जळगाव ः प्रतिनिधी कराराची मुदत संपलेल्या जे.के. पार्कची जागा ३० दिवसांत ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. मुदत संपल्यानंतरही जागेचा ताबा ठेवल्यामुळे मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात ३१ व्या दिवशी बुधवारी जे.के.पार्क मनपाने ताब्यात घेतले आहे तसेच मुदत संपल्यापासून ताब्यात ठेवल्याप्रकरणी जे.के. डेव्हलपर्सकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे. नगरपालिका असताना १९८९ मध्ये तत्कालिन मुख्याधिकार्यांनी जे.के. डेव्हलपर्स यांना शिवाजी उद्यानातील जागा स्वखर्चाने मिनी ट्रेन, मेन स्टेशन, मेरी गो राउंड, इलेक्ट्रीक झुला आदींसाठी ११५ बाय ९५ चौरस मीटर अर्थात १० हजार ९२५ चौरस मीटर जागेत बसवण्यासाठी करारनामा करून दिला होता. १९८९मध्ये करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या करारनाम्याची मुदत १५ महिन्यांपूर्वी २६…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव तसेच जळगाव ग्रामीण तालुका कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर नुकतेच झाले.शिबिराचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित व्यक्ती एकनाथ अण्णा पवार यांनी फीत कापून केले. तसेच दीपप्रज्वलन दिलीपभाऊ बाविस्कर व सुभाषदादा सोनवणे यांनी केले. रक्तदान शिबिराचे आयोजन प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पवार, पुंडलिक सोनवणे, चेतन सोनवणे, आकाश वाघ, योगेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
जळगाव ः प्रतिनिधी सगळीकडे कोरोना विषाणूची महामारी असताना त्यातच उन्हाळ्याचे दिवस अशा परिस्थितीत पक्ष्यांना आपल्या जाण्यासाठी व पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांना आपल्या पोट भरण्याची सोय मिळावी व त्यांचे रणरणत्या उन्हात बसून संरक्षण व्हावे या उद्दिष्टाने उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांसाठी मूठभर दाणा व घोटभर पाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या सोयीस्कर ठिकाणी पक्ष्यांसाठी दाण्याची व पाण्याची व्यवस्था केलेली आहे टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर पाण्याच्या परळ तयार केलेल्या असून त्यात ते पक्ष्यांना दाणा आणि पाणी पुरवत आहे. उपक्रमात वरून लोखंडे , रेणुका परदेशी , रितिषा सोनवणे , कार्तिकी कोल्हे,श्रेयस पाटील,पलक तडवी, चिन्तनिका पाटील या विद्यार्थ्यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात निदान झालेल्या कोरोना रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्णांना कोणत्याच प्रकारची लक्षणे नाहीत परंतु त्यांचा मुक्तसंचार हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतो आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जागरुकता हवी. जिल्ह्यात दररोज हजारो नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत.निदान झालेल्या रुग्णांत सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. आयसीएमआरने याबाबत अनेक वेळेस माहिती दिली आहे मात्र तरीही रुग्णांचा बिनधास्त वावर व टेस्ट करण्यास टाळाटाळ हे रुग्णसंख्या वाढण्याचे कारण ठरत आहे. सध्या जिल्ह्यात ११ हजार ५७९ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ८ हजार ८८७ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. दरम्यान, लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला सुरवातीचे सात दिवस…
चोपडा ः प्रतिनिधी येथील कोरोनाची परिस्थिती आता अगोदरपेक्षा चांगली आहे.आता कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणजेच मागे १० दिवस केलेल्या लॉकडाऊनचाच हा परिणाम आहे, असे म्हणावे लागेल. मात्र, तरीही मागील वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आताही उपजिल्हा रुग्णालय व खाजगी कोविड सेंटमध्ये रुग्णांची संख्या भरपूर आहे व कोरोना झाला म्हणजे रेमडीसिवर हे इंजेक्शन द्यावेच लागेल, ही डॉक्टरांसोबतच सर्वसामान्यांची धारणा होऊन गेली आहे. त्यामुळेच कि काय रुग्णांचे नातेवाईक चोपड्यात प्रत्येक मेडीकलवर डॉक्टरांनी दिलेली चिट्ठी घेऊन फिरतांना दिसत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांना रेमडीसिवीर मिळाले नाही, अशा कित्येक लोकांच्या तक्रारी आहेत. तरी स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण आणून योग्य ती कारवाई करावी,…
