Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात शहरात मजूर फेडरेशनतर्फे अन्नदान करण्यात आले. फेडरेशनतर्फे करण्यात आलेल्या या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात मजूर फेडरेशनतर्फे शहरात लॉकडाऊन काळात दररोज अडीच हजार लोकांना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली होती. या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फेडरेशनचे पदाधिकारी सभापती लिलाधर तायडे, संचालक वाल्मिक पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, करीम सालार,…

Read More

भारतीय महिला संघाने मार्च २०२० मध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. एकदिवसीयचा विचार केल्यास संघाने अखेरचा सामना ६ नोव्हेंबर २०१९ रोजी खेळला. म्हणजे ४५५ दिवसांपासून संघाने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. ही दशकातील आतापर्यंतची सर्वात मोठी विश्रांती ठरली आहे. आता दक्षिण आफ्रिका संघ मार्चमध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील. मालिकेची तारीख व ठिकाण अद्याप घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे याच मालिकेतून यजमान भारताच्या महिला संघाला वनडे सामन्याच्या निमित्त्याने दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरण्याची माेठी संधी आहे. त्यामुळे ही मालिका महिला संघाच्या खेळाडूंसाठी पर्वणीच ठरणारी आहे. २००० : पुरुष संघाने…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी येथे नाभिक समाजातर्फे आयोजित नाभिक समाज तालुका मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम संत सेना महाराज, जिवाजी महाले, वीरभाई कोतवाल, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  कार्यक्रमास नानाभाऊ शिरसाठ (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), कार्यक्रमाचे मार्गदर्शक रामभाऊ शंकर टोंगे (ज्येष्ठ समाजसेवक मुक्ताईनगर) तर प्रमुख पाहुणे म्हणून  कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे,  चंद्रकांत शिंदे, कुमार श्रीरामे, शिवाजीराव बहाडकर, जगदीश वाघ, संजय वाघ, भिकन बोरसे, प्रशांत बानाईत, युवा उद्योजक कुणाल गालफाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष्मीकांत सावखेडकर, डी.एस.चौधरी, भैय्या वाघ उपस्थित होते. त्यानंतर त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालयातर्फे ‘विकेल ते पिकेल’ योनजे अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पनेवर आधारीत शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत  सोनवणे, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी आर.आर.चौधरी व नगरपालिका मुख्याधिकारी, अविनाश गागुंडे, पं.स.मुख्याधिकारी श्री.कासोदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा महेंद्र साळुंखे, महेंद्र महाजन, कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषि विभागातील सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. याप्रसंगी बळीराजा सेंद्रिय शेती…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी खलाणे मोटार ड्रायव्हींग स्कूल, हरिओम आयटीआय व ऑनलाईन पीयूसी सेंटर यांच्या सौजन्याने आयोजित ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्यामजी लोही यांच्याहस्ते करण्यात आले. रस्त्यावर आपण स्वतःची व दुसर्‍यांची काळजी घेऊन कशा पद्धतीने ड्रायव्हिंग करायची याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. संस्थेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी देखील रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रसार करण्यासाठी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भिमराव खलाणे तसेच नानासाहेब रावते (संचालक, शितल मोटर्स), उपशहरप्रमुख वसीम चेअरमन, रघुनाथ कोळी (मच्छी विक्रेता संघ- शहर तालुका सचिव), बापू शिंदे, डॉ.दादाराव वाघ, प्रभाकर दिवनाले (धर्मगुरू, धर्मपीठ,…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी पाडळसरे धरणावर येत असून ते धरणाची सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी तापी खोरे विकास महामंडळासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक देखील घेणार आहेत व धरणाबाबत चर्चा करणार आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता जलसंपदामंत्री यांचे पाडळसरे येथे आगमन होणार आहे. त्यानंतर धरणावरच अमळनेर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार असून यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, आ.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करतील. पाडळसरे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम होईल. त्यानंतर पाडळसरे येथून अमळनेर येथे प्रयाण होईल. २.१५ ते ३ हा वेळ राखीव राहील. अमळनेर येथून पारोळाकडे रवाना होतील. याठिकाणी…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी सीईडी फाऊंडेशन व एमएसएमई भारत सरकारतर्फे सर्वेक्षण निकषानुसार राष्ट्रीय पातळीवर सीबीएसई पॅटर्नच्या २४००० विद्यालयापैकी निकषपूर्तता करणार्‍या ९०० विद्यालयातर्फे ‘५ स्टार रेटिंग’ मानांकनसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामध्ये टॉप १०० विद्यालयांची रेटिंगसाठी निवड झाली. यामध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या सीबीएसई विद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर टॉप १०० मध्ये ५७ वे स्थान प्राप्त केले. विद्यालयातील भौतिक सुविधा व परिसर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, सुदृढ विद्यार्थी निर्मितीसाठी क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळात मिळविलेले यश, विविध स्पर्धा परीक्षेतील कामगिरी, विद्यार्थ्यांना परीक्षा भीती घालविण्यासाठी केलेली तणावमुक्त वातावरण निर्मिती, शालेय स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी केलेली भरीव कामगिरी अशा १०० विविध…

Read More

ज्योतिष शास्त्र के अनुसार कुलदेवी का महत्व  नमस्ते  मै रविंद्र धुप्पड और नेहा पटेल आपका ASTRO SURYA चॅनल में स्वागत करते है हमारे नये नये व्हिडिओ देखने के लिए चॅनल को Subscribe करीये इस लेख के साथ हमने कुलदेवी का एक शॉर्ट व्हिडिओ भेजा है कुलदेवी दोष, निवारण इसके बारे मे अधिक जानना चाहते हो तो यू ट्यूब पर हमारे 2 व्हिडिओ देख सकते हो इस लेख मे हम कुलदेवी के बारे मे चर्चा करेंगे आप कितनी भी पूजा पाठ कर लो… जब तक कुलदेवी या पितृ प्रसन्न नही होंगे तब तक कोई भगवान प्रसन्न नही होंगे पुराने लोग शुभ…

Read More

मुंबई :- जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या संत्रा या फळपिकाची गुणवत्ता व दर्जा सुधारून ती निर्यातक्षम केली जाणार आहे. त्यासाठी सिट्रस प्रकल्प उभारला जाणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ  होणार असल्याचे शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रकल्पाबाबत राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी मुंबईत बैठक घेऊन अधिकारी वर्गासोबत चर्चा केली व याप्रकरणी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अचलपूर मतदार संघात 26 हजार हेक्टर जमिनीवर संत्रा बागा आहेत.मात्र आतापर्यत दर्जा व गुणवत्ता सुधारण्याची कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळायचा. हा प्रकल्प स्थापन झाल्यावर चांदुर बाजार,अचलपूर,धारणी,अचलपुर,दर्यापूर, वरूड, मोर्शी, चिखलदरा व आकोटपर्यंतच्या संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना फायदाच होणार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मनपा आयुक्तांनी या परिसरातील भागांची पाहाणी करून नागरीकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी या परिसरातील नागरीकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत. तसेच कचराकुंड्यामधील कचरा रस्त्यावरच पडलेला असल्याने या परिसरातील नागरीकांना अशाच घाणीच्या साम्राज्यातून ये-जा करावी लागत आहे. नुकत्याच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीयुक्त परिसरातून वापर…

Read More