जळगाव ः प्रतिनिधी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कुसुंबा येथील तरुणाच्या विवाहसप्रसंगी वधू-वरांसह २१ जणांनी रक्तदान करुन आदर्श विवाह घडवून आणला. औरंगाबादचे समाजसेवक सुमित पंडित यांच्या प्रस्तावातून चेतन व स्वाती यांचा विवाह लोणी (ता. जामनेर) येथील श्री गजानन महाराज मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळा प्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. विवाहबद्ध होण्या आधी अगोदर वधू-वरांनी रक्तदान केले. यानंतर वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ मंडळी, तरूण समाज बांधव असे एकूण २१ जणांनी रक्तदान केले. माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी सहभाग नोंदवला. रक्तसंकलन कामी माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांनी सहकार्य केले. माणुसकी ग्रुपचे जिल्हाअध्यक्ष गजानन क्षीरसागर, चंद्रकांत गीते, योगेश वाणी, अनिल पाटील,…
Author: saimat team
धरणगाव ः जिल्हा प्रतिनिधी कोरोना चे दुसर्या लाटीचा प्रतिकार करण्यासाठी सर्वच स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कोरोना युद्धाच्या लढाईत शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना व समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर व तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटनेचे योगदान असावे या भावनेतून शिक्षक बांधवांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला आठ जंबो ऑक्सीजन सिलेंडर किट सहित भेट देण्यात आले शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला साधारण दीड लाख रुपये शिक्षक वर्गणी जमा झाली. यातून आठ जंबो ऑक्सिजन सिलेंडर घेण्यात आले ऑक्सीजन अभावी रुग्ण दगावायला नको यासाठी शिक्षकांनी हा लहानसा प्रयत्न केलेला आहे. सर्व सिलेंडर आज ग्रामीण रुग्णालयात…
यावल ः प्रतिनिधी जिल्ह्यात मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जळगाव जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांची निवड राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली. याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांच्याकडील नियुक्ती पत्र प्रभाकर सोनवणे यांना प्राप्त झाले आहे. जि.प.सदस्य व खेड्यापाड्यातील व अतिदुर्गम भागातील नागरिकांवर होणार्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असून त्याची जाणीव ठेवून जि.प.सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. शासनाकडून येणार्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होऊन कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकीय कामात दैनंदीन येणार्या अडीअडचणी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता जळगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरत वाहनांची कसून चौकशी सुरू केली आहे वाहनाच्या कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही ? यासंदर्भात बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी आपल्या प्रभागातील भागांमध्ये जाऊन वाहनांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये वाहनांची कागदांची पूर्तता आहे की नाही. नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी दिले आहेत. आज जळगाव शहरातील कांचननगर परिसर,…
सोयगाव ः तालूका प्रतिनिधी तालुक्यातील सावळदबारा येथे श्री स्वामी चक्ररधर स्वामी मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पं.स.कार्यालयाच्या मैदानात करण्यात आलेले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर ओंकार गावडे, विनोद ओंकार गावडे, सुधाकर ओंकार गावडे, शे.अमन शे.बिसमिल्ला यांनी तत्कालीन ग्रामसेवकांना हातचे करुन ग्रामपंचायत मूळ रजिष्टरमध्ये खाडाखोड करुन खोटे व बोगस नमुना नंबर ८ अ उतारा करवून घेतला. रहदारीच्या हमरस्त्यावरच अतिक्रमण केले.त्यातच आपआपल्या घरातील साडपाण्याची चारीही काढली. यामुळे परिसरात दुर्गंधीमुळे पसरत असून रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागते. हा सार्ववजनिक वापराचा रस्ता पुर्वीप्रमाणे अतिक्रमण मोहीम राबवून ग्रा.प. सावळदबारा व पं.स.सोयगाव…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे सध्या रक्त टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शासनाला मदत करण्यासाठी जामनेर तालुक्यातील एकुलती येथे महाविकास आघाडी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, गोदावरी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.त्यात ५५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, प्रदेश सरचिटणीस मुलचंद नाईक, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, संजय पाटील,उपसरपंच पंकज पाटील, माधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले. या वेळी रामधन पाटील, मुन्ना महाजन, संजय सोनवणे, रामकृष्ण पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. शिबिरात पंकज पाटील, पंकज कोळी, शशांक पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त इक्बाल पटेल, प्रदीप पाटील, विजय सोनवणे, पंकज लोनिया, पंकज राऊत, शुभम पाटील, किशन पाटील,…
जळगाव ः प्रतिनिधी जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात ग्रामविकास विभागाने गठीत केलेली चौकशी समिती सध्या जळगावात आली आहे. या प्रकरणातील मुळ तक्रारदार ऍड. विजय भास्कर पाटील यांनी काल जिल्हा परिषदेत या समितीची भेट घेतली. तक्रारीच्या अनुशंगाने पुरक माहितीसाठी त्यांनी समितीच्या अध्यक्षांना निवेदन देवून चर्चा केली. चौकशी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने गठीत केलेली समिती दोन दिवसांच्या जळगाव दौर्यावर आलेली आहे. शुक्रवारी ऍड. पाटील यांनी समितीतील अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच तक्रारीतील मुळ जागेची पाहणी करण्यासाठी जामनेर येथे जाण्याबाबत त्यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांच्याशी चर्चा केली. समितीचे सदस्य सहाय्यक आयुक्त राजन पाटील, सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे,…
जळगाव ः प्रतिनिधी हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या दिवशी सुधर्मा संस्थेने शहरातील अत्यंत गरीब अशा दहा कचरावेचक महिलांना किराणा सामानाचे वाटप केले. कोरोनामुळे समाजातील सर्व जणांचे आर्थिक चक्र थांबले आहे.या गरीब महिलांना यामुळे पुरेसा कचरा,प्लास्टिक कुठे आता मिळत नाहीत त्यामुळे अक्षरशः उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली आहे.त्यामुळे या आर्थिक संकटात त्यांना किराणा वाटपची मदत देण्यात आली. त्यामध्ये गहू,तांदूळ,तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, बेसन, साखर,तेल,साबण, पोहे, गुळ, मटकी, शेंगदाणे, बिस्किट इत्यादी साहित्य देण्यात आले. यावेळी या सर्व महिलांना नवीन साडी देखील देण्यात आली. लाभार्थी महिलांमध्ये तांबापुरा येथील गंगाबाई सोनवणे,मंगलाबाई गायकवाड, किरणबाई पवार, आरती सोनवणे,माया सुर्यवंशी, कमलाबाई सोनवणे,कलाबाई सोनवणे, मंगलाबाई लोंढे,यांचा समावेश आहे. वाटप कार्यक्रम…
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना… या सदराखाली शेतकर्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकर्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्र करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॅप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र , ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु…
यावल ः तालुका प्रतिनिधी दि.१३ रोजी ‘गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी, महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक’असे वृत्त सायंदैनिक ‘साईमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल यावल महसूल विभागाने घेतली असून काल दि.१४ रोजी शासकीय सुटीच्या दिवशी महसूल पथक थोरगव्हाण- मनवेल परिसरात गेले असता यावल महसूल पथक नेमके कोणत्या ठिकाणी चौकशी किंवा कारवाई करणार यासाठी खुद्द काही अवैध वाळू तस्करांनीच मोटर सायकलीवरून महसूल पथकाचा पाठलाग करून पथकावर पाळत ठेवल्याचे तसेच महसूल पथक अवैध वाळू वाहतूकदारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे. महसूल गस्ती पथकात नेहमी- नेहेमी, तेच- तेच चेहरे राहात असल्यामुळे वाळू तस्करांवर कारवाई करताना संशय…