यावल : तालुका प्रतिनीधी राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील न्हावी व यावल येथे ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून डिलेवरी वार्ड लेबर रूम,वेटिंग रूम,स्टोर रुम इत्यादी खोल्यांचे बांधकाम सुरू आहे.बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर किंवा संबंधित शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी राहत नसल्याने बांधकाम रामभरोसे सुरू आहे, तसेच बांधकामा बाबत माहिती सुद्धा मिळू शकत नाही,बांधकाम कोणत्या योजनेतून किती लाखाचे आहे? इत्यादी माहिती फलक बांधकामाच्या ठिकाणी न लावल्यामुळे यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात वरील योजनेअंतर्गत जे बांधकाम काम सुरू आहे त्यातील पिलर चे खड्डे फक्त ४ फूट खोल अंतराचे केले आहेत तर यावल येथील ग्रामीण…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने पुर्वसंध्येला ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात जगातील रंगभूमी समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. तरीही कलावंत विविध मार्गांनी रंगभूमीवर काम करीत आहेत. नाटक करणार्या कलावंतासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. परिवर्तन तर्फे जागतिक स्तरावर मराठी रंगभूमी याविषयावर आज २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जागतिक रंगभूमीचे अभ्यासक व कादंबरीकार डॉ अविनाश कोल्हे (मुंबई), नाटक या विषयाला वाहिलेलं रंगवाचा हे मासिक गेल्या अनेक वर्षापासून कणकवली येथून प्रकाशीत करणारे संपादक वामन पंडीत, शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला या…
जळगाव ः प्रतिनिधी सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे व समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे डॉ. अविनाश आचार्य यांचा सातवा स्मृतिदिन काल डॉ. हुजुरबाजार हॉस्पिटलमध्ये साजरा झाला. डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन माल्यार्पण करत आदरांजली वाहिली. तसेच डॉ. आचार्यांच्या कार्याची ओळख ही पिढ्यानपिढया समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कोरोनाचा संक्रमण काळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने डॉ. आचार्य व प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे महापौर महाजन यांनी सांगितले. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन,…
चोपडा ः प्रतिनिधी दि.२३ मार्च सायंदैनिक साईमत मधे वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकर्यांनी बियाणेबाबत केलेल्या तक्रारीसंबंधी ‘दै.साईमत’ वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच लागलीच या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकार्यांनी थेट तक्रारदार शेतकर्यांच्या शेतात भेट देऊन ज्वारी पिकांची पाहणी केली. कृषी अधिकार्यांनी तक्रारदार शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता ज्वारीची कणसे पुर्ण भरलेले नाहीत त्यामुळे शेतकर्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. प्रशासनाने बियाणे कंपनीला शेतकर्यांचे झालेले नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत. अन्यथा, शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप पाटील यांनी दिला. याप्रसंगी कृषि अधिकारी आर.आर.चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम.शिंपी, कृषी विज्ञान केंद्र पालचे कृषी शास्त्रज्ञ अतुल पाटील, हायटेक सिडस्चे…
जळगाव : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, मृत तरुणाचे ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केली असून याबाबत लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ च्या डाऊन साईडवरील रेल्वेलाईन वरील खंबा क्र.४१९/१७ ते ४१९/१९ दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याच्या चेहर्याचा चेंदामेंदा होऊन तो जागीच गतप्राण झाला. सदर घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केले…
भुसावळ : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे गेल्या महिन्यापासून कोरोना आजाराने थैमान घातले असून दररोज मृत्यूच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गावात कडक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता गावकरी करतांना दिसत आहेत. तालुक्यातील साकेगाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र तयार झाल्याचे समोर येत असून गावात गल्लोगल्ली कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत असल्याचे सांगितले जात आहे . गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी गावातील ग्रामस्थांना आवाहन करीत आहेत मात्र अनेक ग्रामस्थ या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे एवढेच काय तर अजूनही काही ग्रामस्थ काळजी घेत नसून आपापल्या कामानिमित्त भटकंती करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीने विनाकारण फिरण्यास…
जळगाव/भुसावळ ः प्रतिनिधी खिरोदा (ता.रावेर) येथील रहिवासी तथा सप्तपुट ललितकला भवन चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश एकनाथ वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून भारतीय सिनेक्षेत्रातील ६७ वा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळवणारे ते खान्देशातील पहिले कलावंत ठरले. यापुर्वी फेब्रुवारीत त्यांना मुंबई येथे फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. संपूर्ण भारतातील विविध प्रांतातून व विविध भाषेतील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होत असल्याने सिनेसृष्टीत या पुरस्काराला अतिशय मानाचे स्थान आहे.त्यामुळे खिरोदा (ता.रावेर) या क्रांतीभूमीतून पुढे आलेल्या निलेश वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाच्या उत्कृष्ट…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करताना त्यात उत्पन्नाच्या काही बाबी सादर न झाल्याने शिवसेनेने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले होते.आधीच जिल्हा परिषदेच्या मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमध्ये प्रशासनाने अनेक उत्पन्नाच्या बाबींसंदर्भात अर्थविभागाला अंधारात ठेवले होते. या विभागांकडून ही माहिती मागवण्यात आली आहे. ती सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहे. शासनाकडून विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात. यापैकी काही योजना राबवणे हे जिल्हा परिषदेला सक्तीचे असते. तर काही योजना राबवण्यासाठी शासनाकडून त्या निधीच्या २ ते ४ टक्क्यांपर्यंत अभिकरण शुल्क म्हणून जिल्हा परिषदेला एजन्सी म्हणून कमिशन दिले होते. या योजनांमधून मिळणारे उत्पन्न देखील अधिक असते. जिल्हा परिषदेतील विविध १२ विभागांसाठी…
जळगाव ः प्रतिनिधी काही औषधविक्रेते रेमडेसिविर इंजेक्शन जादा दाराने विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत हे इंजेक्शन १ हजार २०० रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्ह्यातील काही औषध विक्रेत्यांकडून अद्यापही जादा दरात इंजेक्शन विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यासंदर्भात भूमिका विषद करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.या वेळी केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर, सहसचिव श्रीकांत पाटील,भुसावळ तालुका सहसचिव ईश्वर चौधरी आदी उपस्थित…
जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र व रोटरी गोल्डसिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी शहरातील २० क्षयरोगाने पीडित रुग्णांना एक महिन्याचा किराणा तसेच प्रोटीन पावडरचे डबे देऊन मदतीचा हात देण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम पुढील सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मान्यवरांनी केला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या डी.बी.जैन रूग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी गोल्डसिटी क्लबचे सदस्य डॉ. दीपक अटल यांच्यासह जिल्हा पीपीएम समन्वयक कमेश्वर अमोदेकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा भारंबे, डॉ. शिरीष ठुसे आदी उपस्थित होते. न्यूट्रिशियन सपोर्ट गरजेचा समन्वयक अमोदेकर यांनी क्षय रुग्णांना न्युट्रिशियन सपोर्ट किती गरजेचा आहे याबाबत रोटरी गोल्डसिटी…