जळगाव ः प्रतिनिधी यावल वन विभागाच्यावतीने १० मार्च रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी १० वाजता वरीष्ठ अधिकार्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले. या धाडसत्रात बाभूळ,निलगीरी,निम व इतर असे एकूण १३ घनमीटर माल आढळून आल्याने तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीची स्थापना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील तसेच महानगर सचिव कुणाल पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे स्थापित करण्यात आली.हेमंत सोनार (महानगर अध्यक्ष), प्रवीण धनगर (महानगर सचिव), मनोज भालेराव(महानगर कार्याध्यक्ष), सागर पाटील (महानगर सरचिटणीस), सुनील दाभाडे (उपाध्यक्ष), प्रवीण पाटील (उपाध्यक्ष), अनिल शेलकर (उपाध्यक्ष), विजय विसपुते (उपाध्यक्ष), विजयसिंग पाटील ( सहसचिव), पांडुरंग पवार (सहसचिव), पंकज सूर्यवंशी (सहसचिव), मनोज बावस्कर (सहसचिव), मुरलीधर कोळी (सहसरचिटणीस) अशा पद्धतीने कार्यकारणी गठीत करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश देण्यात आला होता तर किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद करुन शहरातील किरकोळ भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते.तरी देखील शेतकर्यांनी शुक्रवारी सकाळी कृऊबासमध्ये भाजीपाला आणला. तो विक्री न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारुन रस्ता अडवला. तसेच शेतकर्यांचा भाजीपाला खरेदी होत नसल्याने कृऊबास बंद ठेवण्याचीही मागणी केली. अखेर विक्री न झालेला भाजीपाला शेतकर्यांनी परत नेऊन गुरांना चारला तर काहींनी कवडीमोल दराने त्यांच्या गावात व तालुक्याच्या ठिकाणी विक्री केला. जळगाव…
जळगाव ः प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्या टप्प्यात जिल्ह्याला रस्ते विकासासाठी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून २० पुलांची कामे केली जाणार आहेत. या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत संबंधित आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे. त्यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३…
यावल ः तालुका प्रतिनिधी फैजपूर नगर परिषदेकडून झालेल्या विविध कामांची तपासणी करणेबाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. २२ डिसेंबर २० रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. तक्रारदाराने मागणी केलेल्या कामाचे तपासणी शुल्क ५लाख १५ हजार ७०० रुपये फैजपुर नगरपरिषदेने दि.१३/१२/२०१९आणि दि.२६/६/२०२०रोजी ६लाख ३२ हजार असे एकूण ११लाख ४७ हजार रुपये अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे भरणा केलेला आहे परंतु अद्याप चौकशी अहवाल अप्राप्त असल्याचे तसेच तक्रारदार चौकशी अहवालाबाबत तगादा लावत असल्याचे सुद्धा त्यात नमूद करण्यात आले आहे. या बद्दल सविस्तर माहिती अशी की फैजपुर नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजना…
जळगाव : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या तीन दिवसाच्या जनता कर्फ्युचा अंमल काल रात्री ८ वाजेपासून सुरू झाला. त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला असून रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे. या जनता कर्फ्युची कडक अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची विशेष पथके नियुक्त केल असून शहरात अकारण फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र मुख्य बाजारपेठ सोडून विस्तारीत भागात काही दुकानदार बेजबाबदारपणे व्यवहार सुरू ठेवत असल्याचे वृत्त आहे. अशा व्यावसायिकांविरूध्द त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. संभाव्य धोका लक्षात…
जळगाव : प्रतिनिधी शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा हा प्रयत्न आहे. या तीन दिवस नियमांचे पालक करून आपण अनेकांना बाधित होण्यापासून वाचवू शकू. सध्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. त्या स्टेजपर्यंत जायचे नसेल तर आतापासूनच नियमांचे पालन करून संसर्ग नियंत्रित करावा लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगावकरांना केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे नसलेले रुग्ण जास्त आहेत. रुग्णालयात दाखल कमी असतील. तरी प्रत्येक रुग्ण हा अनेक नागरिकांना बाधित करू शकतो. त्यामुळे इतर समस्या…
यावल ः प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याचा आदेश राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातून काढण्यात आला आहे. मुदतवाढ मिळणे कामी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.लताताई सोनवणे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे मुदतवाढ मिळाल्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळातर्फे त्यांच्यासह राज्यशासनाचे आभार मानण्यात आले. गेल्या वर्षी दि.८ सप्टेंबर २०२० रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपलेली असताना संचालक मंडळास दोन टप्प्यात एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. शासनाने १० सप्टेंबर २०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात आधी २४ सप्टेंबर २०२० पर्यंत निर्णय राखून…
जळगाव : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले…
जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब जळगावतर्फे रोटरी कम्युनिटी क्रॉर्प समितीची स्थापना करून दाणाबाजारातील गरीब होतकरू हमालांना लोटगाडीचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहे. स्वभिमानाने काम करणार्या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब जळगावने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष जितेंद्र ढाके यांनी सांगितले. कार्यक्रमाला सेक्रेटरी डॉ.काजल फिरके, आरसीसी कमिटी चेअरमन किशोर तलरेजा,डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, अॅड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन,श्याम अग्रवाल,आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव वेलकर आदी उपस्थित होते.