जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली नजीक दापोरे येथील २७ वर्षीय तरुणाने बाहेरुन फिरुन येतो असे सांगत घरातून निघून जात रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोलीनजीक दापोरा येथील विशाल शांताराम पवार (वय २७) हा तरुण आई व बहिणीसह रहिवासाला आहे. विशाल हा शिक्षण करीत असतांना आईसोबत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मागील बर्याच दिवसांपासून तो कर्जबाजारीपणामुळे तणावात असल्याचे ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आईला तो म्हणाला की, जरा मी बाहेरुन जावून येतो असे म्हणत तो…
Author: saimat team
यावल : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील किनगावातून घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी (वय ४२) रा.किनगाव खुर्द हे २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपूर येथे गेले होते व ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवून गेल्याची बाब २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावरसमजले. अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रूपये…
जळगाव ः प्रतिनिधी येथील जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू तथा जैन फार्म फ्रेश फूडस् लि.च्या मसाला प्रकल्पातील सहकारी, स्वीमिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कारप्राप्त खेळाडू कांचन चौधरी यांनी बंग्लोर येथे नुकत्याच झालेल्या ’पॅरा स्वीमिंग चॅम्पीयनशीप’ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी ३ सुवर्ण व एक रौप्य पदक पटकाविले. कांचनच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व सहव्यवस्थापकीय संचालक तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, या मुख्य उद्देशासाठी जैन इरिगेशनतर्फे जैन स्पोर्टस् ऍकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍकॅडमीतील खेळाडू कांचन योगेश चौधरी हिला शालेय शिक्षण…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी परिवारातर्फे देवकर महाविद्यालयातील शासकीय आयुर्वेद कॉलेजला कोरोना रुग्णांसाठी एक लाख ६८ हजार रुपयांचे सहा ऑक्सीजन मशिन देण्यात आले. शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन सेवारथ संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रोटरी मिटडाऊनचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी व सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे यांच्या पुढाकारातून ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसात या मशिनसाठी निधी संकलन करण्यात आले. रोटरी क्लब जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे प्रत्येकी दोन तर रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे प्रत्येकी एक अशा सहा ऑक्सीजन मशिन १२ रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील मजुर वर्गाला एमआयडीसीच्या खुल्या भुखंडामधून रस्ता देण्यात यावा याबाबत मनसे जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांच्याकडून गेल्या ८ वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. याची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना स्थळ निरिक्षणाचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नुकतीच एमआयडीसीचे अधिकारी परिसरातील रहिवासी व तक्रारदार यांच्या सोबत प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली व विकास न झालेल्या खुल्या भूखंडातून कामगारांना ये-जा करण्याकरिता रस्ता देता येईल, याबाबत सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, परिसरातील हजारो मजुर ४ कि.मी. च्या फेर्याने एमआयडीसीमध्ये जातात. जास्त संख्येने महिला आहेत. परिसरतील डी ४५/२ हा खुला भूखंड…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट गडद होत असल्यामुळे शहरासह जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातर्फे लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २८ ते ३० मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.या दरम्यान अत्यावश्यक सेवा व वृत्तपत्र वितरणला सुट देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश असतांनाही जळगाव शहरात काही वृत्तपत्र वितरकांना पोलीस नाहक त्रास देत असल्याच्या घटना घडत असून त्याबद्दल वृत्तपत्रसृष्टीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या २८ मार्च रोजी जुने बस स्टॅड,रेल्वे स्टेशन व नविन बस स्थानक परिसरातील वृत्तपत्र वितरण स्टॉलधारकांना पोलिसांनी दमदाटी करुन स्टॉल बंद करण्यास भाग पाडले. याबद्दल एका पोलीस अधिकार्यांकडे भ्रमणध्वनीव्दारे तक्रारही करण्यात…
जळगाव ः प्रतिनिधी एरंडोल येथील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात होळी सणानिमित्त तेथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना प्रांताधिकारी विनय गोसावी, भोजन पुरवठा करणारे कृष्णा धनगर यांनी सरप्राइज म्हणून आज पुरणपोळीचे जेवण देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. एरंडोल येथील कोविड केअर सेंटर येथे ८७ तर ग्रामीण रुग्णालयात २८ असे दोन्ही ठिकाणी १०५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या ठिकाणी क्वारंटाईन असलेले व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण हे बहुतेक ग्रामीण भागातील आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी येथे उपचार घेणार्या रुग्णांना होळीनिमित्त आपल्या घराची आठवणी येऊ नये म्हणून त्यांच्यासोबत हा सण साजरा करण्याचे ठरवले. त्यानंतर होळीला कोविड सेंटरमधील सर्व रुग्णांना पुरण-पोळी, खीर, भात, आमटी,…
चाळीसगाव ः प्रतिनिधी शहरातील हिरापूर रोडवरील दूध डेअरी भागातील लक्ष्मण राजपूत यांच्या भारतीय क्रिडा संस्था या सोशल क्लबवर नाशिक पोलीस महानिरीक्षक व चाळीसगाव पथकाने काल मध्यरात्री छापा मारून रमी, ३ पत्ती नावाचा जुगार कॉइनवर खेळताना १४ जुगार्यांना ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमालासह अटक केली. मुद्देमालात ४६ हजार ६०० रुपये रोख, ८ मोबाईल, कॉइन, ५२ पत्त्याचा कॅट व जुगाराचे साधनांचा समावेश आहे.पथकामध्ये पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि निसार सैय्यद, हवालदार गणेश पाटील, विजय पाटील, विनोद खैरनार आदींचा समावेश होता.नाशिकच्या पथकाने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव ः प्रतिनिधी जगातील नाटक समृद्ध होतंय, युरोप व इतर खंडातील रंगभूमीला राजाश्रय व लोकाश्रय आहे, तसेच कलेसाठी तिथलं वातावरण पोषक असल्यामुळेच जगभरात रंगभूमी समृद्ध होतेय असे मत जागितक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला परिवर्तनतर्फे चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. ‘जागतिक स्तरावर मराठी रंगभूमी’ वरील चर्चासत्रात रंगभूमीचे अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी आढावा घेतांना आपल्या मर्यादा व क्षमतांचा अभ्यास व्हावा तसेच अमराठी रंगभूमीवरील बदलांचा अभ्यास केल्यास आपली रंगभूमी समृद्ध होऊ शकते असे मत व्यक्त केले. कलावंतांचे प्रश्न हे जागतिक नागपूरचे रूपेश पवार यांनी कलावंतांचे प्रश्न हे जागतिक आहेत. प्रत्येक देशातील स्वरूप वेगळे असले तरी सेंसॉरशीप वेगवेगळी आहे असे म्हटले. भुसावळच्या रंगकर्मींनी जागतिक…
जळगाव ः प्रतिनिधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल व मे २०२१ मध्ये दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा दोन महिने उशिराने होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. तर बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे तर बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ५ ते २२ एप्रिल या दरम्यान घेतली…