यावल ः तालुका प्रतिनिधी यावल शहरासह तालुक्यात अवैध अनाधिकृत वाळू वाहतूक सुरूच असल्याने आज सकाळी यावल महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे १ ट्रॅक्टर आणि १ डपंर पकडल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान जळगाव येथील जिल्हास्तरीय गौणखनिज पथकसुद्धा यावल तालुक्यात दाखल झाले असल्याचे समजते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भालशिव येथील अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज रोजी नायब तहसीलदार आर.डी.पाटील, नायब तहसीलदार आर.के.पवार,वाहन चालक सावळे यांनी कारवाई करून यावल पोलिस स्टेशन मध्ये ट्रॅक्टर जमा करून पुढील कारवाई सुरू केली आहे त्याच प्रमाणे काल दि.६रोजी बामणोद भाग व किनगाव भाग मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांनी संयुक्तरीत्या अवैध वाळू…
फैजपूर : प्रतिनिधी कोरोना संसर्गाचे काटेकोर पालन करून कार्यालयीन कामकाज करतांना शासनाचे वेळोवेळी निघालेले आदेश, त्यांचे तात्काळ पालन, नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या त्या अनुषंगाने न्यायालयीन सुनावणी प्रक्रिया या कामकाजात प्रांत कैलास कडलक यांनी कर्मचार्यांसह स्वतःला झोकून दिले आहे. अशातच या कार्यालयातील जवळपास दहा पैकी सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या समस्या शोधून सोडवणे ही सुद्धा या अधिकार्यांना गरजेचे असून अत्यंत कठोर नियम पाळूनही कर्मचारी बाधित होत असल्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी आपणहून सतर्क राहून शासनाने दिलेले नियम पाळणे हेच आता गरजेचे असल्याचे प्रांत कैलास कडलक यांनी सांगितले. कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे.…
चाळीसगाव ः प्रतिनिधी येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रिश वाईन शॉपवर काल मध्यरात्रीनंतर १ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ५० लाखाच्या आसपास दारूचे व बियरचे खोके दारू लंपास केल्याचे दुकान मालक दिनेश राजकुमार नोतवाणी व कामगार विजय पाटील यांनी ‘साईमत’ ला माहिती दिली. या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हे वाईन शॉप असूनही एवढी मोठी धाडसी चोरी करुन चोरटे पसार झाले.तरी पोलीसांना चाहूल लागली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चोरी करतांना पोलिसांना कोणतेही पुरावे मिळू नयेत म्हणून चोरट्यांनी क्रिश वाईन शॉपसह आजूबाजूच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्यातील फुटेजही पळवल्याचे वृत्त आहे. चोरट्यांचा शोध…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले, भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेची आली आणि विरोधी पक्षनेते असलेल्या सुनिल महाजन यांच्या उच्च शिक्षित सौभाग्यवती जयश्रीताई महाजन महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.सौ.महाजन महापौर झाल्याबद्दल सुनिल महाजन यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनपर शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध झाल्या,त्यातील एकाच ओळी वरून जळगावकर नागरिकांत चर्चा सुरू झाल्या आहेत.साधा नगरसेवक असला तरी त्याचे कडून नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांबद्दल अपेक्षा असतात.स्वच्छता -साफसफाई हवी, पिण्याचे पाणी मुबलक व नियमित मिळावे,दिवाबत्ती,रस्ते चांगले असावेत ,वगैरे वगैरे परंतु कोणी निवडून आला,नगरसेवक,आमदार किंवा खासदार जरी झाला तर आपला उत्कर्ष व्हावा,भरभराट व्हावी किंवा विकास व्हावा असे कुणालाही वाटण्याचे काही कारण नसते.गावाचा,परिसराचा,प्रभागाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यासाठी सर्व कायकर्ते मेहनत घेतील. संघटन अधिक मजबुत होण्यासाठीही मदत होईल,असा विश्वास भाजपच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. भाजपच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी भाजप कार्यालय वसंतस्मृती,बळीराम पेठ येथे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील ९ मंडळातील बुथवर आणि कार्यकर्त्यांच्या घरावर ध्वजारोहण करण्यात आले. पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करण्यात आले.प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदार स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा उपाध्यक्षा शरीफा…