जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे व्होकेशनल महिन्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सहा व्यक्तींना व्होकेशनल अॅवार्ड प्रदान करुन गौरविण्यात आले त्यात चार पिढ्यांपासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मुर्त्या घडविणारे सुधाकर दशपुत्रे, पती निधनानंतर दोन मुलींचे संगोपन करीत रिक्षा चालविणार्या लीना सोनवणे, २८ वर्षांपासून टेलरिंग काम करणारे धर्मेद्र चौहान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील गेव दरबारी,२४ वर्षे अकौटंट म्हणून काम करणारे नागेश सुतार, २७ हजार विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविणारे तरुण भाटे यांचा कुटुंबीयांसह पुरस्कार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, अध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे, व्होकेशनल कमेटी चेअरमन कमलेश वासवानी यांची व्यासपीठावर प्रमुख…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद जयप्रकाश व एचओडी डॉक्टर बनसोडे यांचा फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे सन्मान पत्र,,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र ,शाल देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश यांनी जळगाव सामान्य रुग्णालयात तसेच सर्वसामान्य रुग्णांसाठी व शासकीय जन आरोग्य सेवांमध्ये जळगावचा प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शासकीय महाविद्यालयाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट डॉक्टर संजय बनसोडे यांनी दोन महिलांच्या पोटांमधून फुटबॉल एवढ्या व्यासाचे दोन गाठी काढून त्या गरीब महिलांना जीवनदान दिले म्हणून डॉक्टर संजय बनसोडे यांचा सुद्धा सन्मानपत्र ,स्मृतिचिन्ह, शाल देऊन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जळगाव कोविड केअर युनिट…
शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या निधीतील कामे पूर्वीच ठरलेली असल्याने जिल्हा नियोजन समितीतून १० कोटींचा विशेष निधी मिळावा, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केल्याची माहिती नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी दिली. शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधीतील कामांचे प्रत्येक प्रभागाला ४० लाख याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते. मात्र अगोदरच झालेल्या महासभेत इतर कामांना मंजुरी देण्यात आल्याचे लक्षात आल्याने नव्याने सुचवलेली कामे थांबणार होते. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच पालकमंत्री पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून डीपीडीसीतून…
जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाउण्डेशन गांधी तीर्थच्यावतीने महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त आज दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा गांधी उद्यानात भावांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते होत आहे.त्यात प्रामुख्याने महात्मा गांधीजींच्या अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारीत अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन, जे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान नागरिकांना विनामूल्य पाहता येईल तसेच दि.३० रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ दरम्यान् गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची …द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शो देखील दाखविले जाणार…
जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर घोटाळ्यातील झाडाझडतीच्या वेळेस सापडलेले जिल्हा परिषदमधील बनावट शिक्के हे शालेय पोषण या घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समोर आले होते.या घोटाळ्याविरोधात सन २०१४ पासून लढा देणारे रविंद्र शिंदे हे लवकरच याबाबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे पुराव्यांसह तक्रार देणार असल्याचे वृत्त आहे.यानिमित्ताने ‘बीएचआर’नंतर आता शालेय पोषण घोटाळ्यातही सुनिल झंवरच्या भोवतीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सदरचा गुन्हा हा आर्थिक गुन्हा असल्याने व ठेकेदारासोबत झालेला करारनामा हा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत पुणे येथे झाला असल्याने याबाबतचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे दाखल करण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती शालेय…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.…
जळगाव ः प्रतिनिधी येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे वर-वधू मेळावा-२०२१ च्या सूचीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दिलीप महाजन (पाळधी), ज्येष्ठ समाजसेवक धोंडीबा महाजन, उद्योजक संजय महाजन, प्रदीप महाजन उपस्थित होते. पोलीस दलातील एकनाथ महाजन यांचा सत्कार करण्यात आला. विजय महाजन, जयंत इंगळे, शरद मोरे, सुनील महाजन, गोपाळ चौधरी, वाय.एस. महाजन, डी.बी. महाजन, धनराज माळी, वैशाली महाजन यांनी सहकार्य केले.
चोपडा ः प्रतिनिधी दिल्ली येथे पंजाब,हरियाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी २६ जानेवारीला निघालेल्या ट्रॅक्टर रलीमधे झालेल्या गोंधळाची स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी त्या गोंधळाची जबाबदारी आंदोलक शेतकर्यांवर टाकुन त्यांचीच धरपकड व मुस्कटदाबी करणार्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी व तेल,पेट्रोल,गॅस व डिझेल महागाई विरोधात,तसेच स्वामीनाथन समिती शिफारसीनुसार शेत मालास भाव मिळावा म्हणून येत्या ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यनिथीला म्हणजेच हुतात्मादिनी चोपडा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी १० वा तालुक्यातील लालबावटा शेतमजूर युनियन किसान सभा व आयटक कार्यकर्त्यांतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील कॉंग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी व समविचारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान संघर्ष…
जळगाव ः प्रतिनिधी पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन, जळगाव जिल्हा या संघटनेची शासन दरबारी नोंदणी होऊन महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने संलग्नता दिली आहे. राज्य संघटनेचे विविध गटातील स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्र प्राप्त झाले असून त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दरम्यान, नूतन मराठा महाविद्यालयात संघटनेचे व्हॉलीबॉल क्रीडांगण सुरू करण्यात आले असून त्याचे विधिवत पूजन सर्वात लहान खेळाडू प्रेम क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, सचिव अंजली पाटील, विनोद पाटील, मिलिंद काळे , इफतेखार अहमद शेख, दर्शन आटोळे, जाहेद शेख, भाऊसाहेब पाटील, बास्केटबॉल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील महामार्गावर होणार्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते. खासदार खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचना फलक ठिकठिकाणी…