जळगाव ः प्रतिनिधी मनपात झालेल्या सत्तांतरामध्ये माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचीदेखील भूमीका होती. मनपात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मुख्यमंंत्र्यांशी संवाद साधला होता. दरम्यान, महापौर निवडीनंतर महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांंनी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या शहरातील निवासस्थानी जावून भेट घेतली. माजीमंत्री एकनाथराव खडसे जळगाव शहरात आले असता महापौर जयश्रीताई पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली. खडसेंनी दोन्ही नवनिर्वाचीत पदाधिकांर्याचे स्वागत केले. या वेळी माजी आ.डॉ .गुरूमुख जगवाणी, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, डॉ.अभिषेक ठाकूर, प्रा.सचिन पाटील, राष्ट्रवादीचे अशोक पाटील, ललित शर्मा, युसूफ पिंजारी उपस्थित…
Author: saimat team
यावल ः तालुका प्रतिनिधी येथील तहसीलदार महेश पवार कोरोना पॉझिटिव असतानाही शासकीय कामकाज सुरू… असे वृत्त फक्त आणि फक्त दैनिक साईमतमध्ये दि.१८मार्च २०२र्१ रोजी प्रसिद्ध झाल्याने वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसीलदार महेश पवार यांची वैद्यकीय रजा मंजूर केली आहे. महेश पवार यांच्या वैद्यकीय रजेच्या कालावधीत त्यांच्याकडेच असलेला तहसीलदार यावल या पदाचा अतिरिक्त कार्यभार यावल तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढून आदेशाच्या प्रती उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर, तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार पाटील यांच्यासह संबंधित अधिकार्यांकडे पाठविला आहे.
जळगाव : विशेष प्रतिनिधी महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतच्या महिला महापौरांमध्ये शिवसेनेच्या जयश्री महाजन यांच्या रूपाने सर्वात उच्च शिक्षीत महापौर लाभल्यामुळे त्यांच्याकडून जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सूत्रे हाती घेतल्यानंतर खड्डेमुक्त करण्याचा त्यांनी केलेला दृढ निर्धार हा जनेतला निश्चितच दिलासा देणारा असला तरी तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होणे हे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी गाळेधारकांचा प्रश्नही मार्गी लावण्याचा निर्धार बोलून दाखविला असला तरी ते मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. महानगरपालिकेला जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने नवीन खेळाडू भेटले असून आता महापालिकेत ‘नवा भीडू नवा खेळ’ असा प्रयोग सुरू होणार असून या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी दोघा…
कासोदा, ता.एरंडोल ः वार्ताहर कासोदा ते फरकांडे रस्त्याची दुरावस्था झाली असून ‘रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते’ असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. हा रस्ता कासोदा ते पारोळा जोडणारा मुख्यरस्ता असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी जातीने दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावरून प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे लक्षात येते. कासोदा ते पारोळा जोडणार्या फरकांडे, लोणी मार्गावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. कारण या मार्गावर जितकी वाहने, तितकेच खड्डे अशी स्थिती आहे. प्रत्यक्षात या रस्त्याला बघून या रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता आहे? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या रस्त्यालगत फरकांडे येथे इतिहास कालीन झुलते मनोरे आहेत.…
धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी होलिकोत्सव: सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्यप्रदेश या राज्यातील वरला, बलवाडी, पलसुद, सेंधवा, बडवाणी, खरगोन या गावांची भोंगर्या बाजाराची तयारी जोरात सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल लवकरच सुरू होणार आहे. आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणारा भोंगर्या उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे़ आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सातपुड्यांच्या पाड्यांवर ढोलचे निनाद ऐकू येऊ लागले आहेत़. २२ मार्च पासून भोंगर्या बाजाराला सुरुवात होणार आहे. सातपुडा परिसरातील खेड्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातील वरला, बलवाडी, बडवाणी, खरगोन, सेंधवा अशा मोठ्या बाजार पेठेतील गावांमध्ये देखील भोंगर्या बाजाराची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या डिजिटल…
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील यांची जिल्हा नियोजन समिती ( डिपीडीसी) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी धरणगाव तालुका पदाधिकारी मोहननाना पाटील , तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, ज्येष्ठ नेते रविदादा पाटील,नाटेश्वर पवार, भवरखेडा सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, उज्ज्वल आबा मजदुर फेडरेशनचे सुजित आण्णा, खुशाल आप्पा आदि पदाधिकारी उपस्थित होते .
जामनेर : प्रतिनिधी येथील मधुकर नथ्थू पाटील (वय ६६) यांचे आज पहाटे ५ वाजता पाचोरा येथील रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. जळगावातील प्रिटींग क्षेत्रातील ते जुने व अनुभवी कर्मचारी होते.प्रारंभीच्या टप्प्यात दैनिक जनशक्तीत काम केल्यानंतर ते साईमतच्या प्रिटींग विभागात सक्रीय झाले होते.त्यांनी अनेक वर्ष निष्ठेने साईमतमध्ये सेवा दिली.कोरोना काळात त्यांनी अलिकडे विश्रांतीसाठी जामनेर निवासस्थानी मुक्काम केला होता. ते स्वभावाने प्रेमळ व मनमिळावू होते.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जळगाव ः प्रतिनिधी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजीव गांधी सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाभरातून आलेले जवळपास २१ प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल होऊन प्रलंबित होते. त्यासंदर्भात दिव्या भोसले यांनी गेल्या २२ऑक्टोबरला जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले होते व लवकर मीटिंग घेऊन पुणे संचनालयाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.त्यांंनी लगेच २ दिवसात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जवळपास ४ महिने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला व १३ मार्चला अनुदान जाहीर झाले. या…
जळगाव : प्रतिनिधी महापालिकेत झालेल्या सत्तांतराच्या घडामोडीत कोणताही नेता नाही असे काही नगरसेवक वारंवार सांगत असले तरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा या सत्तांतरात मोठा सहभाग असल्याचे समजले. या सर्व घडामोडींची सुरुवात एकनाथराव खडसे म्हणतात की, कामानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरुन जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शहराच्या विकासासंदर्भात बोलतांना तुम्ही ठरविले तर विकास शक्य होईल असे म्हणत मनपामध्ये माझ्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मनपाच्या सत्ता बदलाबाबत चर्चा होवून शिवसेना नेते विनायक राऊत व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत म्हणजेच आमच्या चौघांमध्ये याबाबत धोरण ठरले होते, अशी स्पष्ट टिप्पणी माजी मंत्री…
जळगाव: विशेष प्रतिनिधी गेल्या २०१८ ला झालेल्या महापालिका निवडणुकीची सूत्रे अर्थात भाजप कडून तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती.आणि २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या.तेव्हा महाजन जळगावकरांना विश्वास देत होते की, ‘‘तूम्ही आम्हाला महापालिकेत सत्ताद्या ,आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू ‘‘आणि इतकेच नाही तर आम्ही शहराचा विकास म्हणजे चेहरा-मोहरा बदलू शकलो नाही तर विधानसभेसाठी मते मागायला येणार नाही. जळगावकर नागरिक सुज्ञ होते , काय हरकत आहे म्हणून त्यांनी महाजनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली. आणि जळगाव महापालिकेत भजपाला भूतो न भविष्यती असे प्रचंड बहुमत मिळाले होते (७५ पैकी ५७) त्यानंतरम्हणजे २०१८ नंतर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुका…