जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे अनुभव येत असले आणि त्याची भीती लसीकरण केंद्रांवरील गर्दीतून जाणवत असली तरी गेल्या वर्षभरात या आजाराची ‘दहशत’ मात्र पुष्कळशी कमी झाल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यातून कोरोना मृतांच्या नातलगांचे वर्तन बदलले असून ते धोकादायक असले तरी माणुसकी परतत असल्याचीच अनुभूती देणारे आहे. अर्थात, हा बदल टिपलाय नेरी नाका स्मशानातील सहायकाने. मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाची साथ आली तेव्हा मृतांच्या नातलगांमध्ये या साथीची प्रचंड दहशत होती. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना संसर्ग झालेले मृतदेह येत होते तेव्हा त्यांचे नातलग १०० मीटर दुरूनच अंत्यसंस्कार पाहात होते. क्वचित एखादा नातलग मृताचा चेहरा पाहण्याची इच्छा…
Author: saimat team
भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मात्र, बुधवारी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा बिकट स्थितीत भाजपचे तथा अध्यक्ष, ओमः सिध्दगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ नी.तू.पाटील यांनी स्वखर्चातून सात हजार रुपयांचा १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सिजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सिजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर…
जळगाव ः प्रतिनिधी १४ एप्रिल बुधवारी रमजान महिन्याचा पहिला रोजा सर्व भारतात करण्यात आला.महाराष्ट्र राज्यात असलेल्या कडक निर्बंधात उपवासाला सुरुवात झाली. नमाज व रोजा घरातूनच साजरे करा-आवाहन रमजानची नमाज व रोजा हे आपआपल्या घरातूनच साजरे करण्याबाबत शासनाचे परिपत्रक असल्याने त्याची अंमलबजावणी पुरेपूर करण्यात यावी असे आवाहनसुद्धा शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक,सचिव फारूक शेख यांनी काल झालेल्या उलमा व ट्रस्टी च्या सभेत केले. रात्री फिरू नका आव्हान रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत १४४ कलम असल्याने कोणीही नमाज घरी पठण केल्यानंतर बाहेर फिरू नये तसेच दिवसासुद्धा गर्दी करू नये असे आवाहन मुस्लिम कब्रस्तान…
भुसावळ ः प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एक संसाररथ मार्गावर आणला आहे. समुपदेशाने घटस्फोटाचा विचार रद्द करुन विभक्त होण्याच्या मार्गावरील दांम्पत्य यामुळे एकत्र आले. आसोदे येथील भूषण चिरमाडे व गोजेरे येथील कीर्ती उर्फ भारती यांचा २०१८ मधे विवाह झाला. विवाहानंतर एक वर्ष सर्वकाही सुरळीत होते. पण हळूहळू त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. याच दरम्यान दोघांच्या संसारात एक फुलही उमलले. लहानसहान भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने, कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतू समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण या दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन करण्यात आले.…
चोपडा ः प्रतिनिधी शिवसेना नगरसेविका संध्या नरेश महाजन यांनी चोपडा नगपरिषद सन २०१९-२० वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण कंत्राटातील केवळ १२ लक्षाच्या रोपांची मागणी असताना व ३२०० रोपे मोफत मिळाली असताना २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च कसा केला. त्याबाबत माहिती मागितली असता गैरव्यवहार निदर्शनास आला होता. त्यासंबंधीची तक्रार करण्यात आली होती. ज्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून चोपडा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील वृक्षारोपण प्रकरणात घोटाळा सिध्द झाला आहे. दरम्यान, चौकशी समितीने विशेष करुन समिती सदस्य नितीन सुतार न.प.यावल लेखापाल यांच्या पक्षपाती धोरणामुळे आपल्या अहवालात संबंधित अधिकार्यांना पाठिशी घालण्याचा पुरेपुर प्रयत्न केला गेला व चार महिन्यानंतर महत्वाच्या मुद्यांना बगल देत प्रत्यक्षात १ हजार…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील लिंपस क्लब परिसरातील रिक्षा स्टॉपजवळच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून झाला असावा अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलीसांनीदेखील त्या दिशेने तपास सुरु केल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ मोकळ्या जागेत रात्री उशिरा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या चेहर्याला दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्यामुळे त्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली आहे.मयताच्या उजव्या हातावर ‘एस’ असे गोंदलेले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाडंक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, पोकॉ संकेत…
यावल ः प्रतिनिधी १३ रोजी गुढीपाडवा तसेच दि.१४ बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि २ दिवस शासकीय सुट्टी असल्याने यावल परिसरात व तालुक्यात वाळू तस्करांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. काल १२ रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान यावल नगरपालिका,यावल न्यायालय व ऐतिहासिक किल्ला जवळील नदीपात्रातून वाळू तस्कर यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करीत असताना यावलकरांनी बघितले. दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने तसेच गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त वाळू तस्करांना एक मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.यावल शहरात ठिकठिकाणी नवीन घरांचे,इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.फैजपुर रोडवर हॉटेल भाग्यश्री समोर तडवी कॉलनी रोडवर नवीन यावल तहसील कार्यालयापासून…
जळगाव ः प्रतिनिधी माहे रमजानचे चंद्रदर्शन सोमवारी रात्री न झाल्याने रमजान पर्वला बुधवारपासून सुरुवात होईल.पहिली तरावीहची नमाज मंगळवारी रात्री होईल व रोजा (उपवास) बुधवारी होईल असे जळगाव रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी घोषित केले. सोमवारी संध्याकाळी जामा मसजीद येथे रूहते हिलाल कमिटीची सभा झाली.यावेळी शहरे काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी चंद्र दर्शनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. या सभेत मर्यादित मशिदीचे इमाम व विश्वस्त यांना आमंत्रित केले होते त्यात प्रामुख्याने मौलाना जाकिर देशमुख, हाफिज रेहान बागवान , हाफिज वसीम पटेल ,मौलाना जुबेर , यासह सय्यद चॉंद, इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख ,मुकीम शेख ,अश्फाक बागवान, अनिस शाह, ऍड.सलीम शेख,…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून कमाल १०० पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड केली जाते. पात्र कलावंतांना दरमहा श्रेणी निहाय मानधन दिले जाते. त्यांच्या पश्चात त्यांच्या जोडीदाराला ते देण्यात येते. ज्या कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात किमान १५ वर्ष सेवा करणार्या व वय ५० वर्षे पूर्ण आहे, ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, असे साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी ही योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून ५० वर्षावरील कलावंतांना मासिक मानधन सुवर्णसंधी अशी बातमी प्रसारित होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मासिक मानधन देण्याची…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. खासगी रुग्णालयदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. महापालिकेने कोविड केअर सेंटरमध्ये किमान ५० ऑक्सिजन बेडची सुविधा करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक महेश चौधरींनी आयुक्तांकडे केली. होम क्वारंटाइनसाठी रुग्णांचे हाल होत असल्याने पूर्वीप्रमाणे त्या-त्या भागातील वैद्यकीय अधिकार्यांना अधिकार प्रदान करण्याची विनंती केली आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड सेंटर व रुग्णालयांत गर्दी झाली आहे.खासगी रूग्णालये फुल झाल्याने ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांची फरपट होत आहे. अशा अवस्थेत मनपा कोविड केअर सेंटरमध्ये ५०…