अमळनेर ः प्रतिनिधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज-२०२१ स्पर्धेत अमळनेर येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी अजय पाटील हिची निवड झाली असून नुकतीच पुणे येथे उपग्रह निर्मीतीची कार्यशाळा संपन्न झाली. डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक, आशिया, इंडिया रेकॉर्डसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विद्यार्थ्यांना सामील होता येईल. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये हे विद्यार्थी…
Author: saimat team
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धरणगाव तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव भोलाणे यांनी विभूषित केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक आत्माराम पाटील,मुख्याध्यापक प्रशांत नेमाडे तसेच ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र चौधरी,विकास शिरसाट,वाय.जी. पाटील,आर.टी.माळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेने नियोजन विभागाकडून मिळणार्या निधीतून १८ कोटी ७२ लाखांच्या कामांचे नियोजन केले आहे. त्यात तीर्थक्षेत्र, जनसुविधा, नागरी सुविधा, शाळा दुरुस्तीसह नवीन शाळा खोल्या बांधकामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे सदस्य निधीपासून वंचित होते. निधी मिळत नसल्याने अनेक कामे प्रलंबित पडली होती.यासह प्राप्त निधीतूनही कामांना ब्रेक लागला होता. जानेवारी महिन्यापासून या कामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अपूर्ण निधी, प्रशासकीय मान्यतेचा अभाव यासह दप्तर दिरंगाई याबाबत चांगलीच आगपाखड केल्याने अधिकार्यांनी सुटीच्या दिवशीही कामे पूर्ण करीत निधीबाबतची कामे पूर्ण केली आहे. अडीच वर्षानंतर नवीन…
मनपाच्या नेरीनाका स्मशानभूमी येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण झाले असून, लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. शवदाहिनी कार्यान्वित होण्यामुळे प्रदूषण नियंत्रणासोबत पर्यावरणाचा होणारा र्हासदेखील थांबणार आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचा पुढाकार व देणगीदारांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पावसाळ्यात अंत्यसंस्काराला अनेकदा ओल्या लाकडांचा प्रश्न निर्माण होतो. नेरीनाका स्मशानभूमीत दररोज ८ ते १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर होत असतो परंतु रिखबराज बाफना आणि दिलीप चोपडा यांनी शवदाहिनी उभारणीसाठी आर्थिक सहकार्य केल्यामुळे आता नेरीनाका येथे एलपीजी गॅसवर शवदाहिनी कार्यान्वित होणार आहे. शवदाहिनीमध्ये दररोज आठ मृतांवर…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव नाक्याजवळील मुंजोबा मंदिरासमोर दशमेश मार्गावर ट्रकने पुढे जाणार्या मारोती कारला जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी कारचे नुकसान झाले आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्डे चुकवत असतांनाच हा अपघात झाला असल्याची चर्चा घटनास्थळी होती तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ट्रकचालकाला अक्षरश: तेथे काम करीत असलेल्या मजुरांनी ट्रकला आपल्याकडे असलेल्या अवजारांनी ठोकत ट्रक थांबविला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघातामुळे या रोडवरील वाहतुक सुमारे अर्धातास खोळंबली होती. दरम्यान, शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून दुचाकीस्वारासह पादचार्यांनाही रस्त्यावरून जाण्याची भिती वाटत आहे. मात्र, सत्ताधारी विकासाच्या वल्गना करत आपल्याच मस्तीत असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. याबाबत घडलेला…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संकटामुळे १० महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा शहरासह जिल्ह्यात आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने शाळांकडून सफाई व निर्जंतुकीकरणाचे कामाची पूर्ण सज्जता केल्याचे दिसून आले. कोरोनाचा कहर सुरू होताच २० मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील नववी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असला तरी आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. कोरोनाचा परिणाम कमी होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसोद येथे तापी नदी पात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पळसोद येथील शेतकरी सुपडू बळीराम चौधरी (वय ५४) हे त्यांच्या मालकीचे असलेले बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या तापी नदीवर गेले होते. काठावरच सुपडू चौधरी यांनी आपल्या अंगातील कपडे व बुट काढून ठेवत बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैलांची आंघोळ घालत असतांनाच एक बैल पोहत-पोहत सुपडू चौधरी यांना खोल पाण्याकडे घेवून गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौधरी त्याठिकाणी बुडून गेले. सुपडू चौधरी हे तापी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जळके येथील ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने नैराश्यातून तरुणाने हे घातक पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जळके येथील धनराज संतोष जाधव (वय ३६) हा तरुण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या सोबत पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वीच मुलांसह माहेरी जळगाव जामोद येथे गेलेली आहे. त्यामुळे धनराज जाधव हा घरी एकटाच होता. सोमवारी घरात एकटाच असतांना आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. जाधव राहत असलेल्या परिसरात त्याचे…
जळगाव : प्रतिनिधी मोबाइलच्या आहारी गेलेली मुलं काय करु शकतात याचा प्रत्यत जळगावमधील एका घटनेने आला आहे. मोबाइलमध्ये एका वेबसाइटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथील तुकारामवाडीमधील हर्षल उर्फ सोन्या दीपक कुंवर (१३) मुळ रा.शिंदखेडा ता.धुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथील रहिवासी होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता.मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या बर्याच वर्षांपासून बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होणार्या सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांची समस्या लवकरच सुटणार आहे. १५ फेब्रुवारीपासून थेट अमृत अभियानातून नळ संयोजनाद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापौर भारतीताई सोनवणे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. सुप्रीम कॉलनीतील जनतेला आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर सोनवणे यांनी वर्षभरात आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारीला केलेल्या पाहणीनंतर सोमवारी पुन्हा पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे,…