जळगाव, प्रतिनिधी । अनेक अडचणींवर मात करून जिल्हा परिषदेच्या शाळा आगेकूच करत असून दर्जेदार ज्ञानदानाचे काम करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमुळेच मराठी भाषा टिकून असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील नांद्रा येथील जि.प. शाळेला संगणक प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यासोबतच आज नांद्रा येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४४ स्त्री-पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कुमारी क्रिशा हेमंत आगीवाल या बालिकेच्या वाढदिवसानिमित्त नांद्रा जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी क्रिशाचे व तिच्या आई वडिलांचे मन:पूर्वक कौतुक केले.…
Author: saimat team
अमळनेर, प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर शहरातून पळवून नेल्याची घटना ६ रोजी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय मुलगी पुणे जिल्ह्यात एका गावात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील…
मुंबई, वृत्तसंस्था । वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतजमीनच उरलेली नाही. अनेक शहरांतील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे या शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबाऱ्यांचं प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर झालं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सात बारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व…
बुलढाणा, वृत्तसंस्था । बुलढाण्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच हल्ला करण्यात आला आहे. जमावाने शेगाव पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आहे. मध्यरात्री जमावाने थेट पोलीस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव पोलिसांना मध्यरात्री एकच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला. यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यावर ३० जणांचा जमाव धावून गेला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील…
जळगाव, प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे रविवारी सायंकाळी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांना मेणबत्ती लावून तसेच पुष्प अर्पण करून जळगावकर नागरिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी मनजीत जांगीड, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, सागर सोनवणे, शशी महानोर, गायक नयन मोरे, संगीतकार नवल जाधव, प्रा.संजय पत्की, गिरीश कुलकर्णी, मंगला बारी, शरद भालेराव, मिलिंद थत्ते, महेश चिरमाडे, दर्शन पारीख, अविनाश मोघे, प्रकाश जैन, फारूक शेख, अर्जुन भारुडे, एम.पी.पाटील, मोहन गांधी, सागर बागुल, राजू पाटील, प्रीतम शिंदे, मयूर जाधव, भटू अग्रवाल, राम मोरे, आकाश येवले, अक्षय जैन, संदीप सूर्यवंशी, प्रशांत वाणी, जड्डू पाटील, लक्ष्मण…
मुंबई, वृत्तसंस्था । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
जळगाव, प्रतिनिधी । अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद जवळील पाटील नर्सरीजवळ घडली. याप्रकरणी शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भास्कर झाल्टे (वय-२४) रा. पातोंडा ता. नांदूरा जि. बुलढाणा असे मयताचे नाव आहे. किशोर झाल्टे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी काम करून उदरनिर्वाह करत होते.…
मुंबई, वृत्तसंस्था । ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ वर्षी निधन झाले आहे. याप्रकरणी त्यांना न्यूमोनिया झाल्याची लागण झाली होती. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत सदर स्पर्धा या 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ आज जाहीर करण्यात आला तो खालील प्रमाणे; वरुण पाटील (कर्णधार), मानस पाटील, राज राजपूत, तनय प्रसाद, श्लोक महाजन, दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक), यश अग्रवाल, मोहित जगताप, आर्यन पाटील, प्रतीक शिंदे (उपकर्णधार), प्रणव जाधव, केशव ठाकूर, दिविक उपाध्याय, पियुष पवार, आदित्य वाणी, सोहम बडगुजर, अभय वाघमोडे, कृष्णा महाजन, जैनम जैन आणि आर्यन बडगे. जळगाव…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातील वृद्धाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण गिरधर धांडे (वय ७४ वर्ष रा. संचित रणछोड नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना…