जळगाव ः प्रतिनिधी जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिन अध्यापिका महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. याठिकाणी होनेसटी शॉपचे इन्स्टॉलेशन तसेच एकात्मताची शपथ विद्यार्थीना देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख सुवर्णा चौधरी मॅडम यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले तसेच जिनल जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष सुशील अगरवाल, सचिव सुवर्णा चौधरी, भारती काळे, ललित नेमाडे, अर्चना सूर्यवंशी, कुलदीप बुवा, विशाल शर्मा, राकेश कंडारे, योगेश वाणी, फिरोज शेख प्रकल्प प्रमुख जेसी कुलदीप बुवा यांनी परिश्रम घेतले
Author: saimat team
कासोदा ता.एरंडोल ःप्रतिनिधी भारतीय पत्रकार महासंघ एरंडोल तालुका अध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नंदलाल मराठे, जिल्हाध्यक्ष (शहर ) हेमंत काळुंखे, सरचिटणीस संजीव शिरसाठ, एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर, चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे, ग्रामीण…
जळगाव ः प्रतिनिधी येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दि. ९ रोजी सकाळी ९.३० वाजता मेहरुण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील पत्रकार संतोष ढिवरे यांची प्रकृती काही दिवसापूर्वी खालावली होती. त्यांच्या प्रकृतीत जळगाव येथे उपचारात कुठलीही प्रगती होत नसल्याने त्यांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले होते. दि.८ रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संतोष ढिवरे हे सायंदैनिक ‘साईमत’सह ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत होते. ते सुमारे १० ते १५ वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते. महाराष्ट्र…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील रायपूर व कुसुंबाजवळील काढण्यात आलेल्या डीपीविषयी वृत्त ‘साईमत’ वृत्तपत्रात प्रकाशित होताच महावितरण कंपनीतर्फे डीपी बसविण्यात आली. यामुळे रायपूर येथे विजेच्या सप्लायअभावी बंद असलेला पाणीपुरवठा पुर्ववत सुरू झाला आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. रायपूर गावाला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाजवळच काही अंतरावर रायपूर येथे पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर आहे. तालुक्यातील रायपूर-कुसुंबा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच डीपी बसविण्यात आली होती. परंतु महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व अडथळा ठरत असल्यामुळे ही डीपी काढण्यात आली होती. पुरेसा विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद…
जळगाव : प्रतिनिधी येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे आज सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. संतोष ढिवरे यांच्यावर मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी होते.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील बेटावद बु॥ येथील २५ हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेटावद बु॥ येथील शेतरी उखर्डू तोताराम काळे (वय ७१) यांच्या मालकीची ट्रॅक्टर व ट्रॉली आहे. त्यांनी त्यांच्या बोदवड रोडवरील शेतात ट्रॉली (क्र.एम.एच.२८-ई-१८५५) ही लावून ठेवली होती. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ही ट्रॉली चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जामनेर पोलीसात काळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जनार्दन सोनोने हे करीत आहेत.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हलखेडा येथे औषधीला वापरात येणारी काळी हळद देतो असे म्हणत एका व्यापार्याची ८६ हजाराची फसवणूक केली. तसेच त्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुर्हा येथील शुभम संजय पाटील याने औषधीसाठी लागणारी काळी हळद देतो असे सांगत गुजरातमधील व्यापारी साकीर अमहद हासीन आमलीवाला (वय ४५, रा. वालाड, जि.वापी) यास गुगल पे वरुन ८६ हजार ३०० रुपये मागवून घेतले होते. साकीर याने औषधीची हळद का दिली नाही म्हणून जाब विचारला असता शुभम पाटील हा टाळाटाळ करीत होता. शेवटी साकीर यांनी पाटील यास…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी शिवारातील एकाची दुचाकी शेतातून लांबविल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नेरी येथील शेतमजुर रईसखान महेमुदखान पठाण (वय २६) हे शेतीकामानिमित्त नेरी-वडगाव शिवारातील अनिल परशुराम पाटील यांच्या शेतासमोर त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९-डीपी.८११६) ही ५ फेब्रुवारी रोजी लावली होती. काम आटोपल्यानंतर घरी जातांना दुचाकी लावल्याच्या जागी त्यांना दुचाकी दिसून आली नाही. शेतशिवार परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध लावला असता दुचाकी मिळून आली नाही. म्हणून पठाण यांनी पाचोरा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल असून पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आते.
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात महाराजस्व अभियान-२०२० राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत संगणकीकृत ७/१२ अद्यावतीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने पाचोरा उपविभागात कामकाज सुरु आहे. जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्रानुसार ज्या संगणकीकृत ७/१२ उतार्यामध्ये टंकलिखित चुका झालेल्या आहेत.त्या चुका दुरुस्तीसाठी पाचोरा व भडगाव तालुकास्तरावर ८ ते १५ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या विशेष शिबिरामध्ये ७/१२ दुरुस्तीसाठी नविन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरुन खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करुन मान्यता देणे, परिशिष्ट-क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी…
जळगाव : प्रतिनिधी प्रायोगिक रंगभूमी ही आजच्या काळात सशक्त करण्यासाठी जळगावची परिवर्तन संस्था करतेय. परिवर्तनची नाट्य निर्मिती ही सशक्त व नावीन्यपूर्ण असून मराठी रंगभूमी समृद्ध व सशक्त बनतेय.असे मत अभिनेते ओकांर गोवर्धन यांनी पुणे येथे आयोजित परिवर्तन कला महोत्सवाच्या समारोप समारंभात व्यक्त केले. नाटकघर व अतुल पेठे आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाचा समारोप काल संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्या …हंस अकेला… ने करण्यात आला. या समारोप प्रसंगी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, लेखिका गीतांजली वि. म. , अनिल पाटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात कबिराचा शोध परिवर्तनच्या कलावंतांनी उत्तमपणे घेतला. …मन…