Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण व असह्य झाले आहे.यावर केंद्र सरकारने त्वरीत तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की,गेल्या ७ वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कुणालाच परवडणार नाही एवढे वाढले आहेत. इंधनाचे भाव वाढल्याने परिणामी वाहतूकीचे खर्चदेखील वाढले व अन्न, धान्य, दैनंदीन वापराच्या वस्तू आदी सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच अनेक उद्योग, कारखाने, संस्था बंद पडल्या आहेत. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत, १००हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. बुधवारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी ८ असे १६ अर्ज घेतले. पक्षात गटबाजी नसल्याचा दावा करणार्‍या पदाधिकार्‍यांनी एकापेक्षा जास्त अर्ज घेतल्याने पक्षांतर्गत तर्कवितर्क लावले जात आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. पहिल्या टर्ममधील दुसर्‍या महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ मार्च रोजी नवीन महापौरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ९ मार्चपासून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालाणी व स्वीकृत नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी काल…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.चारुलता पाटील यांनी केले. भुसावळ येथील कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन व्याख्यानात डॉ.पाटील यांनी महिलांना आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयाच्या महीला कल्यान समितीतर्फे सदरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. योगा, एरोबिक, झुंबा, जिम अशा वेगवेगळ्या माध्यमातून महिला स्वतःचे आरोग्य सुधारू शकतात. शिवाय प्रत्येक महिलेसाठी शारीरिक आरोग्यासोबतत मानसिक,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा रेट दहा टक्क्यांवर आणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काल अधिकार्‍यांना दिल्या. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथकाने बुधवारी सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जीएमसीचे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी शहरात अतिक्रमण ही समस्या कधीही न संपणारी किंवा न सुटणारी आहे.महापालिकेचाअतिक्रमणविभाग त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.त्यांच्यावर हप्ते घेण्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी सभागृहात अनेकदा केले आहेत.हा अतिक्रमण विभागाचा भाग झाला पण आता महापालिकेकडून पार्किंग (वाहनतळ) चा ठेका घेतलेला मक्तेदारसुद्धा अतिक्रमणधारकांकडून दैनिक ३०० रुपये वसूल करीत असल्याचे धक्कादायक पण अधिकृत गोटातील वृत्त आहे.जुन्या नगरपालिकेच्या जागेवर हा प्रकार सर्रासपणे सुरू असून त्याकडे कर्तव्यदक्ष उपायुक्त संतोष बाहुळे यांनी लक्ष देण्याची मागणी आहे . जळगाव शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फोफावण्याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द अतिक्रमण विरोधी पथकाचा नाकर्तेपणा.किंबहुना त्यांची हप्तेखोरी.हप्तेखोरीचा आरोप हा येथील लोकप्रतिनिधींचाच आहे हे विशेष.अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण धारकांशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगर परिसरात मित्रांचे आपसात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिष्टाई करणे महागात पडले असून सदर भांडण सोडविणे त्याच्या अंगलट येत भांडण करणार्‍या दोघांनी त्या तरुणावरच चॉपरने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, समता नगर परिसरात राहणारा विक्की रविंद्र इंगळे (वय २१) हा तरुण आपला मित्र मोन्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासोबत महाबळ परिसरात काल रात्री ९ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेला होता. यावेळी समता नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अशफाक पटेल आणि जयेश कोळी (दोन्ही रा.समता नगर) मोन्याचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.भाजपातर्फे आज दोन्ही पदासांठी नामांकन पत्र मनपातून घेण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना दीपक सूर्यवंशी व भगत बालाणी यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार, असा आत्मविश्‍वास व्यक्त केला. मात्र या पदांवर कोणाला संधी मिळणार याबाबत मौन पाळले. दरम्यान माजी मंत्री आ. गिरीष महाजन व आ. राजूमामा भोळे हे दोन्ही पदांबाबतची नावे निश्‍चित करतील व त्यांनाच संधी मिळणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर व उपमहापौर या पदांवरून…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर नगर परिषदेमार्फत फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन १९३६ चे संकल्प चित्र उभारणी करण्याच्या कामाच्या रकमेत लाखो रुपयांचा अपहार झालेला असल्याने अपहारीत रकमेची जबाबदारी निश्चित करून शासनाकडे कठोर कार्यवाहीची शिफारस करण्याची मागणी तक्रारदार ललीतकुमार चौधरी यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जळगाव यांच्याकडे केली आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात श्री. चौधरी यांनी नमूद केले आहे की, दि.५ डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या तक्रारीनुसार तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त चौकशी समिती अहवालानुसार तथा निष्कर्षानुसार एकाच निविदा प्राप्त मक्तेदार यांनी निविदा मॅनेज केलेले आहेत व सर्व स्पर्धक निविदांचे इसारा रक्कम एकाच खात्यातून भरलेले आहेत, निविदा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल , जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे,श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. सावेर ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सौ. सुरेखा देवरे,चोपडा नगरपरिषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मनिषा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात अस्वच्छतेच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. कामगार वेळेत काम पूर्ण करत नसल्याने समस्येत भर पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आगामी काळात सरप्राईज व्हिजिट देऊन कामगारांची हजेरी तपासली जाईल. अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्यास संबंधित भागातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा देत आरोग्य सभापती जितेंद्र मराठे यांनी कोणाच्याही दबावात काम करू नका असा सल्ला दिला आहे. आरोग्य सभापतीपदी जितेंद्र मराठे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली.त्यात नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याच्या सूचना दिाल्या. बैठकीला सहायक आयुक्त पवन पाटील उपस्थित होते. ठरवून दिलेल्या वेळेत…

Read More