चोपडा ः प्रतिनिधी तेली समाजाचा मेळावा शिर्डी येथे दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील राहता रोडवरील सिद्धसंकल्प लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील तेली समाजाच्या जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जळगाव जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी यांनी केले. ते चोपडा येथे नुकत्याच घेण्यात आलेलया तेली समाजाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा म्हणजे तेली समाजाचा एक भव्य मेळावाच आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर उपस्थित राहणार आहेत. ही सभा समाजाच्या दृष्टीने…
Author: saimat team
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक रेशन कार्ड लाभार्थी यांचे आधार लिंक इतर जिल्ह्यात झालेले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी व निवेदने देवूनही पुरवठा विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड काढताना अनेक अडचणी, आधार सीडिंग तसेच स्वस्थ धान्य दुकानावर धान्य कमी मिळणे आदी तक्रारी व निवेदने देवूनही मुक्ताईनगरच्या तहसीलदार अडचणी सोडविण्यास सपशेल अपयशी ठरल्याने दिव्यांग व्यक्तींना शासकीय परिपत्रकानुसार स्वतंत्र लाभार्थी कार्ड बनविणे आणि विधवा महिलांचे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड बनविणे या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे संविधानिक मार्गाने शिवसेना स्टाईल प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाट, तालुका…
मुंबई :- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 1995 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल 8 पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिद्ध आहेत. माहे जानेवारी, 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून…
नाशिक :- समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री. यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. सटाणा येथे देवमामलेदार श्री. यशवंत महाराज स्मारक नूतनीकरण समारंभ प्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड,…
मुंबई:- कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास आर्थिक सहाय्य मिळावे या दृष्टीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविल्या जातात. राज्यातील बहुतांश महाविद्यालयात सध्या कोविडमुळे विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. २०२०-२१ या वर्षी नूतनीकरणासह नवीन अर्ज महाविद्यालय स्तरावरून सामाजिक न्याय…
एअरटेल युजर्सला आता आणखी सावध राहण्याची गरज आहे. नुकताच एक रिपोर्ट आला असून यात एअरटेलच्या नंबर्सचा डेटा लीक झाला आहे. यात युजर्संचे नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, महिला-पुरूष यासारख्या माहितीचा समावेश आहे. हॅकर्सने २.५ मिलियन म्हणजेच २५ लाख युजर्संचा डेटा आपल्याकडे ठेवला आहे. हॅकर्सच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे भारतातील सर्व एअरटेल युजर्सचा डेटा आहे. व त्याला विक्री करायचा आहे. जर असे झाले तर एअरटेल युजर्स साठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. IANS च्या रिपोर्टनुसार, डेटा डंप च्या डिटेल्सला व्हेरिफाय करण्यात आले आहे. ज्यात अनेक नंबर्स एअरटेल युजर्सचे आहेत. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ही माहिती दिली आहे. हॅकर्सने एअरटेल सिक्योरिटी टीम सोबत…
जळगाव : प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च फाऊण्डेशन आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय मधुमक्षिका पालन व मध संकलन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बोरअजंटी लगत असलेल्या परिसरातील सुमारे 60 शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेत लाभ घेतला. आदिवासी शेतकरी बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचवावे हा सुद्धा त्यामागील हेतू होता. यावेळी मुख्य प्रशिक्षक विद्यानंद अहिरे, आत्माचे उप संचालक कुरबान तडवी, डॉ. वैभव सूर्यवंशी किरण जाधव, डॉ. विशाल बैराग, महेंद्र साळुंखे, उपसरपंच ज्ञानेश्वर सुलताने आदिंची प्रमुख उपस्थीती होती. सातपुडा पर्वतासारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून मधाची भूमिका महत्त्वाची असते. थोड्याफार प्रमाणात त्याची विक्री करुन ते आपला…
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठ्या नेत्यांनी सोडचिट्ठी दिली . या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली.या सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कुठे तरी कमी पडल्याचे चित्र आहे . या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश…
मुंबई :- कोरोनानंतर लवकरच आम्ही पुन्हा नाइट लाइफ सुरू करणार आहोत, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाइट लाइफ देखील लवकरच सुरू करू, असे पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत गेल्या वर्षी २६ जानेवारीला नाइट लाइफ संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाइट लाइफ सुरू होताच बंद झाले. मात्र आता ते पुन्हा सुरी करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरू केल्या आहेत. आता आपण रेस्टॉरंटला १ वाजेपर्यंत सुरू…
जळगाव ः प्रतिनिधी अभाविपतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय उघडण्याकरिता काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील असे अपेक्षित असतांना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासन झोपेचे…