जळगाव : प्रतिनिधी मोबाइलच्या आहारी गेलेली मुलं काय करु शकतात याचा प्रत्यत जळगावमधील एका घटनेने आला आहे. मोबाइलमध्ये एका वेबसाइटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथील तुकारामवाडीमधील हर्षल उर्फ सोन्या दीपक कुंवर (१३) मुळ रा.शिंदखेडा ता.धुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथील रहिवासी होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता.मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे.…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या बर्याच वर्षांपासून बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होणार्या सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांची समस्या लवकरच सुटणार आहे. १५ फेब्रुवारीपासून थेट अमृत अभियानातून नळ संयोजनाद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापौर भारतीताई सोनवणे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. सुप्रीम कॉलनीतील जनतेला आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर सोनवणे यांनी वर्षभरात आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारीला केलेल्या पाहणीनंतर सोमवारी पुन्हा पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे,…
जळगाव ः प्रतिनिधी एका भामट्याने चक्क पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या अकाऊंटला कोणीही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन करणारी पोस्ट डॉ. मुंढे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवली आहे. अशा प्रकारे अनेक लोकांचे बनावट अकाऊंट तयार करून भामटे त्यावरून भावनिक पोस्ट करून पैसे उकळत असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. संबंधित व्यक्ती सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार करून बनावट अकाऊंट बंद करून घेत असतात परंतु आता या भामट्यांनी थेट पोलिस अधीक्षक डॉ. मुंडेे यांच्या नावाचे अकाऊंट तयार करेपर्यंत मजल मारली आहे. या बनावट अकाऊंटमध्ये प्रोफाइल पिक्चर, बॅकग्राऊंड पिक्चर…
अमळनेर ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेमध्ये देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे उपशिक्षक ईश्वर रामदास महाजन यांनी ऑनलाईन ‘शिक्षणाचे फायदे व तोटे’ यावर निबंध लिहिला होता. त्या निबंधाला माध्यमिक गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संघटनेच्यावतीने घोषित झाले होते. त्याचे वितरण एरंडोल येथे डी.एस.पी. कॉलेजच्या सभागृहात गुणवंत शिक्षक पुरस्काराने ईश्वर महाजन यांना पारोळा व एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे, संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाट व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन…
जळगाव ः प्रतिनिधी संविधान बचाव नागरी कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काल रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होवून रॅली पं. जवाहरलाल नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत आली व सांगता झाली. या रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. करिम सालार, मनियार बिरादरीचे फारुख शेख, प्रा.प्रितीलाल पवार, हरिश्चंद्र सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, श्रीकांत मोरे, मुस्ताक सालार, फईम पटेल, अयाज अली, रमेश सोनवणे, चंदन…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी माजीमंत्री व राष्ट्रवादीचे जिल्हा नेते गुलाबरावआप्पा देवकर हे आता जळगाव ग्रामीण ऐवजी जळगाव शहर विधानसभा लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.नव्हे तर त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.निवडणुकीला अजून जरी चार वर्ष बाकी असली तरी आघाडीची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे देशाचे मुत्सद्दी नेते शरद पवार हे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आतापासूनच मोट बांधत असल्याचे समजते. त्यादृष्टीकोणातून गुलाबराव देवकर यांना देखील तसे संकेत पवारांकडून मिळाल्याचे बोलले जात आहे. गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस नुकताच थाटात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम देखील राबविण्यात आले. यावेळी शहारातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची व प्रेमी जणांची उपस्थिती लक्षणीय होती.तसे…
जळगाव ः प्रतिनिधी संविधान बचाव नागरी कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होवून रॅली पं. जवाहरलाल नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत येईल. त्यांनतर त्याठिकाणी देश भक्तीपर गीते सादर केली जाणार आहेत. त्यानंतर प्रमुख मान्यवर रॅलीला संबोधित करणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. करिम सालार, प्रा. प्रितीलाल पवार,…
जळगाव : प्रतिनिधी देशाच्या सुरक्षेविषयी गोपनीय माहिती मिळत असलेल्या अर्णब गोस्वामी या पत्रकारावर कठोर कारवाई केली पाहिजे. आपण सर्वजण ही मागणी करीत असताना किमान राष्ट्रप्रेमापोटी तरी भाजपने ही मागणी करावी कारण देशहित सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली. काल जळगाव जिल्हा दौर्यावर आले असताना आमदार पवार यांनी सायंकाळी ६.३० वाजता येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या पक्ष कार्यालयाला धावती भेट दिली. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना विरोधकांचे डावपेच ओळखले पाहिजे.काही पोस्ट थेट फॉरवर्ड न करता बारकाईने वाचल्या पाहिजे. विरोधकांच्या अफवा पसरवणार्या पोस्टवर योग्य उत्तरे दिली पाहिजे. आपला पक्ष सत्तेत असल्याने सामान्य लोकांना, जनतेला केंद्रबिंदू मानून…
धरणगाव ः प्रतिनिधी धरणगाव येथील येथील सानेपटांगणावर महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामना वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.या निमित्ताने पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस व चित्रकला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख पी.एम. पाटील सर,चर्मकार समाजाचे नेते भानुदास अप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन,माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ,अंजलीताई विसावे,गटनेते पप्पू भावे,धानोरा सरपंच भगवान महाजन,सभापती शिक्षण वासुदेव चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,अक्षय महाजन, प्रतिभा पाटील,संजय पाटील,ग्रंथालय सेना प्रसिद्धी प्रमुख योगेश…
अमळनेर ः प्रतिनिधी सर्व कलाशिक्षक बंधू व भगिनींना सूचित करण्यात येते की,ग्रेड परीक्षा सवलतीच्या वाढीव गुणांच्या प्रस्ताव पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी होती.मोजक्या शाळांचे प्रस्ताव बोर्डात सादर झाले व बहुसंख्य शाळांचे प्रस्ताव सादर करू शकले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य कलाशिक्षकांचे या समस्यांवर फोन आले. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षण सचिव व एस.एस.सी.बोर्डाचे अध्यक्ष/सचिव यांना राज्य संघटनेचे सचिव भिरुड सर यांनी सविस्तर पत्र दिले त्यातील मुद्दा क्र.१ परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत बोर्डाने वाढावीली आहे व अजून बहुतेक शाळांचे फॉर्म भरणे बाकी आहे,त्याशिवाय अप्लिकेशन नंबर मिळत नाही व तो यात नमूद करावा लागतो.त्यामुळे चित्रकला प्रस्ताव कसे पूर्ण होतील? तसेच राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतच्या निवडणूक असल्याने शिक्षकांच्या…