जळगाव ः प्रतिनिधी बीएचआरप्रकरणात पुण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातील खान्देश मील कॉम्प्लेक्समधील दोन गाळे सील केले होते.या गाळ्यांमध्ये इतर कंपन्यांचे कार्यालय असल्याने १५ जानेवारीपर्यंत गाळ्यांचे सील काढण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये शॉप क्रमांक ४२ आणि ४३ हे पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी सील केले आहे. बीएचआर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे येथून घेऊन हे कार्यालय सील केले होते. यासंदर्भात या ठिकाणी कार्यालय असलेल्या सुरज सुनील झंवर, सालासर ट्रेडिंग कंपनी, दीपक श्रीपतराव शिंदे, सुनील श्यामलाल कलंत्री, युगश्री जयसाई वेअर हाऊस प्रा.लि. श्री साईबाबा कोल्डस्टोरेज, श्री साई मार्केटिंग अॅण्ड…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी गेले जवळपास वर्षभर कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरु आहे.आपल्या देशातही हे संक्रमण भयंकर प्रमाणात फैलावले होते. भारत सरकारने केलेल्या लॉकडाऊन मध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, मनपा कर्मचारी इत्यादी हे कार्यरत होते. त्याचप्रमाणे बँक कर्मचारी सुद्धा पहिल्या दिवसापासून जनतेच्या सेवेत कार्यरत होते.इतर कोरोना योध्दांप्रमाणे बँक कर्मचारीही आपली ग्राहक सेवेचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत होते. दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेने कोरोना काळात दिलेल्या बँकींग सेवेबद्दल बँकेच्या एमजे कॉलेज शाखेचे ग्राहक शैला तुकाराम बिराजदार व तुकाराम श्रीपतराव बिराजदार यांनी एमजे कॉलेज शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बँकेने दिलेल्या सेवेबद्दल सौ. व श्री. बिराजदार यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्याबाबत जिल्हा मऩियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी पोलिस तक्रार दाखल केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहात अपघात झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरुध्द रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शहरातून जात असलेल्या चौपदरी मार्गाबाबत अजिंठा चौक ते इच्छादेवी या दरम्यान होत असलेल्या अपघाताबाबत व त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या २७ जुलै २०१८च्या तपासणी अहवालाप्रमाणे काम होत नाही. यात स्थानिक गरजा, जागेवरील आवश्यकता,सुरक्षा, सर्विस रोड,अस्तित्वात असलेल्या रोड ड्रेनेज,रुंदी करून आवश्यक सेवा, अंडरपास व फुटवेअर ब्रिजचा समावेश असावा तसेच अस्तित्वातील असलेल्या ६० मीटर…
जळगाव : प्रतिनिधी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस काल जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्यांना ही लस दिली जाणार आहे. जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर “कोविशील्ड’ लसीची निमिर्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काल संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली.…
पाचोरा/चाळीसगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणीचा घरात एकटी असतांना तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर चाळीसगाव शहरात एका विवाहाच्या कार्यक्रमास आली असता ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना घरात कुणीही नसल्याचा फायदा उचलत संशयीत आरोपी गजानन माणिक पाटील (रा.शिंदाड, ता.पाचोरा) याने मद्यधुंद अवस्थेत घरात घुसत पिडीत तरुणीचा उजवा हात पकडत अलिंगन देत पिडीतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव-हरेश्वर पोलीस स्थानकात गजानन माणिक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील जिल्हा क्रिडा निवासस्थानात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून एका अधिकार्याच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद कॉलनीत जिल्हा क्रिडा अधिकारी सुजाता चव्हाण (वय ५२) यांचे निवासस्थान आहे. काल मंगळवार दुपारी मु.जे. महाविद्यालयात युवा सप्ताह अंतर्गत युवा दिनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. याच सुमारास त्यांच्या निवासस्थानात बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह दोन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. सुजाता…
जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात मंगळवारी टॉक शो झाला. यात अयोध्यानगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी (मुंबई) म्हणाले की, रामजन्म भूमीमुक्तीचा लढा हा १५२८ पासूनचा आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या वेळी महासभेकडून अयोध्येतही राममंदिर उभारण्याचा प्रश्न पुढे करण्यात आला व समिती स्थापन झाली. हे आंदोलन कुण्या पक्षाची मक्तेदारी नव्हती. राजकीय दृष्ट्या या चळवळीला कोण्या पक्षाच लेबल लावता येणार नाही. सन १९९० पासून या आंदोलनाला राजकीय रंग चढवला, असे भंडारी म्हणले. ऍड. सुशील अत्रे सूत्रसंचालन केले. सामाजिक वैचारिक भिन्नता दूर करण्याचे…
जळगाव ः प्रतिनिधी येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन सर यांनी प्रास्ताविकात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील व लहान बालकांनी मॉंसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत दोघांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ऍड. भैय्यासाहेब यांनी या दोघंही महान विभूतींच्या कार्याबद्दल आपले मनोगतातून सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी वाय.एस. महाजन सर, स्वप्निल नेमाडे, महिला जिल्हाध्य्क्षा कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, सुनिल माळी, किरण राजपूत, ऍड. राजेय गोयर, राजु भंगाळे, चंद्रकांत…
जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या उभारणीसाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना अंतर्गत जळगाव शहरात झालेल्या श्रीराम प्रदक्षिणा वाहन फेरीत सहभागी सर्व श्रीराम भक्तांचे आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करत आगळे वेगळे व भव्य स्वागत पांडे चौक येथे युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.या ठिकाणी कुमुद नारखेडे व सहकारी यांनी भव्य अशी स्वागतपर रांगोळी काढली होती तसेच आकर्षक स्वागत कमान लावण्यात आली होती. वाहन फेरीच्या समारोपठिकाणी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे प्रभूश्रीरामाची सुंदर आरास उभारण्यात आली होती. या ठिकाणी श्रीराम भक्तांची छायाचित्र घेण्यासाठी गर्दी दिसून आली. सदर आरास राजेश नाईक यांच्या नेतृत्वात युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी साकारली. या साठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया,प्रितम शिंदे, अमोल गोपाळ, चेतन बारी,…
जळगाव ः प्रतिनिधी मोकाट कुत्र्यांची समस्या आता डोईजड झाली आहे. लहान मुले सातत्याने लक्ष्य होत असून, आणखी किती दिवस लचके तुटणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांनाच कुत्र्यांची पिले भेट देऊन निषेध नोंदवला. शहरात गेल्या दहा वर्षांत कुत्र्यांची संख्या दुप्पट झाली . ७ वर्षे सतत प्रयत्न केल्यानंतर वर्षभरापुर्वी कुठे कुत्रे निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात कोरोनाचा कहर वाढला आणि ते काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. घरातून एकटे बाहेर पडणे म्हणजे धोका पत्करणे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत १९ जणांना चावा घेतल्याच्या घटना…