जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेतील सत्तांतरानंतर प्रथमच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून पालकमंत्री कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली. या वेळी महापौर आणि उपमहापौर यांनी शहराच्या विकासाबाबत विविध मुद्यांवर मंत्र्यांसोबत चर्चा केली. जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर…
Author: saimat team
यावल ः प्रतिनिधी येथील नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या वैशिष्ट्यपूर्ण व १४ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या जलकुंभ, रायझिंग (मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन) व वितरण व्यवस्थेसाठी जलवाहिनी टाकण्याची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आता पुर्णत्वास आली आहे. याबाबत यावल नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, यावल नगरपरिषदेची हद्दवाढ सन २०१० मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील काही वसाहती वगळता इतर भागांमध्ये खाजगी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात होता. या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा बाबतच्या अडचणी लक्षात घेता विस्तारीत भागातील सर्व वसाहतींना नगरपरिषदद्वारा शुद्ध व नियमित पाणीपुरवठा…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. यामुळे टंचाई निर्माण होऊन उपचारात बाधा येवू शकते. असा बाका प्रसंग टाळण्यासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी लोकसहभागातून ‘ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर’ची खरेदी होणार आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हाकेस प्रतिसाद देत व्यापारी, मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय आघाडीसह इतर दात्यांनी दोन दिवसांत १८ लाखांचा निधी उभा केला.या रकमेतून आधी दोन ड्युरा सिलिंडर (एक ड्युरा सिलिंडरमध्ये १५ किलो क्षमतेचे ३० सिलिंडर बसतात) खरेदी केले जातील. यामुळे ६५ रुग्णांना सलग ७ तास ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरेल. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सुविधेच्या ४५ खाटा आहेत. तेथील रुग्णांवर उपचारासाठी…
जळगाव ः प्रतिनिधी लेवा सखी घे भरारी जळगाव ग्रुपतर्फे मंगळवारी ‘कळी उमलताना’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र झाले. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे यांनी किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील बदल, समस्या आदींवर मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. मुलींनी लाजेस्तव कोणालाही विचारू शकत नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न आयोजकांकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ते प्रश्न कार्यक्रमाचे दरम्यान डॉक्टरांना विचारले. स्त्रीसुलभ समस्यांवर योग्य उपाय, नकळत झालेल्या चुकांचे आरोग्य, मानसिकता,आयुष्यावर होणारे दूरगामी परिणाम, अजाण वयात कोणावर विश्वास ठेवावा. शारीरिक बदलाला कसे सामोरे जावे, अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.यशस्वीतेसाठी डॉ.भारती वसंत ढाके, डॉ. नीलम विनोद किनगे, सविता अनिल भोळे, डॉ. स्मिता पाटील यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयातर्फे येथील नेहा महेश मोता याविद्यार्थीनीला ‘मेरीट-कम-मिन्स’ (एमसीएम) अंतर्गत २०२०-२१ या वर्षाची १० लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्री कच्छी दशाविशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतीलाल मोता यांची नेहा ही कन्या आहे. जिल्ह्यातून तसेच जैन समाजातून केंद्र शासनाची मोठी शिष्यवृत्ती मिळवणारी नेहा ही एकमेव विद्यार्थीनी असल्याची शक्यता आहे. नेहा आयआयएम बंगळुरू मध्ये एमबीएच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. तसेच पुण्याच्या गव्हर्मेन्ट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) ची पदवी तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. नेहाने शालेय जीवनापासून विविध शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. यात इयत्ता सातवीतील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती (२००८),एनसीइआरटी,…
जळगाव : जिल्हा प्रतिनिधी धरणगाव शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. यासर्व परिस्थितीवर कालच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील आणि रविंद्र कंखरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली होती.रात्री जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी अचानक धरणगाव ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. याप्रसंगी रविंद्र कंखरे यांच्यासह पालिकेतील सेनेचे गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, राहुल रोकडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल रात्री अचानक येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. येथील औषधी साठा व कर्मचार्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकार्यांच्या या भेटीला पालकमंत्र्यांचे समर्थक रविंद्र…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी २९ चारचाकी आणि ७० दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्तेही वाहने पोलिस दलाला सुपूर्द करण्यात येणार आहेत. जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलिस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४)…
अमळनेर ः प्रतिनिधी आज दि.१ गुरुवार रोजी सकाळी ८.३० स्टेट बँक येथे राहुल महाजन व जय योगेश्वर कॉलेज ढेकू रोड येथे प्रसाद शिरसागर व कोंबडी बाजार येथे नगरपरिषदेतर्फे दुपारी ४ ते ७ गणेश शिंगारे अँटिजेंन टेस्ट कॅम्प आयोजन केले. यावेळी प्रांताधिकारी सिमा आहिरे व मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड उपस्थित होते. यावेळी तपासणी कामी राहुल महाजन, लॅब टेक्नॉशियन मनोज निकुंभ, योगेश पाटील हे काम पाहत आहेत. उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी चाचणी करून नियमांचे पालन करावे, असे सांगितले.
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेच्या थकबाकी पोटी सुरु असलेल्या गाळे सीलच्या कारवाईच्या विरोधात बुधवारी श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, आज गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु होणारे साखळी आंदोलन स्थगित केले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या गाळेधारकांनी दुपारी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत भीकमांगो आंदोलन केले. यातून जमा झालेले भीकेचे पैसे महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. दरम्यान,संध्याकाळी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी राजस कोतवाल व तेजस देपुरा यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन महापालिकेच्या भूमिकेच्या विरोधात साखळी उपोषण करीत असल्याचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संसर्ग वाढीमुळे उपोषण न करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित…
जळगाव ः प्रतिनिधी समाजवादी पार्टीचे जिल्हा निरीक्षक शेख मोईनुद्दिन इक्बाल अहमद(शेकु)यांच्यातर्फे लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना त्यांना चहा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते साजिद तडवी, प्रशांत झेंडे, अकील पटेल, युसुफ शहा, युसुफ खाटीक उपस्थित होते.यावेळी मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.समाजवादी पार्टीच्या या उपक्रमाचे पोलीस कर्मचार्यांनी स्वागत केले.