Author: saimat team

कासोदा, ता.एरंडोल ः वार्ताहर कासोदा ते फरकांडे रस्त्याची दुरावस्था झाली असून ‘रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते’ असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. हा रस्ता कासोदा ते पारोळा जोडणारा मुख्यरस्ता असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी जातीने दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावरून प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे लक्षात येते. कासोदा ते पारोळा जोडणार्‍या फरकांडे, लोणी मार्गावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. कारण या मार्गावर जितकी वाहने, तितकेच खड्डे अशी स्थिती आहे. प्रत्यक्षात या रस्त्याला बघून या रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता आहे? असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या रस्त्यालगत फरकांडे येथे इतिहास कालीन झुलते मनोरे आहेत.…

Read More

धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी होलिकोत्सव: सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्यप्रदेश या राज्यातील वरला, बलवाडी, पलसुद, सेंधवा, बडवाणी, खरगोन या गावांची भोंगर्‍या बाजाराची तयारी जोरात सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल लवकरच सुरू होणार आहे. आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणारा भोंगर्‍या उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे़ आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सातपुड्यांच्या पाड्यांवर ढोलचे निनाद ऐकू येऊ लागले आहेत़. २२ मार्च पासून भोंगर्‍या बाजाराला सुरुवात होणार आहे. सातपुडा परिसरातील खेड्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातील वरला, बलवाडी, बडवाणी, खरगोन, सेंधवा अशा मोठ्या बाजार पेठेतील गावांमध्ये देखील भोंगर्‍या बाजाराची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या डिजिटल…

Read More

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील यांची जिल्हा नियोजन समिती ( डिपीडीसी) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी धरणगाव तालुका पदाधिकारी मोहननाना पाटील , तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, ज्येष्ठ नेते रविदादा पाटील,नाटेश्वर पवार, भवरखेडा सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, उज्ज्वल आबा मजदुर फेडरेशनचे सुजित आण्णा, खुशाल आप्पा आदि पदाधिकारी उपस्थित होते .

Read More

जामनेर : प्रतिनिधी येथील मधुकर नथ्थू पाटील (वय ६६) यांचे आज पहाटे ५ वाजता पाचोरा येथील रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. जळगावातील प्रिटींग क्षेत्रातील ते जुने व अनुभवी कर्मचारी होते.प्रारंभीच्या टप्प्यात दैनिक जनशक्तीत काम केल्यानंतर ते साईमतच्या प्रिटींग विभागात सक्रीय झाले होते.त्यांनी अनेक वर्ष निष्ठेने साईमतमध्ये सेवा दिली.कोरोना काळात त्यांनी अलिकडे विश्रांतीसाठी जामनेर निवासस्थानी मुक्काम केला होता. ते स्वभावाने प्रेमळ व मनमिळावू होते.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजीव गांधी सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाभरातून आलेले जवळपास २१ प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल होऊन प्रलंबित होते. त्यासंदर्भात दिव्या भोसले यांनी गेल्या २२ऑक्टोबरला जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले होते व लवकर मीटिंग घेऊन पुणे संचनालयाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.त्यांंनी लगेच २ दिवसात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जवळपास ४ महिने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला व १३ मार्चला अनुदान जाहीर झाले. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापालिकेत झालेल्या सत्तांतराच्या घडामोडीत कोणताही नेता नाही असे काही नगरसेवक वारंवार सांगत असले तरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा या सत्तांतरात मोठा सहभाग असल्याचे समजले. या सर्व घडामोडींची सुरुवात एकनाथराव खडसे म्हणतात की, कामानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरुन जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शहराच्या विकासासंदर्भात बोलतांना तुम्ही ठरविले तर विकास शक्य होईल असे म्हणत मनपामध्ये माझ्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मनपाच्या सत्ता बदलाबाबत चर्चा होवून शिवसेना नेते विनायक राऊत व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत म्हणजेच आमच्या चौघांमध्ये याबाबत धोरण ठरले होते, अशी स्पष्ट टिप्पणी माजी मंत्री…

Read More

जळगाव: विशेष प्रतिनिधी गेल्या २०१८ ला झालेल्या महापालिका निवडणुकीची सूत्रे अर्थात भाजप कडून तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती.आणि २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या.तेव्हा महाजन जळगावकरांना विश्वास देत होते की, ‘‘तूम्ही आम्हाला महापालिकेत सत्ताद्या ,आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू ‘‘आणि इतकेच नाही तर आम्ही शहराचा विकास म्हणजे चेहरा-मोहरा बदलू शकलो नाही तर विधानसभेसाठी मते मागायला येणार नाही. जळगावकर नागरिक सुज्ञ होते , काय हरकत आहे म्हणून त्यांनी महाजनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली. आणि जळगाव महापालिकेत भजपाला भूतो न भविष्यती असे प्रचंड बहुमत मिळाले होते (७५ पैकी ५७) त्यानंतरम्हणजे २०१८ नंतर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं परफेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकत महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनी विजय मिळविला आहे. शिवसेनेने ही लढत ४५ विरुध्द ३० अशा फरकाने जिंकत महापालिकेवर भगवा फडकविला आहे. त्यामुळं सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींमुळं बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी विशेषत: शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. महापालिकेत भक्कम बहुमत असलेल्या भाजपला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची खात्री होती. मात्र राजकारणाच्या सारीपटावर निश्‍चितता कधीच नसते, हे पुन्हा जळगाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या सोबत मागील वर्षभरापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून आकस्मिक परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. ते लोकसंघर्ष मोर्चाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगर पालिकेचे आयुक्त प्रदीप कुलकर्णी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. स्नेहल फेगडे, अब्दुल गफ्फार मलिक, डॉ. क्षितिज पवार, डॉ. घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पैशांअभावी कुणीही आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास दिनकर तायडे यांची बहुमताने तर उपाध्यक्षपदी अजय आनंदराव सोमवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी विश्‍वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास तायडे हे कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळा, शिवाजीनगर, जळगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अजय सोमवंशी हे व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्या मंदिर, चाळीसगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था ही आपल्या सभासदांना अल्पव्याजदरात १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी न…

Read More