Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात गंभीर व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यक असते. मात्र, शहरात शासकीयसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याने बेड शिल्लक नाही. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मोहाडी येथील रुग्णालयात दोन दिवसांत दोनशे बेड सुरू करण्याचे सांगितले आहे. तर महिन्याभरात याच ठिकाणी ८०० बेड तयार करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी महिला रुग्णालयात कामाला गती आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. बेड फुल्ल, रुग्णांचे हाल तालुकास्तरावर ऑक्सिजनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना जळगाव शहरात उपचारासाठी दाखल केले जात आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात आजपासून (दि. १ एप्रिल) लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचून घेता येणार आहे.त्यासाठी शहरात १८ खासगी वाढीव केंद्रांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र,त्यापैकी फक्त २ केंद्रांनाच परवानगी मिळाली आहे.त्यामुळे शहरातील पूर्वीचे १८ व नवीन वाढीव २ असे २० केंद्रांवर लस घेता येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लस पुरवठा करणार्‍या स्टोअर्सकडे एकही लसीचा डोस शिल्लक नाही. आज गुरुवारी नवीन २७ हजार डोस प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरणाचे चार टप्पे झालेत. त्यात १ लाख ४३ हजार ६४९ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. तसेच पाच टप्प्यात जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी पाचोरा- भडगाव मतदार संघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात काल दुपारी ३.३० वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी त्यांनी पाचोरा व भडगाव शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी किती निधी लागतो त्याची माहिती घेत त्वरित साहित्य खरेदी करून गोरगरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , सोबतच अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स बांधवानी देखील पहिल्या टप्यात केलेल्या कामा प्रमाणेच…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने काल झाली. या सभेत आमदार गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मांडून त्यास मंजुरी देण्यात आली. विजय पाटील यांची निवड ऍड. विजय पाटील यांची सर्व सभासदांतर्फे सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सभेत एकूण आठ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. या वेळी संचालक मंडळातर्फे सर्व सभासद बांधवांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आवहन करण्यात आले. संस्थेतर्फे कुठलाही आयत्या वेळचा विषय नव्हता. सभासदांमधून विनोद पंजाबराव देशमुख यांनी आयत्या वेळचा विषय मांडला. गेल्या तीन वर्षांपासून गिरीश महाजन यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला ३ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. सहज हाताळता येणारे आणि कुठेही घेवून जाता येणारी ही मशिन रुग्णांसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात डॉक्टर्स डे निमित्त ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर या उपकरणाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, सुशिल कस्तुरीचंद बाफना, ड्युटी डॉक्टर परिमल हे उपस्थित होते. याप्रसंगी सुशिल कस्तुरीचंद बाफना म्हणाले की, भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या शिकवणीतून आपण समाजाचे एक घटक आहे, त्या भावनेने आपण समाजाचे देणे लागतो तसे संस्कारही आमच्यावर केले आणि आज त्याच…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तीन दिवसांचा प्रति लॉकडाऊन निमित्त लावण्यात आलेले विशेष निर्बंध आज संपुष्टात आले.त्यापाठोपाठ आगामी १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत. त्यात सिनेमागृह, मॉल, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षकगृहे आदी ठिकाणे सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. या काळात रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र, सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत संस्थांना त्यांच्या भाग भांडवलावर १० टक्के लाभांश अदा करण्यात आला आहे. यासह नफा वाटणी करतांना ६० टक्के रिबेट देण्यात आला. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्के दूध संकलन कमी झाले आहे. यामुळे संघाचे भागभांडवल वाढविण्यासाठी प्रती लिटर १० पैशांवरून २० पैसे कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. दूध संघाच्या नवीन इमारतीमध्ये ऍपद्वारे ही सभा घेण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनीताई खडसे यांनी अहवालाचे वाचन करीत संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेच्या ६४० संस्था सभासद झालेल्या आहेत, त्यात ६४ नवीन आहेत. २ लाख ६० हजार…

Read More

यावल ः प्रतिनिधी दि. २७ रोजी चौथा शनिवार व दि.२८ होळी आणि दि.२९रोजी धुलिवंदननिमित्त शासकीय सुटी आल्याने तसेच यावल तहसीलदार वगळता काही महसुल अधिकारी,कर्मचारी आणि अनेक तलाठी,सर्कल हे आपल्या मुख्यालयाठिकाणी राहत नसल्याची सुवर्णसंधी साधून वाळूतस्करांनी अवैध वाळू वाहतूक खुलेआम करून ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवून मोठा उच्चांक गाठला. यावल पोलीस सुद्धा दिवस-रात्र बंदोबस्त करून सकाळी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान साखर झोपेत राहत असल्यामुळे वाळू तस्करांना पोषक वातावरण निर्मिती झाली होती तरी आता महसूल आणि पोलिस विभाग नेहमीचे शासकीय कामकाज करताना वाळूतस्करांविरुद्ध काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. यावल तहसील कार्यक्षेत्रात तसेच यावल व फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणे शिवारात आज सकाळी शेतात काम करणार्‍या शेतमजुरावर अचानकपणे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतमजुर ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाणे येथे कैलास उत्तम नाईक (वय ३०) हा शेतमजुरी रहिवासाला असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमजुरी करुन करतो. नेहमीप्रमाणे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह आव्हाणे शिवारात दादर कापण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आई-वडिल, पत्नीसह काही मजुरांसह दादर कापत असतांना शेताच्या बांधावर लपलेल्या मोठ्या रानडुकराने अचानक कैलास नाईक याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेत असतांना आव्हाणे फाट्याजवळच…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे एका महिलेची आजारास कंटाळून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापूर्वी दहिगाव येथील राहणार्‍या कोकीळाबाई प्रकाश पाटील (वय ६०) यांनी आजाराला कंटाळून नायगाव रोडवरील दहिगाव शिवारातील राजु दगडू पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत महिलेचे मेहुणे छन्नु पाटील (रा.नेरी, ता.जामनेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहेत.

Read More