Author: saimat team

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी तालुक्यातील सालबर्डी व कोथळी येथील श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला सायंकाळी, विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम मंदिर निधी संकलनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे व भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे एकाच मंचावर आले. खडसे परिवाराने मंदिरासाठी १ लाख २२ हजारांचा निधी दिला. सालबर्डीतून ३१ हजार २०० आणि कोथळीतून २५ हजार २३७ रुपयांचा निधी संकलित झाला. अयोध्येत उभारले जाणारे श्रीराम मंदिर विश्वातील तिसरे भव्य मंदिर असेल. या कार्यात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले. कार्यक्रमाला तृृृप्ती राणे, माजी सरपंच तुषार राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सहप्रमुख…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची आहे. त्यात आता ४२ कोटींच्या निधीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच अडचणींवर मात करत दोन महिन्यात ७० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना सुरूवात करण्यात येईल, अशी घोषणा आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे. शहराच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातील २५ जणांची समिती स्थापन करून त्या माध्यमातून या कामांना चालना देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहरातील नागरीक आता लोकप्रतिनिधींकडून केवळ रस्ते दुरूस्तीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक वर्षात कोणत्याही ठोस विकास कामांना सुरूवात नसलेल्या शहरात चालणेही कठीण झाले आहे. नगरसेवकांपासून आमदारांपर्यंत केवळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रारंभ रविवारी सकाळी पालकमंत्री ना.पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एम.एन. पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…

Read More

मुंबईः करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दहा महिन्यांपासून बंद असेली लोकल आजपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, लोकल अनलॉक होताच तिकीट स्थानकांवर तिकीटासाठी प्रवाशांची गर्दी उसळली आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही…

Read More

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  हे नेहमीच कार्यकर्ते आणि सामान्यांशी जोडलेले असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज तब्बल 14 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले . असं असलं तरी अजित पवार यांनी नागरिकांच्या भेटीसाठीही स्वतंत्र वेळ दिल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे . आपल्या मतदारसंघासह परिसरातील जनतेला कामानिमित्त मुंबई पुण्याला यावं लागू नये यासाठी अजित पवार आपला एक दिवस बारामतीसाठी देतात. 1991 पासून नागरिकांसाठी अजित पवार वेळ देतात. त्यामुळंच इथली जनता पवार कुटुंबियांवर भरभरुन प्रेम करत असल्याचं ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर सांगतात. इथं येणाऱ्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण झालं की नाही याबद्दलही आढावा घेतला जातो. आजही अनेक नागरिक…

Read More

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत  यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. या सोहळ्याला राजकीय नेत्यांची मांदियाळी जमली होती. या आनंद सोहळ्यात विरोधी पक्षनेते, मादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि खासदार संजय राऊत यांनी गळाभेट घेतली. त्यामुळे एरवी राजकीय मैदानात एकमेकांवर टिकेची तोफ डागमारे दोन नेत्यांनी गलाभेट घेतल्यानंतर हा चर्चेचा विषय बनला. मात्र, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली व म्हणाले, “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” “आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील…

Read More

नवी दिल्ली : केंद्र सरकार यंदा सरकारी विमा कंपनी एलआयसीचा (LIC) आयपीओही बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. अर्थमंत्र्यांनी देशातील वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद केली. त्यानंतर सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवणार असल्याची सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात देशातील सरकारी वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. याद्वारे सरकारी बँकांच्या विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे. याचबरोबर देशात विमा क्षेत्र वाढत चालले आहे. त्यासाठीही एक विशेष घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांनी विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या घोषणा केली.आतापर्यंत विमा क्षेत्रात असणारी ४९ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ वेस्ट आयोजित रोटरी प्रीमियर लीगच्या तिसर्‍या पर्वात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी डॉ. राजेश पाटील यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करून स्पर्धेचा प्रारंभ केला. सामाजिक प्रकल्पाच्या निधी उभारणीसाठी हा सामना आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास रामानंदनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, डिस्ट्रिक्ट स्पोर्टस कमिटी चेअरमन अ‍ॅड.सुरज जहाँगीर, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे,गनी मेमन,डॉ.तुषार फिरके, वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते,मानद सचिव केकल पटेल, प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगिता पाटील, डॉ.राजेश पाटील, महेश सोनी, ललित मणियार, अतुल कोगटा आदींसह सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व मानद सचिवांची प्रमुख उपस्थिती होती. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले. मॅन ऑफ…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील पांडे चौक येथे दि. २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान विविध शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत जनधन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन, स्मार्ट आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ. योजनांचा समावेश आहे. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिबिराचे उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, शोभा चौधरी, प्रताप…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जागतिक शांतीसाठी एक पाऊल या संकल्पने अंतर्गत ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागाच्या जळगाव शाखेतर्फे जागतिक शांती आणि समृद्धीसाठी रविवार दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ८.१५ वाजता शांतीयात्रेचे आयोजन केले आहे. ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे ंसन २०२१ हे वर्ष विश्व शांतीसाठी युवक अर्थात् यूथ फॉर ग्लोबल पीस म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिवसापासून या उपक्रमाची सुरुवात झालेली असून १२ ऑगस्ट अर्थात आंतर राष्ट्रीय युवक दिवसापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.त्याअनुषंगाने प्रथम कार्यक्रम …जागतिक शांतीसाठी एक पाऊल… हा असून जळगाव ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी स्थित सेवाकेंद्रातर्फे रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी…

Read More