भुसावळ : प्रतिनिधी शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्याबद्दल जास्तीत जास्त शेतकर्यांना आणि शेतकामगारांना माहिती व्हावी, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले होते आणि त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी त्यांच्या कृतीद्वारे दिला आहे, असे प्रतिपादन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी केले आहे. वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे दोन दिवसीय निवासी प्रमुख पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर हे मुंबई येथे रामभाऊ…
Author: saimat team
चाळीसगाव ः प्रतिनिधी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य व विभागीय शाखा नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील भूषण मंगल कार्यालयात आयोजित विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विद्यालयाचे प्रा.डॉ.एस.आर.जाधव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जनरल सेक्रेटरी डी.पी.जाधव, चाळीसगाव अंधशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम, वकील संघाचे अध्यक्ष ऍड.पी.एस.एरंडे, रयत सेनेचे गणेश पवार, दृष्टिहीन संघाचे चाळीसगाव शाखाध्यक्ष साहेबराव पगारे, रोटरीचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, प्रमोद शिंपी, संजय घोडेस्वार, आनन शिंपी, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ, बालू पवार आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर संवाद…
जळगाव : प्रतिनिधी उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने आज शहरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन रॅलीमध्ये २०० सायकलपटूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या सर्व सायकलपटूंनी नियोजित १० कि.मी.चे अंतर पूर्ण केल्यामुळे सर्वांचा महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. जनतेमध्ये सायकलींगची आवड निर्माण व्हावी व वाढावी या उद्देशाने उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने सायक्लोथॉन (सायकल फेरी) आयोजित करण्यात आली. तिचा प्रारंभ आज सकाळी ७ वाजता शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉफ येथून महापौर भारतीताई सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. या सायकल फेरीचा मार्ग…
पाचोरा ः प्रतिनिधी पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती.या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठीयेथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव नुकताच करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे यांची विशेष उपस्थिती होती. पाचोरा येथील पोलिस…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत रिंगरोडवरील डॉ. शिरीष चौधरी यांच्या आस्था हॉस्पीटल येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दुभंगलेले ओठ, टाळू, टाळूला शस्त्रक्रियेनंतर राहिलेले छिद्र, तिरपे राहीलेले नाक व्यवस्थीत करणे, आवाज व्यवस्थीत करण्यासाठी शस्त्रक्रिया व या संबंधीत सर्व समस्यांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरज असलेल्या सर्व रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी भूल देणे, औषधी, रक्त तपासणी पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांची राहण्याची व जेवणाची सुद्धा…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील समस्त प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानावर जावून आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देणे सुध्दा आवश्यक आहे. जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटना मर्यादित, जळगाव यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील समस्त कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानाजवळ आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे व आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देण्याचे करावे.सदर हमीपत्र संबंधित रेशन दुकानदाराजवळ उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे. तसेच एपीएल,केशरी आर.सी.१२ अंकी नंबर नसलेल्या कार्डधारकांसाठी माहे जुलै, ऑगस्ट…
अमळनेर ः प्रतिनिधी राजवड (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका, समाजसेविका, शिक्षक नेत्या डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांना वल्लरी फाऊंडेशन तेलंगणाकडून ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड २०२१’ ने सन्मानित करण्यात आले. डॉ.पाकिजा पटेल यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक पर्यावरण विषयक कामाने समितीने पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गेल्या २० वर्षापासून सतत सर्वोत्कृष्ट कार्य सुरू असून नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढी घडावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी पोहोचावा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अध्यापनाचे कार्य निरंतर सुरू आहे. याची दखल घेऊन उंच भरारी डॉ.पटेल यांनी घेतली आहे. विद्यार्थी हा सुजान संस्कारशील घडावा यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असतात. या…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांसाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. जुना सतारे भागातील वेडीमाता मंदिर परिसरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात सकाळी सुमारे ११.४५ वा.पहिल्या न.पा.आरोग्य विभागातील कर्मचार्याला कोविशिल्डची लस देण्यात आली. दरम्यान, सकाळी खा.रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.डॉ.सुनिल नेवे आदींनी आरोग्य केंद्रात येवून भेट देत नियोजनासंदर्भातील माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात मार्च २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेला अखेर आज सुरुवात झाली. देशपातळीवरील मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात एकाच वेळी ७ ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दररोज शंभरप्रमाणे…
यावल ः प्रतिनिधी शहरातील एका दुचाकी चोरट्याने मोटर सायकल चोरून त्याच मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून तुमची मोटरसायकल कोणाकडे आहे, हे मला माहिती असून तुम्ही दोन हजार किंवा पाच हजार रुपये दिल्यास मोटर सायकल आणून देतो असे सांगून संबंधित मोटरसायकल मालकाची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याचा नवा फंडा यावल शहरात दुचाकी चोरट्याने सुरू केला आहे. या दुचाकी चोरट्या संदर्भात यावल पो.स्टे.ला तक्रार करण्यात आली असली तरी तो दुचाकी चोर फरार असल्याने यावल पोलीस हतबल ठरत असल्याचे शहरात बोलले जात आहे. गेल्या दोन महिन्यात एका एसटी कर्मचार्यांची प्लेटिना मोटरसायकल चोरीस गेली होती, दुचाकी चोरट्याने मोटर सायकल मालकाशी डायरेक्ट संपर्क साधून मोटरसायकल कोणाकडे आहे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात संथगतीने असलेले मतदान आता जोर धरू लागले आहे. जिल्ह्यातील ५ हजार १५५ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या १३ हजार २४७ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद होत आहे.जिल्ह्यातील २ हजार ४१५ केंद्रांवर १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला कौल नोंदवित आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात १८१ तर नंदुरबार जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. आज सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. ७.३० ते ९.३० या पहिल्या टपप्यात मतदान संथगतीने सुरू होते. मात्र त्यानंतर मतदान केंद्रांवर हळूहळू पुरूष व महिला मतदारांची रीघ लागल्याचे दिसून आले.…