Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यासाठी सर्व कायकर्ते मेहनत घेतील. संघटन अधिक मजबुत होण्यासाठीही मदत होईल,असा विश्‍वास भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. भाजपच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी भाजप कार्यालय वसंतस्मृती,बळीराम पेठ येथे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील ९ मंडळातील बुथवर आणि कार्यकर्त्यांच्या घरावर ध्वजारोहण करण्यात आले. पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करण्यात आले.प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदार स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा उपाध्यक्षा शरीफा…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी माळी समाजाची ३८ वर्ष सर्वात जुनी आणि अधिकृत संघटना ही महाराष्ट्र माळी समाज महासंघ आहे. १९८३ पासून हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी अस्तित्वात आहे. माळी समाजातील यशस्वी अनेक मान्यवरांना या महासंघात काम करण्याची संधी मिळाली आहे. दि.१८ ऑक्टोंबर २०१८ रोजी नाशिक येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. संस्थेच्या सर्व अधिकृत सभासदांनी एकत्र येऊन एकूण ११ लोकांची विश्वस्त म्हणून निवड केली व नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी.माळी, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, दीपक महाजन, शोभा रासकर, पौर्णिमा महाजन,डॉ.विना कावलकर, अजय गायकवाड, काशिनाथ…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी कुंभमेळा महापर्व हरिद्वार २०२१ ला सुरुवात झाली असून या कुंभमेळ्यात अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष व फैजपूर येथील सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज रवाना झाले असून ते ३० एप्रिल रोजी फैजपूर येथे परत येणार आहे. हरिद्वार या ठिकाणी शाहीस्नान, महामंडलेश्‍वर पट्टाभिषेक, गोपीगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वामी जगन्नाथ धाम भिमगोडा हरिद्वार याठिकाणी कुंभमेळा महापर्व हरिद्वार २०२१ ला दि.९ एप्रिल पासून सुरुवात होत असून १० एप्रिल रोजी धर्म ध्वजारोहन व जगद्गुरु संतपंथाचार्य ज्ञानेश्‍वरदास महाराज यांचे सर्व १३ अखाडाद्वारा रात्री १० ते १२ स्वागत समारोह, दि.१२ व १४ एप्रिल रोजी शाहीस्नान, दि.२० ते २६ एप्रिल पर्यंत दुपारी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी वीकेंड लॉकडाऊनच्या नावाखाली पूर्ण लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी सहभागी होणार नाहीत. महाराष्ट्र चेंबरने सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने राज्य शासनाशी चर्चा करावी. गुरुवारपर्यंत (ता. ८) निर्णय घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून (ता. ९) सर्व व्यापारी व्यवसाय सुरू करतील, असा इशारा व्यापार्‍यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या निर्णयानंतर राज्यभरातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.या विषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजतर्फे मंगळवारी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या…

Read More

पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शासन आपल्या परीने निकराचे प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या समूळ उच्चाटनासाठी आज समाजाने दातृत्वाची भावना दाखवून लोकसहभागाच्या माध्यमातून मदत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रोटरी क्लब व लोकसहभागातून उभालेल्या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन.पाटील होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार देवरे, संभाजी चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, संजय पाटील, सचिन पवार, प्रकाश पाटील, धनराज कासट आदी उपस्थित…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महापालिकेत आता भाजप सत्तेत नसून शिवसेनेची सत्ता आहे.जळगावकर सुज्ञ व जाणकार मतदारांनी तत्कालीन वजनदार मंत्री व संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवत २०१८ च्या महापालिका निवडणुकीत भजपाला एकहाती सत्ता बहाल केली होती.तब्बल अडीच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती.भाजपच्याच नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला व त्यांनी स्वपक्षाची साथ सोडून भगवा हाती घेतला आणि महापालिकेत सत्तांतर झाले. या शहराची मुख्य समस्या रस्त्यांची असून खराब रस्त्याची झळ महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनाही बसली आहे.गेली अडीच वर्षे शहरातील रस्त्यांसाठी करोडो रुपयांची वेगवेगळी आकडेवारी सांगितली गेली मात्र रस्ते झाले नाहीत.आता पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटींची तरतूद केल्याचे सांगण्यात आले आहे.म्हणून हा उहापोह.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील गरजू रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण रविवारी शहरातील मंडोरा टॉवर येथे माहेश्वरी समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी सरकारी, खासगी यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. शासन, प्रशासनातर्फे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय माहेश्वरी समाजाने घेतला. मंडळाने १५ ऑक्सिजन मशीन नागरिकांना उपचारासाठी अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहेत. या ऑक्सिजन मशीनसाठी गरजू रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रुपेश काबरा (९४२०५५९६००), विशाल तापडिया (९४२०३८८८५३) यांच्याशी संपर्क साधावा,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी रक्ताची उणीव भरुन काढण्यासाठी शिवसेना शाखा बळीराम पेठ व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरामध्ये १५ दात्यांनी रक्तदान केले.विपीन पवार यांचा सक्रिय सहभाग व गोळवलकर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड, तंत्रज्ञ मधुकर सैदाणे,रामचंद्र पोतदार यांनी रक्तसंकलन केले. शहरातील तरुणांनी रक्तदान किवा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते नीलेश पाटील यांनी या निमित्ताने केले आहे. शिवसेना, आझाद मंडळातर्फे ३० बाटल्या रक्तदान जळगाव ः शिवसेना बळीरामपेठ शाखा, गोळवलकर रक्तपेढी आणि आझाद क्रीडा सांस्कृतीक मित्र मंडळातर्फे रविवारी रक्तदान शिबिरात ३० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी यावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात ७५ टक्के नागरिकांच्या तोंडावर मुखपट्टी लावलेल्या नसल्यामुळे तसेच ठिकठिकाणी सोशल डिस्टन्स खड्ड्यात घातले जात असल्याने तसेच शासनाने निश्चित केलेले सर्व निर्बंध आणि कोरोना नियमाची ‘ऐशी की तैशी’ केली जात असल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल होत नसल्याने कोरोनामुळे ५० टक्के शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर आणि कर्तव्यावर विपरीत परिणाम झालेला स्पष्ट दिसून येत आहे. यावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात जीवनावश्यक वस्तू शेती उत्पादन वस्तू खरेदी विक्री आणि इतर संबंधित ठिकाणी नागरिकांना जाण्या-येण्यासाठी प्रतिबंध नसला संपूर्ण दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत गल्लीबोळात, मेनरोडवर, चौकाचौकमध्ये, सार्वजनिक ठिकाणी तसेच दुकानांच्या ओट्यावर,यावल पोलीस स्टेशन…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी भाजपने त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकार्‍यांचे पथक सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटले. पक्षातर्फे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना जिल्हातील आरोग्य यंत्रणेत मात्र अनेक त्रृटी आहेत. जिल्ह्यात पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, रेमडीसिवीर इंजेक्शन नाहीत. रुग्णांना इंजेक्शन मिळावे म्हणून जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार त्यांचा संपूर्ण आमदार निधी देण्यासाठी तयार आहेत. यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून चर्चा केली. आमदार स्मिताताई वाघ, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद…

Read More