व सायंकाळी करीत आहेत. या उपक्रमासाठी संजय कानडे, संजय आंबोदकर, सुनील वाघ, मधुसूदन जोशी, कृष्णा सत्रे, दुलारी प्रजापती यांचे सहकार्य लाभत आहे.विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी विभागातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर या संकल्पनावर प्रकाश टाकणार्‍या ‘राष्ट्र मंदिर टॉक शो’चे आयोजन १२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी नाट्यगृहात केले आहे. अभियानानिमित्त होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘राष्ट्र मंदिर टॉक शो’मध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजप नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ. यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को-ऑप. सहकारी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, तसेच डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते सहभागी होतील. अयोध्येत साकारणारे निधी अभियान जिल्ह्यातील वस्ती, गाव, शहर पातळीवर राबवले जाईल. अभियानाच्या प्रचार-प्रसारसाठी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ऑनलाइन राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२० नुकताच उत्साहात झाला.त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे लोकनृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, लातुर, कोल्हापुर या ८ विभागांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला,त्यात जैन फाउंडेशनला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. युवा महोत्सव २०२० महोत्सवात एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. लोकनृत्य प्रकारात जैन फाउंडेशनने प्रतिनिधीत्व केले. सहभागी कलावंत अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन, सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी कलावंत स्पर्धकांचे फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी कौतुक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सध्याच्या जगात आपण सोशल मीडिया वापरला नाही तर आपल्याला कुठलेही अद्ययावत माहिती मिळणार नाही व आपण जगाच्या मागे पडू,अशी भीती वाटू लागते. अर्थात, त्यातून नकळत आपले सोशल मीडियावरील अवलंबत्व वाढते आहे, असे प्रतिपादन मुक्ता चैतन्य यांनी केले. दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या “माझा स्क्रीन माझी जबाबदारी’ या शेवटच्या सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. वेळ, ऊर्जा आणि बुध्दी यांचा योग्य वापर न करता तासनतास आपण स्क्रीन चाचपडत राहतो. भावनिक दृष्टीकोनात तुम्ही सोशल मिडीयाचा वापर करीत असाल तर तुम्हाला त्यातून नैराश्य येऊ शकते. याचाच परिणाम कुटुंबातील संवाद अगदी कमी होऊन तो फक्त सोशल…

Read More