जळगाव : प्रतिनिधी येथील ई टीव्ही भारत या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सूर्यभान भास्कर पाटील (वय ३४) यांचा शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या १६ दिवसांपासून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सूर्यभान पाटील यांनी आरंभी झी चोवीस तास , तत्कालीन स्टार माझा या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन म्हणून काम केले. ते ई टीव्हीचे प्रतिनिधी झाले. धडपडा पत्रकार म्हणून परिचित असलेला हा उमदा पत्रकार गमावल्याचे दु:ख पत्रकार सृष्टीत उमटले आहे. त्याच्या निधनाने प्रसार माध्यमातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यशासनाने कोरोना प्रार्दुभावामुळे…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक यांची चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अत्यंत वाईट पद्धतीने अवहेलना केल्यामुळे महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला. या प्रकरणी कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत वीज बिल वसुलीसह सर्व प्रकारचे काम बंद ठेवण्याचा इशारा अभियंत्यांसह सर्व संघटनांच्या कृती समितीने दिला. वीज मंडळाच्या कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकार्यांना अतिशय गलिच्छ पद्धतीने वागणूक देत शिवीगाळ, मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी परिमंडळ कार्यालयात घडली. वीज कर्मचारी हे शासनाच्या निर्देशानुसार वीज वसुलीचे काम करीत आहेत मात्र लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे अधिकार्यांना मारहाण होणे हा निंदनीय प्रकार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी सांगितले. या घटनेनंतर सर्व…
जळगाव ः प्रतिनिधी शेतकर्यांना कृषिपंपासाठी वीज वापरात अडचणी येऊ नये म्हणून यंदा १५ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. दोन वर्षांत विक्रमी ३१ कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कळवण्यात आली आहे. जिल्ह्यात शेतीचे पंप वारंवार जळतात. तसेच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उद्भवते. घरगुतीसह शेती पंपांसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून लोकप्रतिनिधींकडून नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवण्याबाबत, नादुरुस्त इलेक्ट्रिक पोल बदलून मिळण्याबाबत, अपघात टाळण्यासाठी केबलची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होती. त्या अनुशंगाने २०१८-१९पर्यंत डीपीडीसी अंतर्गत या कामांसाठी केवळ २ कोटी रुपये मंजूर होते. मात्र, मागील वर्षापासून वीज समस्या सोडवण्यासाठी ही तरतूद वाढली. पालकमंत्री पाटील यांनी मागील वर्षी…
जळगाव ः प्रतिनिधी थकीत गाळेभाडे वसुलीसाठी मनपाने दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली होती. त्यामुळे व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता परंतु मनपाने कठोर भूमिका घेतल्याने शहरातील १६ अव्यावसायिक व्यापारी संकुले आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गाळेधारक संघटनांनी घेतला. त्यानुसार आजपासून शहरातील १६ संकुले बेमुदत बंद ठेवण्यात आली आहे. जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केटमध्ये काल १६ मार्केटचे अध्यक्ष व पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत तेजस देपुरा, राजस कोतवाल,…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे खिर्डी फाट्यावरील मुजोंबा मंदिरासमोर डंपर व ट्रँकर यात भीषण अपघात होत एक जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे भुसावळकडे खिर्डी फाट्यावरील मुजोंबा मंदिरासमोर भुसावळकडून जळगावकडे जाणारा डंपर (क्र.एम.एच.१९-झेड.३१२३) हा त्याच्या बाजूने जात होता. त्याचवेळी विरुध्द दिशेने आपल्या बाजूची लेन सोडून ट्रँकर (क्र.एम.एच.१८-बीए.४१८८) ड्रायव्हरने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरुन येणार्या डंपरला जबर धडक दिली. या भिषण अपघातात डंपरवरील चालक देवानंद नथ्थू पाटील (वय ३५, रा.साकेगाव, ता.भुसावळ) हा…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे.जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वतःची व कुटुंबाची खबरदारी घेत आहे.तथापि गेल्या वर्षापेक्षा यावेळी कोरोनाचा उद्रेक जरा जास्तच झालेला दिसून येत आहे.त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती वाढीस लागली आहे.दरम्यान ज्यांना देव किंवा देवदूत म्हटले जाते त्यातील काही डॉक्टर मंडळी याचे बाजारीकरण करीत असल्याच्या तक्रारी आहेत.या तक्रारी जाहीरपणे नसून खाजगीत करण्यात येत आहेत.तथापि जी व्यक्ती किंवा ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित होते त्यांच्याकडून जाणून घेतलेले काही अनुभव पाहता रुग्णास लक्षणे फ्ल्यूची असोत,टायफाईडची असोत,मलेरियाची असो किंवा साधा थंडी-ताप का असेना, त्यास कोरोनाची भीती दाखवीत काही डॉक्टर आपले भले करीत असल्याचीही चर्चा चौकाचौकातील कट्ट्यावर…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असताना अजूनही अनेक जण ते पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी काल सांगितले. अर्थात, लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून शहरात रुग्ण शोधण्यासाठी मोहीम सुरू होत असून त्याला नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका आणि योजण्यात येत असलेले उपाय या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी काल पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी, पोलिस अधीक्षक…
जळगाव ः प्रतिनिधी मेहरुण परिसरातील प्रभाग क्र.१४ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील विविध नागरी समस्यांबाबत नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांना सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांचे निवेदनाद्वारे साकडे शहरातील सत्तांतरानंतर नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात त्यांना विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांसह सामाजिक कार्याकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत महापालिका क्षेत्रातील समस्यांबाबतही अवगत करण्याचे प्रयत्न चालविले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांनी नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या समस्यांबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, या उद्यानात सकाळी व संध्याकाळी वॉकींग करणार्या नागरीकांची मोठी वर्दळ असते. त्यात ज्येष्ठ…
जळगाव ः प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वराज्य पॅनलचे प्रमुख भिकन नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल निवडून आले आहे. त्यात सचिन बिर्हाडे हे सरपंचपदी तर उपसरपंचपदी सौ. तुळसाबाई भिकन नन्नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी कामकाज पाहिले.नवनिर्वाचित सरपंच सचिन बिर्हाडे व उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जळगाव ः प्रतिनिधी येथील जैन इरिगेशनचे चित्रकार आनंद पाटील यांच्या चित्राचे राज्यस्तरीय कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या चित्रकला प्रदर्शनात निवड झाली आहे. कला स्पर्धांमध्ये कॅमलिन आर्ट फाऊंडेशनचे नाव जगात नावाजलेले आहे. दर वर्षी आयोजित होणार्या या स्पर्धेत हजारों स्पर्धक भाग घेत असतात. चार पुरस्कार व्यावसायिक चित्रकार तर बारा चित्र विद्यार्थी विभागात राष्ट्रीय पुरस्कार दिली जाताता. पोर्ट्रेट, लँडस्केप, स्टील-लाईफ व क्रिएटिव्ह पेंटिंग अशा प्रकारात प्रवेशिका मागविण्यात येते. सदरील स्पर्धेत जळगावचे चित्रकार आनंद पाटील याचे पोर्ट्रेट (व्यक्ती) चित्र या प्रकारातील बाबा ह्या चित्राची निवड झाली आहे. हे जल रंगातील आहे. यापूर्वी मुंबई येथील जे जे. अपलाइड आर्ट कॉलेजमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना वर्ष २००३…