चाळीसगाव, प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार,मा खासदार श्रीकांतजी शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य मा.मंगेशजी चिवटे साहेब यांच्या हस्ते साहेबराव काळे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव उपजिल्हा प्रमुख या पदावर निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या अभिनेत्री दिपाली सैय्यद,आमदार.अमोल मिटकरी,अभिनेता कुशल बद्रिके,जिल्हा संपर्क प्रमुख वैद्यकीय आघाड़ी जितेंद्र गवळी,जिल्हाप्रमुख वैद्यकीय आघाड़ी डाॅ मोईज देशपांडे,मुराद पटेल,ज्ञानेश्वर ठाकरे ,राहुल पाटील, सागर चौधरी,सागर जाधव, सचिन फुलवारी,मनिष सैदाणे आदी उपस्थित होते. चाळीसगाव तालुका जिल्ह्यातील नागरिकांनी साहेबराव काळे यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केली. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या राज्यांमध्ये इतर राज्यांमधून आलेल्या लोकांना स्वत:च्या राज्यात परतण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका मोदींनी केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक वेळ केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडीमार केला. याच टीकेवरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी भाजपावर टीका केली आहे. थरुर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलतांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी केलेले भाषण हे…
मुंबई, वृत्तसंस्था । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने आदेशानुसार एका विशिष्ट समाजावर टिप्पणी केल्याप्रकरणी / ऍक्ट मधील तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर सादर करण्यात आली. हिसार येथील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताची अटकपूर्व जामीन याचिका 28 जानेवारी रोजी फेटाळली होती. एका कार्यक्रमात अभिनेत्री मुनमुन दत्ताने एका विशिष्ट जातीविरोधात चुकीची टिप्पणी केली होती, त्याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर मुनमुन दत्ताने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आसरा घेतला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अवनीश…
पाचोरा, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रा आज दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात शरद युवा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व युवक, कार्यकर्ते, बूथप्रमुख, बूथ कार्यकर्ते, युवती, महिला तसेच सर्व फ्रंटचे प्रमुख…
मुंबई, वृत्तसंस्था । दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. परमेश्वर कोकाटे या तरुणाने 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12 च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. गॅरेजमध्ये एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती परमेश्वरने दिली. महिती मिळताच लगेच दहिसर पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. गारपिटीचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती निवळल्यानंतर पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर दोन दिवसांनंतर पश्चिम भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी“ या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवनात झाली.आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी स्वतः तक्रारींची सुनावणी घेतली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी“ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जनसुनावणीवेळी जिल्हाधिकारी अभीजित राऊत, पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सदस्या उत्कर्षा रुपवते,दीपिका चव्हाण,जि.प.चे सीईओ पंकज आशिया,प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी…
मुंबई, वृत्तसंस्था । अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे. बंदरे, विमानतळे,खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचे ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलेय. याचवेळी अंबानींची एकूण संपत्ती ही 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे.अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले…
जळगाव, प्रतिनिधी । कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी लतादीदींच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, त्यांचे कार्य किती मोठं होते मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच लतादीदी ना जब तक सुरज चांद रहेगा लतादीदी आपका नाम रहेगा अशा जयघोषात व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे , ईश्वर पाटील राजू पाटील, रवींद्र कोळी, सुधाकर पाटील, किरण पाटील, गणेश राजपूत, मुकेश राजपूत, धनसिंग पाटील, अजय पाटील, सागर कासार, दिलीप…