जळगाव : प्रतिनिधी महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असतांनाच महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे वृत्त येऊन धडकल्यामुळे भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन व आ. राजूमामा भोळे यांना जोरदार धक्का बसला असून ‘संकटमोचक’च संकटात सापडल्याची प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविण्याची जय्यत तयारी केली असून आज सकाळी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज मनपातून घेण्यात आले आहे. महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे कुलभूषण पाटील (बंडखोर) यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मनपा निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी झाला…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी लेवा पाटीदार कम्युनिटीच्या फेसबुक पेजवर लेवा डान्स आयडॉल २०२१ च्या ऑनलाईन स्पर्धेत जळगावच्या अपंग मानसी पाटीलहिने दैदिप्यमान यश संपादन करत स्पर्धेतील ‘लेवा डान्स आयडॉल २०२१’ व लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक अॅडमिन चॉईस असे पुरस्कार प्राप्त केले आहे. “लेवा डान्स आयडॉल २०२१” ही ऑनलाईन डान्स स्पर्धा, लेवा टीचर्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित लेवा पाटीदार कम्युनिटी“ या फेसबूक ग्रुपवर समाजातील सुप्त कलागुणांना चालना मिळावी, लहानापासून थोरा पर्यंत प्रत्येकाला या उपक्रमाच्या माध्यमातून आपली कला सहजतेने सादर करता यावी, या गोष्टीचा विचार करून “लेवा डान्स आयडॉल २०२१“ हा उपक्रम शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या समन्वयक बंधु-भगिनींच्या सहकार्याने राबविण्यात…
जळगाव ः प्रतिनिधी नव्या महापौर निवडीला अवघे तीन दिवस बाकी असताना अकस्मात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पक्षीय समिकरणे वेगाने बदलू लागली आहेत.मावळत्या महापौर भारती सोनवणे यांचे पती आणि भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे या घडामोडींमध्ये रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांबरोबर होते मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक भाजपला प्रतिसाद देत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेे. रविवारी रात्री कैलास सोनवणे हे जळगाव विमानतळावर जमलेल्या भाजप नेत्यांबरोबर होते.भाजपच्या नगरसेवकांशी ते फोनद्वारे संपर्क करीत होते. मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे १० ते १२ नगरसेवक त्यांच्यासमवेत नव्हते,अशीही खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांशी संपर्कच होत नव्हता तर कोणी तब्बेत बरी नाही, कोरोनाची…
जळगाव ः प्रतिनिधी सुरवातीला जळगाव-औरंगाबाद हा द्विपदरी महामार्ग बनविण्याचे ठरले होते परंतु जळगाव-औरंगाबाद मार्गावर जास्त रहदारी होत असल्यामुळे भविष्यातील रहदारी विना अडथळा होण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांनी द्विपदरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मान्यता मिळाली. मागील चार वर्षांपासून प्रगती पथावर असलेल्या जळगाव-औरंगाबाद महार्गाचे बरेचसे काम प्रलंबित आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर रस्त्याचे अंतिम टप्प्यात असलेले काम लवकरात लवकर पूर्ण होणे बाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना निर्देश दिले. जळगाव-औरंगाबाद मार्गे पुणे-नगर येथपर्यंत पुढील प्रवास करणार्या वाहनांमार्फत या रस्त्याचा प्रचंड प्रमाणात उपयोग करण्यात येतो. त्यामुळे या रस्त्याची उपयोगिता आणि वैशिष्ट्यता…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथे पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली केल्याचा दाखल गुन्ह्याप्रकरणी रिपाईचे राजू सुर्यवंशी यांना भुसावळ येथून पोलीसांनी कोम्बींग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या घरातून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व त्यांचे बंधू अनंत सुर्यवंशी यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली करण्यासाठी धमकावण्यासह दागिने हिसकावल्याचा आरोप करत फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय ५६, रा.साईनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी गुन्हा दाखल केला होता. सदर फिर्यादीवरुन वरणगाव पोलीसात भादंवि ३९२, ४५२, ५०४, ५०६ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी राजू सुर्यवंशी यांचा…
चाळीसगाव ः प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्यरोग प्रमाण वाढत असल्याने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी शासकीय जनता कर्फ्युचे आदेश दिले. चाळीसगाव येथे शनिवार व रविवार दोन दिवस कडक बंदला चाळीसगावकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. काल रात्री चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. ठीकठिकाणी पोलीस आहेत. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, नगराध्यक्ष आशालता चव्हाण,प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, डीवायएसपी कैलास गावडे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व कोरोना बचाव समितीचे, वर्धमान धाडीवाल, नानासाहेब बागुल, दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, योगेश भोकरे, मुराद…
जळगाव : प्रतिनिधी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडियाच्या जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस सन २०२०-२१ या वर्षामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून तृतीय पुरस्कार आणि थखठउ ेष खउ-ख स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेचे वर्ष २०२०-२१ चे अध्यक्ष सी.ए. सौरभ सुभाष लोढा यांनी घोषित केले. सदर पुरस्कार दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ७१व्या वार्षिक सोहळ्यात जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेला देण्यात आला. नवी दिल्ली आय.सी.ए.आय. चे मा. अध्यक्ष सी.ए. अतुल गुप्ता यांच्या हस्ते जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी नवी…
जळगाव ः प्रतिनिधी यावल वन विभागाच्यावतीने १० मार्च रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी १० वाजता वरीष्ठ अधिकार्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले. या धाडसत्रात बाभूळ,निलगीरी,निम व इतर असे एकूण १३ घनमीटर माल आढळून आल्याने तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीची स्थापना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील तसेच महानगर सचिव कुणाल पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे स्थापित करण्यात आली.हेमंत सोनार (महानगर अध्यक्ष), प्रवीण धनगर (महानगर सचिव), मनोज भालेराव(महानगर कार्याध्यक्ष), सागर पाटील (महानगर सरचिटणीस), सुनील दाभाडे (उपाध्यक्ष), प्रवीण पाटील (उपाध्यक्ष), अनिल शेलकर (उपाध्यक्ष), विजय विसपुते (उपाध्यक्ष), विजयसिंग पाटील ( सहसचिव), पांडुरंग पवार (सहसचिव), पंकज सूर्यवंशी (सहसचिव), मनोज बावस्कर (सहसचिव), मुरलीधर कोळी (सहसरचिटणीस) अशा पद्धतीने कार्यकारणी गठीत करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश देण्यात आला होता तर किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद करुन शहरातील किरकोळ भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते.तरी देखील शेतकर्यांनी शुक्रवारी सकाळी कृऊबासमध्ये भाजीपाला आणला. तो विक्री न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारुन रस्ता अडवला. तसेच शेतकर्यांचा भाजीपाला खरेदी होत नसल्याने कृऊबास बंद ठेवण्याचीही मागणी केली. अखेर विक्री न झालेला भाजीपाला शेतकर्यांनी परत नेऊन गुरांना चारला तर काहींनी कवडीमोल दराने त्यांच्या गावात व तालुक्याच्या ठिकाणी विक्री केला. जळगाव…