जळगाव ः प्रतिनिधी ब्राह्मण समाजातील युवकांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुभाषिक ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, ब्रह्मश्री बहुउद्देशिय संस्थेतर्फे हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी ३१ डिसेंबर रोजी पाच कर्मचारी निवृत्त होत असताना त्यापैकी एक कर्मचारी हा हवलदार म्हणूनच निवृत्त का होत आहे याबाबत चौकशी केली असता कार्यालयीन दिरंगाईमुळे त्याला पदोन्नती नाही म्हणून डॉक्टर मुंडे यांनी त्वरित प्रशासकीय सूत्रे हलवून निवृत्त होणार्या हवालदारास त्याच दिवशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थातच जमादार पदाची पदोन्नती दिली व संध्याकाळी त्याला निवृत्ती देऊन निरोप देण्यात आला. ज्या हवालदाराला पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले होते ते हवलदार अब्दुल हकीम वाहिद शेख हे मनियार बिरादरी शी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जो सन्मान केला होता तो जरी कर्तव्याचा भाग असला तरी एका पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून जाणार्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे,जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जळगाव शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत पाटील, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, उपअभियंता स्वाती भिरुड यांचेसह एसटी, वीज वितरण कंपनी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज मंगळवारी सकाळी ८ वाजता नूतन मराठा महाविद्यालयात ईव्हीएम मशीन सील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी तहसिलदार नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी व तालुक्यातील निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक चिन्ह प्राप्त होताच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असल्याने गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी प्रशासनाने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, आज सकाळी ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. नूतन मराठा महाविद्यालय येथे सुमारे ३० टेबलवर मास्टर ट्रेनरच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा रोडवरील सुरभी लॉन जवळून सुप्रिम कॉलनीत राहणार्या चालकाची दीड लाख रूपये किंमतीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द रितसर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, मनोहर ज्ञानदेव पवार (वय ३८) रा. त्रिमूर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी मालवाहू गाडीचे चालक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९- बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम ते करतात. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापूरा भागातील बिस्मील्ला चौकात असलेल्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख व इतर वस्तू चोरून नेल्याचे काल पहाटे उघडकीस आले. याप्रकरणी काल रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील तांबापूरा भागात मोहसीन शेख सलीम (वय २४) रा.बिस्मील्ला चौक, हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे दुमजली घर आहे. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घरातील कुटुंबिय जेवण करून खालच्या घरात झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी वरच्या घरात शिरून घरात ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि हॅन्ड बॅग, केबलचे बुक चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी मोहसीन…
जळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे सात दिवसीय धरणे आंदोलनाला कालपासून प्रारंभ झाला आहे.आज या आंदोलनात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. काल सोमवारी या आंदोलनात पदाधिकार्यांसह जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. केंद्र सरकारने ३ कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे भारतातील शेतकरी व शेती व्यवसाय संकटात येणार आहे. शेतकर्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समिती व हमीभाव धोक्यात आले आहेत. हे तिनही अध्यादेश रद्द होण्याच्या मागणीसाठी शेतकरी सिंघू, गाजीपूर सीमेवर आंदोलन करीत आहेत. शेतकरी विरोधी कायदे रद्द न…
अमळनेर ः प्रतिनिधी शहरातील प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना व वाहनधारकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी छोटे-मोठे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पंकज चौधरी यांनी दिला आहे. अमळनेर रा.मा.१५ चे काम सुरू होते. त्यामुळे शहरातून जाणारा रा.मा. क्रं.०६ (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा.०६ ची संपूर्ण चाळण झाली आहे. विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत धुळीचे…
जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाने २०१९ मध्ये ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करून सदर योजनेत सुधारणा करून जळगावातील १२ ज्येष्ठ पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करणारे पत्र जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करावयाच्या पत्रकार दिनी जळगावातील बारा ज्येष्ठ पत्रकारांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले त्यात शिवलाल बारी, मोहन साळवी, अरूण मोरे, केदारनाथ दायमा, सुभाष पाटील, अशोक जैन, अनिल मुजूमदार, जमनादास भाटीया,विजय पाटील, प्रकाश पत्की, दिनेश दगडकर यांचा समावेश होता.
जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानासाठी भाजप जिल्हा महानगर शाखेची बैठक नुकतीच भाजप कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोळे यांनी श्रीराम जन्मभूमी निधी समर्पणासाठी प्रत्येक समाजबांधवाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बैठकीत संघाचे राजेश ज्ञाने, दीपक वाणी, सुमन नेवे, पीयुष श्रावणे यांनी मंगळवारी होणार्या भव्य मोटारसायकल रॅलीविषयी माहिती सांगितली. महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेता भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, राजू मराठे, सुशील…