जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे शिरसोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना मास्क आणि ग्लोजचे वितरण करण्यात आले.रोटरी सेंट्रलचे सदस्य राजेंद्र पिंपळकर यांचे यासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासर, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल, आरोग्य सेवक निलेश चौधरी,अनिल महाजन, आरोग्य सेविका रेणुका आदिंची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लब जळगावतर्फे चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जळगाव – येथील रोटरी क्लब जळगावतर्फे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोहाडी येथील शासकीय रुग्णालयास चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या. चारही मशीनचे प्रायोजकत्व रोटरीचे जेष्ठ सदस्य कंवरलाल संघवी यांनी स्वीकारले होते. यापूर्वी रोटरी…
Author: saimat team
जामनेर : प्रतिनिधी कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर व पहूर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली .याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांची ही उपस्थिती होती . दोन दिवसांपूर्वी अर्जून जाधव य प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाला. आज (ता.३) सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्यांसह महिनाभरात ११ जणांचा कोरानाने बळी घेतला असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.प्रशासनाची नजर चुकवून शेतशिवारात लग्न सोहळे धूमधडाक्यात होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे.ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यात लसीकरणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नाही.आज घडीला २१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळातदेखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.त्यात जळगाव परिमंडलातील ४५ हजार १७४ जोडण्यांचा समावेश आहे.दरम्यान आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विदगाव येथील एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्याला असलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव येथे श्रीराम जीवराम कोळी (वय ७०) हे पत्नी व दोन मुलांसह रहिवासाला आहे. ते दोन्ही मुलांसह शेतीचे कामकाज करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. अनेक ठिकाणी उपचार करुनही ते त्या आजारातून बरे होवू शकले नाहीत. वारंवार उपचार घ्यावा लागत असल्याने ते ह्या आजाराला कंटाळले होते. काल रात्री कुटुंबियांसोबत…
जळगाव : प्रतिनिधी पहाटे शतपावलीसाठी निघालेल्या ४३ वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ईच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात काळे नगरात वास्तव्यास असलेले सतिश शंकर परदेशी (वय ४३) हे वकिलीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मागील काही दिवसांपासून त्यांचे काका हे आजारी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी रात्रभर ते जिल्हा रुग्णालयातच मुक्कामाला होते. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते शतपावलीसाठी सिंधी कॉलनीच्या मार्गाने शतपावली करत राष्ट्रीय महामार्गावरील…
जळगाव ः प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहाडी येथील शासकीय महिला रूग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. या ठिकाणी १०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सोमवार, ५ एप्रिलपासून येथे सर्व सुविधा उपलब्ध होणार असून या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. शासनाने २०१६-१७ या वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ७५ कोटी रूपयांचे स्वतंत्र महिला हॉस्पिटल बांधण्यास मंजुरी दिली होती. हे हॉस्पिटल बांधून तयार झाले आहे. हॉस्पिटलचे काम अंतीम टप्प्यात असतांना या ठिकाणी तातडीने १०० खाटांचे कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. १०० खाटांची तात्पुरती व्यवस्था केली असून गरजेनुसार येथे ८०० रूग्णांची व्यवस्था…
जळगाव ः प्रतिनिधी महापालिका प्रशासनाकडून गाळे भाडे थकबाकीपोटी करण्यात येत असलेल्या सीलच्या कारवाईच्या विरोधात शहरातील १६ अव्यावसायिक मार्केट बंद ठेवले असून रोज वेगवेगळ्या मार्केटमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी चौबे मार्केटमधील गाळेधारकांनी घंटानाद आंदोलन केले. दुपारी गाळेधारकांनी दुकानासमोरील पत्र्यांच्या छतावर चढून घंटा वाजवून मनपा प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. यामुळे रस्त्यावरुन येणार्या जाणार्यांचे लक्ष वेधून घेतले. धर्मशाळा मार्केट गाळेधारकांची विनंती धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना महिना २५ हजार भाडे कसे भरणार असा सवाल उपस्थित केला आहे. २०१३ पर्यंत दरमहा ६ हजार रुपये भाडे भरलेले आहे. पालिकेने आता सर्व भाडे व ट्रॅक्स मिळून प्रतिवर्षी २ लाख ४०० रुपये प्रमाणे आदेश…
जळगाव ः प्रतिनिधी चोपडा, जामनेर, एरंडोल येथील शासकीय कोवीड सेंटर मध्ये रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने के. परवीन मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअरच्या माध्यमाने या रुग्णांना दिलासा देऊन फक्त ७४९ रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले त्यावेळी रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत वेदनादायी अशा होत्या. कोविड महामारी प्रसंगी इंजेक्शनचा तुटवडा, तसेच इंजेक्शनसाठी सुरू असलेला काळाबाजार बघितला असता बिरादरीने सदर प्रकरणी जळगाव व मुंबईच्या आपल्या मित्रपरिवाराशी संपर्क साधून रेमडेसिव्हर उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांना दिलासा मिळालेला आहे. जिल्हा बाहेरील रुग्णांची मागणी जळगाव जिल्हा मध्ये जसा तुटवडा आहे तसाच जिल्हा बाहेरील नाशिक, बुलढाणा, नंदुरबार ,शहादा येथे तुटवडा झाल्याने जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील दादावाडी परिसरात पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे तब्बल दोन महिन्यांपासून तसेच सोडून देण्यात आले आहेत. या खड्ड्यात दररोज अवजड वाहने फसतात, रात्रीच्या वेळी दुचाकीधारक, पायी जाणार्यांचे अपघात होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. याबाबत अनोखे आंदोलन करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ठिकाणी आमदार आणि खासदारांच्या नावे सेल्फी पॉइंट सुरू केला आहे. दादावाडी परिसरात महामार्गाला लागून असलेल्या मंदिराजवळील रहिवासी परिसरात गेल्या २ महिन्यांपासून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही हा खड्डा बुजवण्यात आला नाही.आतापर्यंत १५ ते २० मोठी अवजड वाहने या खड्ड्य्ात फसली आहेत. रात्रीच्या वेळी अनेक नागरिकांचा या खड्ड्यांमध्ये अपघात झाला आहे.…
जळगाव : प्रतिनिधी वरणगाव येथील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराला जिल्ह्यातील सर्वाधिक सुंदर तीर्थक्षेत्र बनवू असे संस्थानचे अध्यक्ष चंदक्रांत बढे यांनी सांगितले. या कामांसाठी तत्कालीन मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून २ कोटी ७४ लाख रुपये निधी मंजूर करून दिला होता. त्यातून शुक्रवारी नियोजित कामांचा नारळ वाढवताना बढे बोलत होते. तत्कालिन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी नागेश्वर महादेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ७४ लाख रुपये मंजूर केले होते. या निधीतून सभामंडप, पेव्हर ब्लॉक, उद्यान, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय आदी सुविधांसह तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर ते वरणगाव येथील रेस्टहाऊस पर्यंत रस्ता रुंदीकरण, दुभाजक, पथदिवे या कामांचा समावेश आहे. या कामांना सुरुवात…