जळगाव : प्रतिनिधी रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे वर-वधू मेळावा-२०२१ च्या सूचीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दिलीप महाजन (पाळधी), ज्येष्ठ समाजसेवक धोंडीबा महाजन, उद्योजक संजय महाजन, प्रदीप महाजन उपस्थित होते. पोलीस दलातील एकनाथ महाजन यांचा सत्कार करण्यात आला. विजय महाजन, जयंत इंगळे, शरद मोरे, सुनील महाजन, गोपाळ चौधरी, वाय.एस. महाजन, डी.बी. महाजन, धनराज माळी, वैशाली महाजन यांनी सहकार्य केले.
चोपडा ः प्रतिनिधी दिल्ली येथे पंजाब,हरियाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी २६ जानेवारीला निघालेल्या ट्रॅक्टर रलीमधे झालेल्या गोंधळाची स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी त्या गोंधळाची जबाबदारी आंदोलक शेतकर्यांवर टाकुन त्यांचीच धरपकड व मुस्कटदाबी करणार्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी व तेल,पेट्रोल,गॅस व डिझेल महागाई विरोधात,तसेच स्वामीनाथन समिती शिफारसीनुसार शेत मालास भाव मिळावा म्हणून येत्या ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यनिथीला म्हणजेच हुतात्मादिनी चोपडा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी १० वा तालुक्यातील लालबावटा शेतमजूर युनियन किसान सभा व आयटक कार्यकर्त्यांतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील कॉंग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी व समविचारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान संघर्ष…
जळगाव ः प्रतिनिधी पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन, जळगाव जिल्हा या संघटनेची शासन दरबारी नोंदणी होऊन महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने संलग्नता दिली आहे. राज्य संघटनेचे विविध गटातील स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्र प्राप्त झाले असून त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दरम्यान, नूतन मराठा महाविद्यालयात संघटनेचे व्हॉलीबॉल क्रीडांगण सुरू करण्यात आले असून त्याचे विधिवत पूजन सर्वात लहान खेळाडू प्रेम क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, सचिव अंजली पाटील, विनोद पाटील, मिलिंद काळे , इफतेखार अहमद शेख, दर्शन आटोळे, जाहेद शेख, भाऊसाहेब पाटील, बास्केटबॉल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील महामार्गावर होणार्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते. खासदार खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचना फलक ठिकठिकाणी…
जळगाव : प्रतिनिधी मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ५६३ सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडत आज तालुस्तरावर व महिला सरपंच पदांसाठी प्रांताधिकारी स्तरावर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आरक्षण सोडतीबाबत ग्रामीण जनतेत कमालीची उत्सुकता दिसून आली. जळगाव तालुका स्तरावरील सरपंच पदासाठीची सोडत आज सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालयात काढण्यात आली. संमेत योगेश नन्नवरे या विद्यार्थ्याने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. त्यावेळी सभागृहातील ग्रामीण भागातील इच्छुक सरपंचांच्या चेहर्यावर उत्सुकता दिसून आली. आज झालेल्या सोडतीत हाती आलेल्या वृत्तानुसार सावखेडे बु. (एस.टी.), दापोरे (ओबीसी), धानोरे बु. (सर्वसाधारण), कानळदा (ओबीसी), जळगाव खुर्द (एस.सी.), वडनगरी (सर्वसाधारण), किनोद (ओबीसी) , वसंतवाडी (ओबीसी), निमगाव बु. (ओबीसी), बिलवाडी (ओबीसी), लोणवाडी बु. (एस.टी.),…
जळगाव : प्रतिनिधी आपण ग्लोबलच्या नादात लोकल विसरत चाललो आहोत. सरकारच्या धोरणांमुळे इतर भाषांकडे जाण्याचा कल वाढतोय, मात्र मराठी अनिवार्य करणे आवश्यक आहे, असे मत इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. मुक्ता महाजन यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विद्यापीठे व महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांना मराठीचे अध्यापन सक्तीचे असावे या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन गुगल मीटव्दारे करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आजच्या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु.पगारे होते. प्रा.आशुतोष पाटील यांनी त्रिभाषा सुत्राबद्दल माहिती देवून मराठीला विशेष…
जळगाव : प्रतिनिधी ठाणे येथे झालेल्या स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट या जिल्हा संघटनेला संलग्नता देण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष रेवती नगरकर असून सचिव फारुक शेख हे आहेत. राज्य संघटनेचे सचिव झुबिन अमेरीया यांनी जळगावच्या स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्टचे सचिव फारूक शेख यांना हे सलग्नता प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी कमलेश नगरकर उपस्थित होते. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राला ३३ पैकी २८ जिल्हे संलग्न असून या महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनला स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सुद्धा मान्यता आहे. अनधिकृत संघटनेच्या स्पर्धेत खेळू नका अनधिकृत संघटनेच्या बॅनर खाली होणार्या स्पर्धेत आपल्या खेळाडू, पाल्यांना भाग…
अमळनेर ः प्रतिनिधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज-२०२१ स्पर्धेत अमळनेर येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी अजय पाटील हिची निवड झाली असून नुकतीच पुणे येथे उपग्रह निर्मीतीची कार्यशाळा संपन्न झाली. डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक, आशिया, इंडिया रेकॉर्डसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विद्यार्थ्यांना सामील होता येईल. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये हे विद्यार्थी…
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धरणगाव तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव भोलाणे यांनी विभूषित केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक आत्माराम पाटील,मुख्याध्यापक प्रशांत नेमाडे तसेच ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र चौधरी,विकास शिरसाट,वाय.जी. पाटील,आर.टी.माळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले