Author: saimat team

चोपडा : प्रतिनिधी सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर करुन परमीट रुम व वॉईन शॉप विक्री केंद्रे बंद ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार चोपडा शहरात सर्व दारुची दुकाने बंद आहेत. मात्र, हे बंद असल्यामुळे अवैध दारुविक्रीला ऊत आला असून शहरातील बंद वाईनशॉपच्या बाहेर खुलेआम अवैध दारु विक्री होत आहे. म्हणून प्रशासनाने अवैध दारु व गुटखा विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी उत्पादन शुल्काच्या अधिकार्‍यांना दिले. शहरातील वाईन शॉप आणि रितसर परवाना धारक जे आहेत, त्यांनी आदेश स्विकारून आपली मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली आहेत. पण त्याचाच फायदा घेत चोपडा येथे…

Read More

जळगाव: विशेष प्रतिनिधी आज कोरोनाने सार्या देशाला विळखा घातला आहे,आपले जळगाव सुद्धा त्यास अपवाद नाही.रुग्णांची संख्या रोजच वाढत चालली असून मृत्यू चे आकडे धडकी भरविणारे आहेत. ज्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली ते तात्काळ डॉक्टर कडे धाव घेतात . सार्यांनाच जीव प्यारा असतांना काही डॉक्टर मंडळी अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्या रुग्णास जिवंत असतांनाच मरण दाखवीत आहेत. अशा काही डॉक्टर मंडळींना रुग्णांकडून घेतलेले जादा बिल परत करण्याची नामुष्की आली असून काहींची मान्यताच रद्द करण्यात आली आहे .या घटना पाहून येथे सर्व सामान्यांनी डॉक्टरांविरुद्ध संताप व चीड व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्याच्या समावेश सद्य स्थितीत कोरोना बाबत राज्यातील दहा हॉटस्पॉट शहरात झाला…

Read More

यावल ः प्रतिनिधी रावेर येथे एका कोविडने मृत झालेल्या वृद्ध परिचित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने निंभोरा (ता.रावेर) येथील युवा रसिक मंडळाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी सुनील कोंडे, डॉ.एस.डी. चौधरी, धीरज भंगाळे, हर्षल ठाकरे यांच्यासह रावेर येथील दोन सहकार्‍यांंनी मिळून अंत्यसंस्कार पूर्ण केले. समाजात अशावेळी तरुणांनी सुरक्षित साधनांचा वापर करून पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन निंभोरा येथील जागरूक तरुणांनी केले होते. याला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील प्रसिद्ध डॉ.एस.डी.चौधरी यांनी हे आवाहन सोशल मीडिया गृपवर टाकला. याला प्रतिसाद देत रावेर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. रावेर व परिसरातील एखाद्या कोविड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तीच्या…

Read More

रावेर ः प्रतिनिधी आज रोजी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी, ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उभारणीसाठी निंभोरा पोलीस स्टेशन मधील अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांच्या वतीने स्वेच्छेने १३ हजार रुपये तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्नील उनवणे, सह सपोनि स्वप्निल उनवणे, पीएसआय योगेश शिंदे, चालक सादिक शेख, अश्रफ शेख, वराडे, स्वप्निल पाटील, अब्बास तडवी, आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या भडगाव तालुक्यात पिंपरखेड, गिरड, गुढे, कजगाव, असे एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रासह या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत एकूण २३ उपकेंद्र आहेत या उपकेंद्रात किमान आठवड्यातून दोन दिवस ठराविक देऊन त्या दिवशी कोरोना संसर्गजन्य आजाराची लस दयावी या उपकेंद्र कार्यक्षेञात बहूतांश वयोवृध्द पुरूष व महिलांचे प्रमाण असून तसेच शुगर बी.पी.या आजाराचे मंडळी आहेत. या चारही…

Read More

फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे नैसर्गिक प्राणवायू मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांची बेसुमार तोड होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात खिरोदा रस्त्यावरील नगरपालिका पाणी शुद्धीकरण केंद्राजवळ लाकूड तस्करीचा अड्डा झाला आहे. परिसरातील कडुलिंब, बाभूळ, भोकर, वड, पिंपळ या असंख्य वृक्षाची अवैध तोड करून ट्रॅक्टरद्वारे येथे आणली जातात. हातकटर यंत्राच्या सहाय्याने त्यांचे येथेच छोटे-छोटे तुकडे करून येथून अन्य ठिकाणी पोहोच केली जात आहे. या ठिकाणी तसेच धाडी नदी पात्राच्या लगत अनेक ठिकाणी जागोजागी असंख्य मोठमोठे लाकूड आणून बेवारस पडलेली दिसत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चौपदरी महामार्गाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराची तिघ्रेनजीक कॅम्प परिसरात शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, कामगारांच्या निवासस्थानी या आत्महत्येनंतर संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तीन महिन्यापूर्वी झारखंडमधील दोंदिया पो.अंबा जुरवाडी जि.जरमुण्डी दुमका येथील तरुण संतोष रॉय भीम रॉय (वय २३) हा तिघे्र ता.जळगाव येथे आला होता. तो नियमित कामावर होता. काल रात्री कामकाज आटोपून तो आपल्या सोबत काम करणार्‍या मजुरांसह झोपून गेला होता. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघे्र शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या…

Read More

जळगाव: विशेष प्रतिनिधी सद्य स्थितीत कोरोनाचा भयंकर प्रकोप सुरू आहे .जळगाव जिल्ह्याचीच स्थिती पाहता रोजची रुग्ण संख्या हजाराच्या पुढेच असून मृत्यू दर सुद्धा वाढलेला दिसून येतो .ह्या कोरोना महामारी ची दुसरी लाट पहिल्या पेक्षा जास्तच भयंकर असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून ते रास्तच असल्याचे आपण पहात आहोत .या आजाराबद्दल अनेक रुग्णांच्या मनात विनाकारण धास्ती असते आणि त्यामुळे ते घाबरलेले असतात ,‘‘आपणास कोरोना झाला ,आता आपले काही खरे नाही‘‘ अशीच भीती काहींच्या मनात घर करते व त्यातूनच अनर्थ घडल्याची उदाहरणे आहेत. वास्तवात कोरोना आपल्या घरात कसा आला ? या प्रश्‍नाचे उत्तर शोधले पाहिजे .कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा संसर्ग आपणच ओढवून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या कहराने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कृत्रिम प्राणवायुची प्रचंड मागणी वाढू लागली आहे. या तुलनेत पुरवठा होत नाही तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे दर चार ते पाच पट वाढल्याने खाजगी कोविड सेंटर अडचणीत आल्याचे चित्र उभे राहिले आहे. असे झाल्यास हे खाजगी कोविड सेंटर बंद होवून कोरोना विरुध्दच्या लढाईला अंतिम घटीका मोजाव्या लागतील. या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून ज्या पध्दतीने कोविड रुग्णांच्या उपचाराचे दर ठरविले गेले आहे, त्याच पध्दतीने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपन्यांनाही दरपत्रक ठरविणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. यावेळेस कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचा रक्तदान शिबिराचा उपक्रम हा स्तुत्य असून संकटकाळी काम करतो तोच खरा कार्यकर्ता असतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील तर प्रमुख म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन उपस्थित होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांच्या सूचनेनुसार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे…

Read More