Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जिजाऊ जन्मोत्सवापासून ते प्रजासत्ताक दिनापर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, मुस्लिम मंच आणि मणियार बिरादरीचे फारुख शेख, नियाज अली फाउंडेशनचे अयाज…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील मराठी प्रतिष्ठान व रामलाजी चौबे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी मोटेल कोझी कॉटेज, सागर पार्कसमोर महापौर भारतीताई सोनवणे, आयुक्त सतीश कुळकर्णी, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी महापौर नितीन लढ्ढा, पीपल बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अ‍ॅड.शुचिता हाडा, रामलालजी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांच्या उपस्थितीत झाला. महापौर भारतीताई सोनवणे यांचा हस्ते दुचाकी रुग्णवाहिकेवरील कापडी अनावरण काढून उद्घाटन करण्यात आले. ना नफा ना तोटा या तत्वावर शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी अथवा घरुन दवाखान्यात ने-आण करण्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. दुचाकी रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे सुरू होत आहे. ‘लाइफलाइन’…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोना काळात काम करीत असताना अनेक बदल करावे लागले. त्यासाठी कठोर शिस्त आणि नियोजन करावे लागले. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय यंत्रणा सक्षम केली. यासह महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी दूर करून आज कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवले आहे. जिल्हा रुग्णालय हे सामान्यांचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्त पाळून उपचार घ्यावेत, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणार्‍या ४५ कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, डॉ. धर्मेंद्र पाटील, कोविड केअर सेंटर उपप्रमुख डॉ. शिरीष ठुसे,…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी १ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरातील काढण्यात आलेल्या अतिक्रमनातील जप्त केलेले भंगार चक्क तहसीलदार यांच्या निवासस्थानासमोरील धान्य गोडाऊनच्या आवारातून लंपास झाले असून ‘महसूल प्रशासनाने मारला अतिक्रमणाच्या भंगारवर डल्ला’ अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतद्वारा दि.१ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली ते प्रवर्तन चौक तसेच जुने गाव वरणगाव रस्ता व खामखेडा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. महसूल नगरपंचायत व पोलीस विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांचे लोखंड, लोखंडी पत्रे, त्यात असलेली साहित्य यासारखे भंगार जप्त करण्यात आलेले होते. हा भंगार डंपरमधून तहसीलदार यांच्या निवासस्थान असलेल्या धान्य गोडाऊनच्या परिसरात आणून टाकण्यात आले होते. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्मितीस प्रारंभ झाला असून त्यासाठी देशभरात निधी संकलन अभियान सुरू झाले आहे. हे धर्म कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आज शहरातील पांजरापोळ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हभप महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली, योगी दत्तनाथजी महाराज, भगवान महाराज, देव गोपालशास्त्री, जितेंद्र महाराज, देवेंद्र भावसार, हरीेश मुंदडा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या धर्म कार्यास व निधी संकलनास योगदान देण्याचे आवाहन यावेळी संत महात्म्यांनी केले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लोकरंगभूमीच्या आधुनिक परंपरेत तमाशा व लोकनाट्य परंपरांचा परिचय होणार आहे. आदिम परंपरा लोकरंगभूमीतून दिसून येते. सण-उत्सवांत विधिनाट्य दिसतात. एखादी भावना विधिनाट्यातून दिसून येते. श्रोता व सादरकर्ता वेगळा नाही. लोकरंगभूमीतून एकाच रूपाने तो समोर येतो,’ असे प्रतिपादन हरिभक्त परायण प्रा. सी. एस. पाटील यांनी येथे केले. येथील लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे शुक्रवारी दुपारी कॉन्फरन्स हॉलमध्ये साहित्यिक तथा प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या …मराठी लोकरंगभूमी’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे अध्यक्षस्थानी होत्या. मराठी लोकरंगभूमी’चे लेखक प्राचार्य डॉ. पाटील यांनी मनोगत…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी सर्वांना सात्विक भावनेने मदत करण्याचे आवाहन प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळी निर्माण होणार्‍या अद्भूत मंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन महामंडलेश्वर संत बालयोगी महाराजांनी केले. चोपडा तालुका श्रीराम मंदीर निधी संकलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली.यावेळी ते त्यांच्याशी बोलत होते. बालयोगी महाराज म्हणाले की, प्रत्येक जण प्रात:समयी प्रभू श्रीरामाचे स्मरण करुन दिवसाची सुरूवात करतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण कार्य सुरू होत आहे. श्रीरामाने आपल्या जीवनात अनेक सुखद क्षण दिले. आयुष्य जगण्याचा आनंद निर्माण केला आहे. आता आपल्याला प्रत्येकाला रामासाठी काही करण्याचा, देण्याचा योग आला आहे. जगातील प्रत्येक भाविकाला अयोध्येत येताना विशाल राममंदिर पाहिल्यानंतर अलौकिक समाधान…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शासनाकडून जिल्हा परिषदेस मिळणार्‍या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण व्हावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे अधिकार्‍यांना साकडे घातले आहे. कामे होवूनही निधी अभावी ठेकेदारांना रक्कमेचे वितरण होत नसल्याने पदाधिकारी संतप्त झाले असून उपोषणाचाही पवित्रा पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. यासंबंधीचे निवेदन उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिले. जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातून मिळणारा ६ कोटी ७१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्यांना या निधीचे वाटप झाले. यातून विविध कामांना जिल्हा परिषदेने मान्यता दिल्या आहेत. यासह कार्यारंभ आदेश देवून कामे ही पूर्णत्वास आली आहेत. तर १५ दिवसात हा प्रश्न…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी आदर्श गाव राजवड (ता.पारोळा) येथील मुख्याध्यापिका, समाजसेविका, शिक्षक नेत्या, महिला शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षा डॉ.पाकीजा उस्मान पटेल यांना ‘होप इंटरनॅशनल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य’कडून ‘नेल्सन मंडेला इंटरनॅशनल पीस अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. डॉ.पटेल या उपक्रमशील शिक्षिका असून सतत नवनवीन साधनांद्वारे अध्यापन करून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान प्रबोधन करीत असतात. विद्यार्थी हितासाठी गेल्या २० वर्षापासून नेहमी रचनात्मक व सर्जनशील प्रयोग करीत असतात. ‘घरात शाळा आणि शाळेत घर’ हा उपक्रम राबवतात. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने राजवड गावात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या संकल्पनेतून…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी वाटप राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे काल वितरित करण्यात आले.यावेळी वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,जाकीर पिंजारी, अल्तमश खान ,मोसीन खाटीक, रशीद खान ,शकील पटेल आदी उपस्थित होते. गेल्या १८ दिवसांपासून या परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादीतर्फे काल टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले.अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचे टँकर पाहून सुखद धक्का बसला.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले . यावेळी साहिल पटेल यांनी नागरिकांना मनपातर्फे मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत मनपाच्या कारभारावर टीका केली.

Read More