Author: saimat team

अरुणाचल प्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशच्या कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले गेल्याचं वृत्त आहे. हिमस्खलनाची एक मोठी घटना घडली आहे. हिमस्खलनाचा तडाखा बसलेल्या लष्कराच्या गस्ती दलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलं आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरणात बिघाड झाला आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.…

Read More

अमळनेर, प्रतिनिधी । बाटलीमध्ये पेट्रोल भरून दिले नाही म्हणून तीन जणांनी पंपावर काम करणाऱ्या ऑपरेटर ला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे रा. झाडी ता. अमळनेर हा कामावर असतांना त्याठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित…

Read More

श्रीनगर, वृत्तसंस्था । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारं भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सकाळी राज्यसभेमध्ये तर दुपारीलोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आमदार राम कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. भारताच्या महान गायिका लता दीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच शिवाजी पार्क मैदानावर लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे. लताजींचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे स्मृतीस्थळ उभारल्यास त्यांचे चाहते येथे येऊन त्यांचे स्मरण करतील, त्यांना आदरांजली वाहतील. लतादीदींच्या चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्या ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल संतप्त टीकाबाण सोडले. राऊत यांनी आघाडीच्या या दोन्ही बड्या नेत्यांना बिनबुडाचे राजकारणी संबोधले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक स्तंभात राऊत यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत, आघाडी सरकारचे इतर मंत्री लवकरच गजाआड होतील, असा विरोधकांकडून इशारा दिला जात आहे, हे सारे राज्य सरकार कसे सहन करते, असा राऊतांचा सवाल आहे. दीव-दमणचे भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. याप्रकरणी भाजपचे प्रफुल्ल खोडा यांच्यावर गुन्हा दाखल…

Read More

नागपूर, वृत्तसंस्था । धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यांवर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत. नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितले की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”. गतवर्षी डिसेंबर महिन्यात हरिद्वार…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील ४८ वर्षीय बिडगाव येथील शिक्षकाचा चोपडा – शिरपूर मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र रामचंद्र वाघ (48) असे मयताचे नाव आहे. शहरातील शिव कॉलनीमधील रहिवासी व बिडगाव येथील ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र रामचंद्र वाघ (48) हे पत्नीसह 5 रोजी सायंकाळी जुना हरेश्वर रस्त्याने पायी फिरायला गेले होते. संस्कार मंडपम या मंगल कार्यालयाजवळून घराकडे परत येत असताना अरुंद पुलाजवळ त्यांना चोपड्याकडे येणार्‍या एका अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या अपघातात जबर जखमी झाल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मराठा सेवा संघाची बैठक नुकतीच अशोकराव महल्ले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समाजातील सर्व घटकांसाठी मराठा सेवा संघाचे विधायक कार्य प्रत्यक्ष पोहचवा असे आवाहन करण्यात आले. आपण मराठा सेवा संघासाठी आतापर्यंत काय केले याचेही लिखाण करावे व समाज प्रबोधनाचे मुद्दे मांडून ते प्रकाशित करावेत यामुळे समाज नक्कीच आकर्षित होईल असे महत्त्वपुर्ण शिवविचार मांडले.यावेळी मा.विभागिय अध्यक्ष भाऊसो सुरेश पाटील यांनी आतापर्यंत जळगांव मराठा सेवासंघाने केलेल्या सर्वसमावेशक कार्याबाबत व कार्याचा ठसा कसा उमटविला याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी मा.विभागिय अध्यक्ष सुरेन्द्र पाटील, विभागिय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष सुमित पाटील ,महानगर अध्यक्ष हिरामण चव्हाण ,महानगर सचिव चंद्रकांत देसले…

Read More

यावल, प्रतिनिधी । तालुक्यात विविध विकास योजना कामांमध्ये मंजूर,प्लॅन,इस्टिमेट प्रमाणे बांधकामे न होता निकृष्ट प्रतीची बांधकामे कामे होत आहेत तसेच अनेक कामांची टेंडर ठराविक ठेकेदारांना मिळत असून प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार हे मात्र वेगळेच असतात बांधकाम सुरू असताना संबंधित विभागाचा निरीक्षण अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने अत्यंत निकृष्ट प्रतीची कामे होत आहेत याकडे संबंधित विभागाचे म्हणजे यावल पंचायत समिती, जिल्हा परिषद जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग यावल व जळगाव,नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्यासह खासदार, आमदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खुद्द ठेकेदारकडून लावला जात आहे. यावल तालुक्यात खासदार व आमदार निधीतून तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेती अंतर्गत रस्ते, इतर…

Read More