जळगाव ः प्रतिनिधी कोरोना’ म्हटले की अजूनही संमिश्र भावना जागी होते कारण कोणाला हे संकट तर कोणाला ती संधी वाटते. गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईनचीच चर्चा होती.जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने पालकांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत १२ सुवर्णपदके प्राप्त करीत जणू विक्रमच केला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ग्रँड ऑनर ऍवार्ड मेडल’ प्राप्त करीत १२ व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथमध्ये स्थान मिळविले आहे.थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेल्या सुनील झंवरचा मुलगा सूरज गेल्या दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. सूरजकडून मिळालेली महत्त्वाची कागदपत्रे, माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांचे कोरे लेटरपॅड झंवरच्या कार्यालयात मिळून आल्याची बाब समोर आली आहे. बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्यात दाखल तीन गुन्ह्यांपैकी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सूरज झंवर याला २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी सूरजला मंगळवारी न्यायालयात हजर केलेे. सूरज याच्याकडून गुन्ह्याशी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र, पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. संशयित आरोपी सुनील झंवर, जितेंद्र कंडारे,…
जळगाव ः प्रतिनिधी येथील सुप्रसिध्द सर्जन तथा स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची सर्जन ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सर्जन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चाप्टर ऑफ असोसिएशन या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. यात स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली. ही निवड जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांमधून करण्यात आली आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याकडे आजमितीस जळगाव येथील आयएमएच्या सचिवपदाचीही जबाबदारी आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांची जळगावातून प्रथमच निवड झाली आहे. असोसिएशनचे आगामी ७ व ८ फेब्रुवारी…
जळगाव : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात शहरात मजूर फेडरेशनतर्फे अन्नदान करण्यात आले. फेडरेशनतर्फे करण्यात आलेल्या या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनच्या पदाधिकार्यांचा गौरव करण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात मजूर फेडरेशनतर्फे शहरात लॉकडाऊन काळात दररोज अडीच हजार लोकांना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली होती. या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फेडरेशनचे पदाधिकारी सभापती लिलाधर तायडे, संचालक वाल्मिक पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, करीम सालार,…
भारतीय महिला संघाने मार्च २०२० मध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. एकदिवसीयचा विचार केल्यास संघाने अखेरचा सामना ६ नोव्हेंबर २०१९ रोजी खेळला. म्हणजे ४५५ दिवसांपासून संघाने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. ही दशकातील आतापर्यंतची सर्वात मोठी विश्रांती ठरली आहे. आता दक्षिण आफ्रिका संघ मार्चमध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील. मालिकेची तारीख व ठिकाण अद्याप घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे याच मालिकेतून यजमान भारताच्या महिला संघाला वनडे सामन्याच्या निमित्त्याने दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरण्याची माेठी संधी आहे. त्यामुळे ही मालिका महिला संघाच्या खेळाडूंसाठी पर्वणीच ठरणारी आहे. २००० : पुरुष संघाने…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी येथे नाभिक समाजातर्फे आयोजित नाभिक समाज तालुका मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम संत सेना महाराज, जिवाजी महाले, वीरभाई कोतवाल, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास नानाभाऊ शिरसाठ (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), कार्यक्रमाचे मार्गदर्शक रामभाऊ शंकर टोंगे (ज्येष्ठ समाजसेवक मुक्ताईनगर) तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, चंद्रकांत शिंदे, कुमार श्रीरामे, शिवाजीराव बहाडकर, जगदीश वाघ, संजय वाघ, भिकन बोरसे, प्रशांत बानाईत, युवा उद्योजक कुणाल गालफाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष्मीकांत सावखेडकर, डी.एस.चौधरी, भैय्या वाघ उपस्थित होते. त्यानंतर त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये…
चोपडा ः प्रतिनिधी येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालयातर्फे ‘विकेल ते पिकेल’ योनजे अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पनेवर आधारीत शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी आर.आर.चौधरी व नगरपालिका मुख्याधिकारी, अविनाश गागुंडे, पं.स.मुख्याधिकारी श्री.कासोदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा महेंद्र साळुंखे, महेंद्र महाजन, कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषि विभागातील सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. याप्रसंगी बळीराजा सेंद्रिय शेती…
चाळीसगाव ः प्रतिनिधी खलाणे मोटार ड्रायव्हींग स्कूल, हरिओम आयटीआय व ऑनलाईन पीयूसी सेंटर यांच्या सौजन्याने आयोजित ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्यामजी लोही यांच्याहस्ते करण्यात आले. रस्त्यावर आपण स्वतःची व दुसर्यांची काळजी घेऊन कशा पद्धतीने ड्रायव्हिंग करायची याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. संस्थेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी देखील रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रसार करण्यासाठी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भिमराव खलाणे तसेच नानासाहेब रावते (संचालक, शितल मोटर्स), उपशहरप्रमुख वसीम चेअरमन, रघुनाथ कोळी (मच्छी विक्रेता संघ- शहर तालुका सचिव), बापू शिंदे, डॉ.दादाराव वाघ, प्रभाकर दिवनाले (धर्मगुरू, धर्मपीठ,…
अमळनेर ः प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी पाडळसरे धरणावर येत असून ते धरणाची सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी तापी खोरे विकास महामंडळासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांची बैठक देखील घेणार आहेत व धरणाबाबत चर्चा करणार आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता जलसंपदामंत्री यांचे पाडळसरे येथे आगमन होणार आहे. त्यानंतर धरणावरच अमळनेर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार असून यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, आ.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करतील. पाडळसरे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम होईल. त्यानंतर पाडळसरे येथून अमळनेर येथे प्रयाण होईल. २.१५ ते ३ हा वेळ राखीव राहील. अमळनेर येथून पारोळाकडे रवाना होतील. याठिकाणी…
चोपडा ः प्रतिनिधी सीईडी फाऊंडेशन व एमएसएमई भारत सरकारतर्फे सर्वेक्षण निकषानुसार राष्ट्रीय पातळीवर सीबीएसई पॅटर्नच्या २४००० विद्यालयापैकी निकषपूर्तता करणार्या ९०० विद्यालयातर्फे ‘५ स्टार रेटिंग’ मानांकनसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामध्ये टॉप १०० विद्यालयांची रेटिंगसाठी निवड झाली. यामध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या सीबीएसई विद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर टॉप १०० मध्ये ५७ वे स्थान प्राप्त केले. विद्यालयातील भौतिक सुविधा व परिसर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, सुदृढ विद्यार्थी निर्मितीसाठी क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळात मिळविलेले यश, विविध स्पर्धा परीक्षेतील कामगिरी, विद्यार्थ्यांना परीक्षा भीती घालविण्यासाठी केलेली तणावमुक्त वातावरण निर्मिती, शालेय स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी केलेली भरीव कामगिरी अशा १०० विविध…