Author: saimat team

लखनौ : वृत्तसंस्था – योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करायला जायच्या आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक सभाही घेतली. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहरी जागेवर 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी असेही घोषित केले की, त्यांच्याकडे 12 हजार रुपये…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जसजशी थंडी वाढत आहे तसतसे नाक-कान-घसा विकाराचे रूग्णही वाढु लागले आहेत. काहींना या तीनही अवयवांशी निगडीत जुन्या व्याधींनी या काळात अधिकच त्रस्त केले आहे. अशा सर्व गरजु रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिराला सुरूवात झाली आहे. निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराच्या पहिल्याच दिवशी रूग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. उल्हास पाटील वैैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी विविध विभागांतर्गत नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नाक-कान-घसा या मानवाच्या अतिशय महत्वाच्या अवयवांशी निगडीत जुन्या आणि नव्याने उद्भवणार्‍या विकारांवर उपचार करण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. शिबिरासाठी नाक-कान-घसा विभागातील…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला तब्बल 29 वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आली आहे. देशातील सर्वांत मोठा बॉम्बस्फोटात तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर 29 वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. भारतात आणण्याची शक्यता अबू…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले…

Read More

धुळे, वृत्तसंस्था । शहरातील एका भागात राहणाऱ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने व पतीच्या भावाने मिळून दांडक्याने जबर मारहाण करून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. यासंदर्भात धुळे शहर (police) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. संशयीत आरोपी मयूर शार्दूलधुळे शहरातील मिल परिसरात काल सायंकाळी अनैतिक संबंधाच्या वादातून निखिल पाटील या 21 वर्षीय तरुणाचा मयूर शार्दुल नामक तरुणाने तसेच त्याच्या दोन भावांनी जबर मारहाण करीत निखिल पाटील या तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षापासून निखिल पाटील हा मयूर शार्दुल याचा खास मित्र होता. गेले अनेक वर्ष परिसरात दोघांची मैत्री होती. मात्र…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतित समधानी यांच्यावर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून असून त्यांची टीम स्वर कोकिळा यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांनी तातडीने डॉक्टरांना व्हेंटिलेटरवर हलवले. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक २४ तास रुग्णालयात हजर असते. ६-७ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढण्यात आले होते बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना ६-७ दिवसांपूर्वी डॉक्टरांनी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढले होते. तेव्हा डॉक्टर प्रतित समधानी यांनी सांगितले होते की त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकण्यात आले आहे, परंतु ते आयसीयूमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडत असल्याचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आपले मौखिक आरोग्य आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करीत असते. त्यासाठी नियमित दंत तपासणी करणे महत्वाचे ठरते. “निरोगी शरीर, उत्तम मन, उत्तम आचरण” हा मंत्र मौखिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतशल्यचिकित्सा विभागातर्फे मौखिक आरोग्य दिनानिमित्त रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दोन्ही उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.संपदा गोस्वामी उपस्थित होते. प्रस्तावनामध्ये विभाग प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांनी कार्यक्रम घेण्यामागील…

Read More

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कजगाव सह परिसरात अवैध धंदे सोप्या व खुलेआम पद्धतीने जोमात सुरू आहे स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयिस्करपणे कानाडोळा करीत आहे पोलीस प्रशासन कारवाई केली मात्र नावाने , नागरिकांना कठोर कारवाईची अपेक्षा होती तरी प्रशासन या यावर कठोर पाऊल उचलावे अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होत आहे, हे धंदे सोप्या पद्धतीने खुलेआम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? या सुरू असलेल्या अवैध धंद्याची सर्वसाधारण ग्रामस्थांना माहिती आहे, पण स्थानिक पोलिस प्रशासनाला याची माहिती नाही का असे सर्वसाधारण प्रश्न उपस्थित होत आहे. या अवैध धंद्यात मुळे लोकांची लुबाडणूक होत आहे अनेक घरात कलह वाढले आहे घरातील व्यसनाधीन…

Read More

यावल, प्रतिनिधी । अवैध सावकारी प्रकरणात यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणातील यावल शहरातील दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील जप्त केलेला मुद्देमाल यावल न्यायालयाच्या आदेशानुसार टीव्ही,फ्रीज,मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत केल्या.या कारवाईमुळे यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या एका गरीब नागरिकाने यावल शहरातील एका दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते या रकम व्याजापोटी सावकाराने 1 लाख 35 हजार रुपये अव्वाचे व्याज वसूल केल्यावर सुद्धा सावकाराने तारण ठेवलेले टिव्ही,फ्रिज,मोबाईल,परत न करता पुन्हा व्याज वसुलीची धमकी देत होता सावकाराच्या या मनमानी बेकायदेशीर कृत्यास तक्रारदार वैतागला होता त्यामुळे त्यांनी यावल पोलीस स्टेशनला यावल पोलीस…

Read More