जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करताना त्यात उत्पन्नाच्या काही बाबी सादर न झाल्याने शिवसेनेने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले होते.आधीच जिल्हा परिषदेच्या मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमध्ये प्रशासनाने अनेक उत्पन्नाच्या बाबींसंदर्भात अर्थविभागाला अंधारात ठेवले होते. या विभागांकडून ही माहिती मागवण्यात आली आहे. ती सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहे. शासनाकडून विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात. यापैकी काही योजना राबवणे हे जिल्हा परिषदेला सक्तीचे असते. तर काही योजना राबवण्यासाठी शासनाकडून त्या निधीच्या २ ते ४ टक्क्यांपर्यंत अभिकरण शुल्क म्हणून जिल्हा परिषदेला एजन्सी म्हणून कमिशन दिले होते. या योजनांमधून मिळणारे उत्पन्न देखील अधिक असते. जिल्हा परिषदेतील विविध १२ विभागांसाठी…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी काही औषधविक्रेते रेमडेसिविर इंजेक्शन जादा दाराने विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत हे इंजेक्शन १ हजार २०० रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्ह्यातील काही औषध विक्रेत्यांकडून अद्यापही जादा दरात इंजेक्शन विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यासंदर्भात भूमिका विषद करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.या वेळी केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर, सहसचिव श्रीकांत पाटील,भुसावळ तालुका सहसचिव ईश्वर चौधरी आदी उपस्थित…
जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र व रोटरी गोल्डसिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी शहरातील २० क्षयरोगाने पीडित रुग्णांना एक महिन्याचा किराणा तसेच प्रोटीन पावडरचे डबे देऊन मदतीचा हात देण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम पुढील सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मान्यवरांनी केला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या डी.बी.जैन रूग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी गोल्डसिटी क्लबचे सदस्य डॉ. दीपक अटल यांच्यासह जिल्हा पीपीएम समन्वयक कमेश्वर अमोदेकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा भारंबे, डॉ. शिरीष ठुसे आदी उपस्थित होते. न्यूट्रिशियन सपोर्ट गरजेचा समन्वयक अमोदेकर यांनी क्षय रुग्णांना न्युट्रिशियन सपोर्ट किती गरजेचा आहे याबाबत रोटरी गोल्डसिटी…
यावल ः प्रतिनिधी यावल येथील जमीन गट नंबर ६९३ ला लागून असलेल्या नाल्यात भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून जमीन लाटण्याचा गोरखधंदा, असे वृत्त ‘दैनिक साईमत’मध्ये दि.२३ मार्च रोजी प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेत यावल मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करताना रॉ-मटेरियल नाल्याच्या काठी टाकून रस्ता करण्यासाठी टाकले आहे, असे नमूद करून आपली हुशारी दाखविली आहे. यावल येथील फैजपूर रोडवर मनुदेवी मंदिराच्या पाठिमागे सोमवार रस्त्यावर नाल्यात गट नंबर ६९३ च्या बाजुला नाल्यात रॉ मटेरियल टाकून रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय जमीन लाटण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करताना नाल्यात रॉ-मटेरियल…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या काही वर्षांत शासनाचा निधी वेळेत खर्च न झाल्याने परत पाठवण्याची नामुष्की आली आहे. आता देखील ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे शिल्लक काळात कामे पूर्ण करून निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या. परंतु केवळ अधिकार्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा महापौर जयश्री महाजन यांनी दिला आहे. विलंबाची कारणे जाणून घेतली महापालिकेत महापौर व उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुधवारी प्रथमच जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. विभागांमार्फत कोणती महत्त्वाची कामे सुरू आहेत याचा आढावा घेतला. तसेच कामांच्या प्रगती व विलंबाची कारणे जाणून घेतली. या वेळी बांधकाम…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पत्रकार भवनाच्या शेजारील जे.पी. शूज नावाचे दुकान फोडत चोरट्यांनी २४ हजाराची रोकड लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजकुमार शंकरलाल नथाणी (रा.पाचोरा, ह.मु. रॉयल पॅलेसच्या मागे, जळगाव) यांचे मालकीचे जे.पी. शूज हे दुकान तहसिल कार्यालयालगत पत्रकार भवनाच्या शेजारी आहे. नाथाणी हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुकान बंद करून गेले होते. काल मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्हीचे कॅमेरे तोडल्यानंतर दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक व आजुबाजूचे दोघे कुलूपे कटरच्या सहाय्याने कापले. त्यानंतर शटर उघडून दुकानामधील ड्रॉवर फोडून त्यातील…
धरणगाव ः प्रतिनिधी येथील ज्येष्ठ पत्रकार मगनलाल मोतीलाल बन्सी(वय ७०) यांचे आज दि.२२ रोजी दुपारी १२.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. कोवीडची लस घेतल्यानंतर दोन दिवसापुर्वी त्यांना प्रकृती बिघडल्याने जळगाव येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार घेत असतांना आज दुपारी १२.३० वा.त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी साप्ताहिक पोलखोल प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली व त्यानंतर त्यांनी गावकरी,जनशक्ती, साईमत व इबीएम न्युजचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले.एक जुने-जाणते पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वा. धरणगाव येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव ः प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासन व स्थानिक पोलिस प्रशंसानाने सयुंक्त रित्या कारवाई करीत एरंडोल तालुक्यातील कासोदा ग्रामपंचायत हद्दीतील धान्यमार्केट समोरील गोपाल नगर बांभोरी शिवारातील पत्र्याच्या शेड असलेल्या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल ९ लाख १५ हजार २००. रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत गोदामावर जाऊन तपासणी केली व या ठिकाणी हजर असलेल्या व्यक्तीस विचारले असता , सदर व्यक्तीने दुकान व गोदाम आमचेच असल्याचे सांगितले, गोदामात गुटखा साठविला जात असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व औषधी विभाग यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोदामातून विमल पान मसाल्याचे ४१६० कंपनी पॅक पाकिटे प्रत्येकी किंमत १८७…
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौर निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी घरी जावून महापौरांचा सत्कार केला तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा त्यांच्या दालनात जावून सत्कार केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी महापौर जयश्री महाजन यांचा सत्कार केला. या वेळी अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, शकिला तडवी, संदीप पाटील, दिलीप माहेश्वरी, सलीम इनामदार, सुनील माळी, अरविंद मानकरी आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेतर्फे बेंगलोर कर्नाटक येथे झी स्विमिंग अकॅडमी येथे होत असलेल्या विसाव्या राष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक स्वीमिंग स्पर्धेसाठी जैन स्पोटर्स अकॅडमी व जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेची खेळाडू तथा एकलव्य पुरस्कार प्राप्त कुमारी कांचन योगेश चौधरी या एकमेव खेळाडूची निवड झाली असून त्या बंगलोर साठी रवाना झालेल्या आहे. त्यांना जळगाव जिल्हा पॅरा ऑलिंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख व खजिनदार प्रभावती चौधरी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून शुभेच्छा दिल्या.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कांचन चौधरी ह्या जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असून महाराष्ट्रातील एकूण ४३ खेळाडूंचा यात सहभाग आहे.