Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशनतर्फे कोरोना काळात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. यात बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना अटाळे, आबेदा तडवी, जागृती तायडे, रजिया पठाण, ललिता पाटील, मेघा चौधरी, वैशाली भालेराव, चंद्रकला चव्हाण, आशा गजरे, अनिता पाटील, कल्पना वायसे, प्रमिला पाटील, मिना सुळे, नंदा अवचर, शोभा बारेला, आशा महाजन, समृद्धी संत आदींचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे कोरोनो योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला व बाल विकास समितीच्या सभापती…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना व लॉकडाऊनच्या काळात राज्यात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणार्‍या शेतकर्‍यांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे महत्वाकांक्षी पाऊल राज्य उचलत आपहे. असे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेतीच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राज्य सरकार अनेक योजना कार्यान्वित करत आहेत. ही गोष्ट शेतकर्‍यांसाठी व सामान्य माणसासाठी खूप मोलाची आहे. राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प दिलासा देणारा, स्वागतार्ह आहे. अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित…

Read More

चोपडा : प्रतिनिधी भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे धानोरा ता.चोपडा येथील पत्रकार यांची तर तालुका संपर्क प्रमुखपदी खान्देश अस्मिता न्यूजचे पत्रकार जितेंद्र कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबाबत त्यांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष राकेश कोल्हे, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, जयवंत देवरे(दिल्ली), प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी(धुळे), प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन,जळगाव जिल्हाध्यक्ष (शहर) हेमंत काळुंखे ,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा.ई.वायुनंदन यांनी मावळते कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून काल सकाळी स्वीकारला. सर्वांना सोबत घेऊन या विद्यापीठाच्या विकासासाठी बांधील असल्याची ग्वाही प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली. प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे कुलपती तथा राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली. सोमवार दि ८ मार्च रोजी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरुंच्या दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बोलतांना प्रा.वायुनंदन म्हणाले की, चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारला होता.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त…

Read More

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या धाडी नदी सुशोभीकरण कामातील रस्त्याचे सहा महिन्यातच बारा वाजले आहे. हा रस्ता ठीकठिकाणी उखडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेला सुमारे अडीच ते तीन कोटी रक्कम धाडी नदी पात्र सुशोभीकरण करण्यासाठी दिले गेले होते. हे काम २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. या कामांतर्गत धाडी नदीच्या काठावर संरक्षण भिंत व श्रीराम टाकी ते लक्कड पेठ नजीक खिरोदा रस्ता असे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होऊन सहा महिनेच झाले मात्र हा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून उखडलेल्या परिस्थितीची आज अवस्था झाली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केसीई सोसायटी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जनजागृती अभियान शुक्रवारी मास्कबाबत अभियान राबवण्यात आले. कोरोनाचा कहर टाळायचा असेल तर मास्क घाला,असे सांगतानाच ज्यांनी मास्क घातले अशा १०० नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन प्रोत्साहित करण्यात आले, तर ज्यांनी मास्क लावले नव्हते अशा ३०० नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. ४०० जणांना सकारात्मक संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षा, कोरोनासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी अध्यक्षीय भाषणात कोरोना जनजागृती संदर्भात मनोगत व्यक्त केले. कोरोना पुन्हा वाढतो आहे. त्यामुळे सध्या मास्क वापरणे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे दरवर्षाप्रमाणे महाराष्ट्रात नावाजलेले तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी घोषित केले. पुरस्कारार्थी मध्ये सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड ( मुंबई ) जीवन गौरव पुरस्कार, चिंतामण शिरोळे (सटाणा ) जीवनगौरव पुरस्कार, ह.भ.प. सुनील माळवे (नाशिक) आदीशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार , भागवत दगडू राठोड (कु-हा -काकोडा ता. मुक्ताईनगर) कल्याणराव भवर (ता. अंबड जि. जालना) तुकाराम जावळे ( ता. पैठण जि. औरंगाबाद) यांना बळीराजा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार, उत्कृष्ट संचलनासाठी दिपाली केळकर व डॉ. मृण्मयी भजक (मुंबई ) यांना तर साहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कादंबरीकार तथा राष्ट्रपती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उन्हाळ्याची चाहूल लागताच पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यंदा मार्च महिना लागताच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे सध्याचे तापमान लक्षात घेता पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप केली. अभियानात शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पन्नास भांडी घरोघरी जाऊन देण्यात आली. नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांना पाणी व धान्य ठेवावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. पुढील काही दिवसांत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. शहरातील गिरणा टाकीच्या मागील परिसर, रामानंद नगर, स्टेट बँक कॉलनी, स्वातंत्र्य चौकातील कॉलन्यांत राबवलेल्या या उपक्रमात अध्यक्षा वैशाली पाटील, नीता भंडारी, सोनल पाटील यांनी सहभाग नोंदवला.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोणतेही पुरावे नसताना राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने विधानसभेत जळगावातील न घडलेल्या घटनेबद्दल आरोप केले. हा त्यांचा उथळपणा असून प्रसिद्धीसाठी विरोधक किती आसूसलेले आहेत हे त्यातून समोर आले आहे. त्यांनी आता जळगावसह संपूर्ण राज्याची माफी मागावी, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी टीका केली. शहरातील महिलांच्या शासकीय वसतिगृहात गंभीर स्वरुपाचे गैरप्रकार पोलिसांनी केले, असे आरोप प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीही शहानिशा न करताच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यावर भाषण केले. या गैरप्रकारची चित्रफित उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेत गोधळ झाला. त्यामुळे जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याचीही बदनामी झाली आहे. जबाबदार विरोधीपक्ष म्हणून पुरेशी खात्री करून मगच त्यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी नाममात्र दरात रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ‘सेवारथ’ नावाने पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या शेकडोच्या संख्येने वाढली. काही गंभीर रुग्णही समोर येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली आहे. काही रुग्णांना वेळप्रसंगी सिटीस्कॅन तपासणी करण्यासाठी न्यावे लागते. नातेवाईकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. बर्‍याच वेळा रुग्णांना ऑक्सिजन लावून तपासणी करावी लागते. या पार्श्‍वभूमीवर सेवारथ परिवाराच्या वनीने कोरोना तसेच नॉन कोवीड रुग्णांसाठी अल्पदरात ऑक्सिजन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील तसेच इतर तालुक्यांतील रुग्णांना या…

Read More