मुंबईः करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दहा महिन्यांपासून बंद असेली लोकल आजपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, लोकल अनलॉक होताच तिकीट स्थानकांवर तिकीटासाठी प्रवाशांची गर्दी उसळली आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही…
Author: saimat team
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच कार्यकर्ते आणि सामान्यांशी जोडलेले असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज तब्बल 14 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले . असं असलं तरी अजित पवार यांनी नागरिकांच्या भेटीसाठीही स्वतंत्र वेळ दिल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे . आपल्या मतदारसंघासह परिसरातील जनतेला कामानिमित्त मुंबई पुण्याला यावं लागू नये यासाठी अजित पवार आपला एक दिवस बारामतीसाठी देतात. 1991 पासून नागरिकांसाठी अजित पवार वेळ देतात. त्यामुळंच इथली जनता पवार कुटुंबियांवर भरभरुन प्रेम करत असल्याचं ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर सांगतात. इथं येणाऱ्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण झालं की नाही याबद्दलही आढावा घेतला जातो. आजही अनेक नागरिक…
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. या सोहळ्याला राजकीय नेत्यांची मांदियाळी जमली होती. या आनंद सोहळ्यात विरोधी पक्षनेते, मादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांनी गळाभेट घेतली. त्यामुळे एरवी राजकीय मैदानात एकमेकांवर टिकेची तोफ डागमारे दोन नेत्यांनी गलाभेट घेतल्यानंतर हा चर्चेचा विषय बनला. मात्र, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली व म्हणाले, “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” “आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील…
नवी दिल्ली : केंद्र सरकार यंदा सरकारी विमा कंपनी एलआयसीचा (LIC) आयपीओही बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. अर्थमंत्र्यांनी देशातील वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद केली. त्यानंतर सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवणार असल्याची सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात देशातील सरकारी वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. याद्वारे सरकारी बँकांच्या विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे. याचबरोबर देशात विमा क्षेत्र वाढत चालले आहे. त्यासाठीही एक विशेष घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांनी विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या घोषणा केली.आतापर्यंत विमा क्षेत्रात असणारी ४९ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचा…
जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ वेस्ट आयोजित रोटरी प्रीमियर लीगच्या तिसर्या पर्वात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी डॉ. राजेश पाटील यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करून स्पर्धेचा प्रारंभ केला. सामाजिक प्रकल्पाच्या निधी उभारणीसाठी हा सामना आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास रामानंदनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, डिस्ट्रिक्ट स्पोर्टस कमिटी चेअरमन अॅड.सुरज जहाँगीर, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे,गनी मेमन,डॉ.तुषार फिरके, वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते,मानद सचिव केकल पटेल, प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगिता पाटील, डॉ.राजेश पाटील, महेश सोनी, ललित मणियार, अतुल कोगटा आदींसह सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व मानद सचिवांची प्रमुख उपस्थिती होती. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले. मॅन ऑफ…
जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील पांडे चौक येथे दि. २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान विविध शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत जनधन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन, स्मार्ट आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ. योजनांचा समावेश आहे. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिबिराचे उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, शोभा चौधरी, प्रताप…
जळगाव ः प्रतिनिधी जागतिक शांतीसाठी एक पाऊल या संकल्पने अंतर्गत ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागाच्या जळगाव शाखेतर्फे जागतिक शांती आणि समृद्धीसाठी रविवार दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ८.१५ वाजता शांतीयात्रेचे आयोजन केले आहे. ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे ंसन २०२१ हे वर्ष विश्व शांतीसाठी युवक अर्थात् यूथ फॉर ग्लोबल पीस म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिवसापासून या उपक्रमाची सुरुवात झालेली असून १२ ऑगस्ट अर्थात आंतर राष्ट्रीय युवक दिवसापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.त्याअनुषंगाने प्रथम कार्यक्रम …जागतिक शांतीसाठी एक पाऊल… हा असून जळगाव ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी स्थित सेवाकेंद्रातर्फे रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे व्होकेशनल महिन्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सहा व्यक्तींना व्होकेशनल अॅवार्ड प्रदान करुन गौरविण्यात आले त्यात चार पिढ्यांपासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मुर्त्या घडविणारे सुधाकर दशपुत्रे, पती निधनानंतर दोन मुलींचे संगोपन करीत रिक्षा चालविणार्या लीना सोनवणे, २८ वर्षांपासून टेलरिंग काम करणारे धर्मेद्र चौहान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील गेव दरबारी,२४ वर्षे अकौटंट म्हणून काम करणारे नागेश सुतार, २७ हजार विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविणारे तरुण भाटे यांचा कुटुंबीयांसह पुरस्कार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, अध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे, व्होकेशनल कमेटी चेअरमन कमलेश वासवानी यांची व्यासपीठावर प्रमुख…
जळगाव ः प्रतिनिधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद जयप्रकाश व एचओडी डॉक्टर बनसोडे यांचा फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे सन्मान पत्र,,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र ,शाल देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश यांनी जळगाव सामान्य रुग्णालयात तसेच सर्वसामान्य रुग्णांसाठी व शासकीय जन आरोग्य सेवांमध्ये जळगावचा प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शासकीय महाविद्यालयाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट डॉक्टर संजय बनसोडे यांनी दोन महिलांच्या पोटांमधून फुटबॉल एवढ्या व्यासाचे दोन गाठी काढून त्या गरीब महिलांना जीवनदान दिले म्हणून डॉक्टर संजय बनसोडे यांचा सुद्धा सन्मानपत्र ,स्मृतिचिन्ह, शाल देऊन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जळगाव कोविड केअर युनिट…
शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या निधीतील कामे पूर्वीच ठरलेली असल्याने जिल्हा नियोजन समितीतून १० कोटींचा विशेष निधी मिळावा, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केल्याची माहिती नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी दिली. शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधीतील कामांचे प्रत्येक प्रभागाला ४० लाख याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते. मात्र अगोदरच झालेल्या महासभेत इतर कामांना मंजुरी देण्यात आल्याचे लक्षात आल्याने नव्याने सुचवलेली कामे थांबणार होते. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच पालकमंत्री पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून डीपीडीसीतून…