Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्याला रस्ते विकासासाठी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून २० पुलांची कामे केली जाणार आहेत. या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत संबंधित आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे. त्यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी फैजपूर नगर परिषदेकडून झालेल्या विविध कामांची तपासणी करणेबाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. २२ डिसेंबर २० रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. तक्रारदाराने मागणी केलेल्या कामाचे तपासणी शुल्क ५लाख १५ हजार ७०० रुपये फैजपुर नगरपरिषदेने दि.१३/१२/२०१९आणि दि.२६/६/२०२०रोजी ६लाख ३२ हजार असे एकूण ११लाख ४७ हजार रुपये अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे भरणा केलेला आहे परंतु अद्याप चौकशी अहवाल अप्राप्त असल्याचे तसेच तक्रारदार चौकशी अहवालाबाबत तगादा लावत असल्याचे सुद्धा त्यात नमूद करण्यात आले आहे. या बद्दल सविस्तर माहिती अशी की फैजपुर नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या तीन दिवसाच्या जनता कर्फ्युचा अंमल काल रात्री ८ वाजेपासून सुरू झाला. त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला असून रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे. या जनता कर्फ्युची कडक अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची विशेष पथके नियुक्त केल असून शहरात अकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र मुख्य बाजारपेठ सोडून विस्तारीत भागात काही दुकानदार बेजबाबदारपणे व्यवहार सुरू ठेवत असल्याचे वृत्त आहे. अशा व्यावसायिकांविरूध्द त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. संभाव्य धोका लक्षात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा हा प्रयत्न आहे. या तीन दिवस नियमांचे पालक करून आपण अनेकांना बाधित होण्यापासून वाचवू शकू. सध्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. त्या स्टेजपर्यंत जायचे नसेल तर आतापासूनच नियमांचे पालन करून संसर्ग नियंत्रित करावा लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगावकरांना केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे नसलेले रुग्ण जास्त आहेत. रुग्णालयात दाखल कमी असतील. तरी प्रत्येक रुग्ण हा अनेक नागरिकांना बाधित करू शकतो. त्यामुळे इतर समस्या…

Read More

यावल ः प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याचा आदेश राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातून काढण्यात आला आहे. मुदतवाढ मिळणे कामी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.लताताई सोनवणे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे मुदतवाढ मिळाल्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळातर्फे त्यांच्यासह राज्यशासनाचे आभार मानण्यात आले. गेल्या वर्षी दि.८ सप्टेंबर २०२० रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपलेली असताना संचालक मंडळास दोन टप्प्यात एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. शासनाने १० सप्टेंबर २०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात आधी २४ सप्टेंबर २०२० पर्यंत निर्णय राखून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब जळगावतर्फे रोटरी कम्युनिटी क्रॉर्प समितीची स्थापना करून दाणाबाजारातील गरीब होतकरू हमालांना लोटगाडीचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहे. स्वभिमानाने काम करणार्‍या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब जळगावने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष जितेंद्र ढाके यांनी सांगितले. कार्यक्रमाला सेक्रेटरी डॉ.काजल फिरके, आरसीसी कमिटी चेअरमन किशोर तलरेजा,डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, अ‍ॅड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन,श्याम अग्रवाल,आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव वेलकर आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी काल दुपारी ३.३० वाजता कोर्ट चौकात महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून परीक्षा नियोजित तारखेला घेण्याची मागणी करीत दीड तास रास्ता रोको केला.अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी समजूत काढल्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा नियोजित होती. शहरातील १६ उपकेंद्रांवर प्रथम सत्र सकाळी १० ते दुपारी १२ व द्वितीय सत्र दुपारी…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर नगरपरिषदेने शहरातील ओपन स्पेस जागेवर व बगीच्या मधील खेळणी व व्यायाम साहित्य खरेदी प्रकरणात मोठा घोळ के ल्याचे उघडकीस आले आहे. बगीच्यात बसणार्‍यांसाठी जे ७ बेंच खरेदी केले आहे त्यापैकी एका बेंचची किंमत २६ हजार ५०० रुपये असल्याने साहित्य खरेदी करणार्‍यांच्या नैतिक पातळीची जोरदार चर्चा संपूर्ण यावल तालुक्यात सुरू असून १८ ऑगस्ट २०१८ व २६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती कडे केलेल्या तक्रारीनुसार समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत फैजपूर नगरपरिषदेने फैजपूर शहरातील ओपन स्पेस/खुल्या जागांवर तसेच बगीच्यामध्ये खेळणी व व्यायाम साहित्य पुरविणे बसवून देणे इत्यादी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे चोपडा तालुक्यातील सातपुडा परिसरस्थित शेणपाणी व गौर्‍यापाडा गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचे आरोग्य,आहार व स्वच्छता या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ८ मार्च रोजी महिला दिन व १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाच्या सुरूवातीस त्यांच्या प्रतिमेला सुती हार घालून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच रेणुका बारेला, सदस्य गिताबाई बारेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालय धरणगाव येथील राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमाचे समन्वयक गणेश कुभांर यांनी ’महिलांचे आरोग्य’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी सागर चौधरी…

Read More