जळगाव : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा एस.टी. डेपो व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचार्यांना लसीकरणाबाबत पत्र जारी केले होते. मात्र कर्मचारी शहरातील लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना तुम्हाला आम्ही लस देवू शकत नाही, असे सांगून परतविले. दरम्यान, कर्मचार्यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांची भेट घेतली असता याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एस.टी. कर्मचारी आपातकालीन परिस्थितीत आपले कर्तव्य चोख बजावत आहे. त्यामुळे शासनाने एस.टी. कर्मचार्यांना लसीकरणाबाबत निर्देश जारी केले आहे. यावरुन एसटी मंडळाच्या संबंधित विभागाने आपल्या वाहक व चालक कर्मचार्यांना लसीकरणासंबंधात अधिकृत पत्र…
Author: saimat team
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी तालुक्यातील आशा वर्करांना तोंड दाबून बुक्क्याचा मार, याप्रमाणे महिलांची डिलिव्हरी झाल्यास कुठलेही दवाखान्यात दाखवा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल, अशी धमकी खुलेआम अधिकार्यांकडून देण्यात येत असून आशा वर्करांनी काय करावे, असा प्रश्न आशा वर्करांमध्ये उपस्थित होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चार पीएससी असून त्यामध्ये दोनशे ते अडीचशे आशा वर्कर काम करत आहेत. त्यांना कुठल्याच प्रकारचा पगार मिळत नसून ते मानधनावर काम करत आहेत. मानधन सुद्धा नसल्यासारखे त्यांना मिळत असून ते आपले काम परिपूर्ण बजावत असून त्यांना वरिष्ठ अधिकार्यांकडून धमकावले जात आहे. मुक्ताईनगर जुने गाव ठिकाणी असलेले जुने बसस्थानकात तालुका उपकेंद्र दवाखाना असून ज्यामध्ये साधे दवाखान्यामध्ये लागणारे कुठलेही उपकरण…
जळगाव ः प्रतिनिधी तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे. त्यासाठी विविध उपक्रम घेऊन जनजागृती निर्माण करण्याची गरज ओळखून जेसीआय डायमंड सिटी व रोटरी स्टार्स तर्फे वाचनाची गोडी टिकवण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. झूम प्लॅटफॉर्मवर जेसीआय जळगाव डायमंड सिटी मार्फत झोन समन्वयक जिनल जैन यांच्याकडून ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये वाचन प्रेरणा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिनल जैन म्हणाले की, तरुणांमध्ये तसेच ग्रामीण भागातील काही भागांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर त्यांच्यासमोर तशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.वाचनानेच माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ, वर्तमानपत्र, थोर पुरुषांची पुस्तक, आत्मचरित्र हेच…
भुसावळ ः प्रतिनिधी कोरोना सारख्या भीषण संकटात एकमेकांना मदत करणे आपल्या सारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि बहुतांश नागरिक आपले कर्तव्य चोख बजावतही आहेत. अनेक समाजसेवी निरपेक्ष भावनेने आपआपल्या परिने होईल तेव्हढी मदत करत आहे. ही मदत उपकार नसून एक सामाजिक कर्तव्यच आहे. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील उपक्रमशील शिक्षक यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कोल्ड-हॉट वॉटर ही मशिन भेट दिली आहे. भुसावल ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे कोल्ड-हॉट वाटर मशीन ची कोविड रुग्णांना गरज आहे, अशी माहिती समाजसेवी कडून श्री.र.न.मेहता हिन्दी प्राथमिक विद्यामंदिर, येथील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांना समजले असता. त्यांच्या सेवानिवृत्त शिक्षिका आई वत्सला…
जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना, युवाशक्ती फाऊंडेशन व युवा विकास फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय विकास संस्था संचलित सरदार वल्लभभाई पटेल क्वॉरंटाईन सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन आंबेडकर मार्केटजवळ, बी.एस.एन.एल. ऑफीसमागे जळगाव येथे ना नफा ना तोटा या तत्वावर ३० बेडेड क्वॉरंटाईन सेंटर सुरु करण्यात आले. सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, डॉ.ए.जी.भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा केमिस्ट अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.किरण पाटील, ललित चौधरी, कुंदन काळे…
जळगाव : विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे . हॉकर्स, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते यांचेही व्यवहार बंदच आहेत. तरी सुद्धा काही लपून-छपून व्यवसाय करतात , त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करीत आहे. त्यात काहींवर कारवाई तर काहींना सूट दिली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे समजते अर्थात तोंड पाहून कारवाई केली जात असल्याने हातावर पोट भरणारांनी संताप व्यक्त केला आहे . ज्यांची ‘‘टीप‘‘ मिळते त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात असतांना साने गुरुजी चौकातील फळ विक्रेत्यांचा प्रचंड पसारा चालतो कसा असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या आपत्तीत जिल्हावासियांना आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्याचे सर्व जिल्हावासियांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्री ना. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देऊन सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांसह जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बाबींचा उहापोह केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून ऑनलाइन सभेतून बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी या सभेनंतर सोमवारी रात्री पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी सत्ताधारी सदस्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत तीनही पक्षश्रेष्ठींशी बोलून याबाबत निर्णय घेणार असल्याचे ठरवल्याची माहिती महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी दिली. भाजपच्या अनागोंदी कारभारासह अधिकार्यांची मनमानी, दिरंगाई या विषयाची गार्हाणेही सदस्यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडली. जिल्हा परिषदेतील भाजपच्या पदाधिकार्यांविरोधात महाविकास आघाडीच्या सदस्यांनी रणशिंग फुंकले आहे. या पंचवार्षिकचा कालावधी ८ महिने राहिले असताना सत्ताधारी गटाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याच्या हालचाली शिवसेना, राष्ट्रवादी व जिल्हा कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सुरू केल्या आहेत. सोमवारी झालेल्या सभेतील अभिसरण शुल्कासह अर्थसंकल्पाच्या विषयावर विरोधकांनी पदाधिकार्यांसह…
पाळधी ः वार्ताहर पाळधी बुद्रुक येथील शेत रस्त्यावरुन खेडी, कढोली तसेच टाकरखेडा येथील शेतकरी विजय पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण पाटील, गुलाब पाटील, शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, भूषण पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता. ही माहिती पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळताच ते वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः शेतातील बांधावर पोहोचले. त्यानंतर मध्यस्थी करुन पालकमंत्र्यांनी हा वाट मिटवला. या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी देविदास पाटील, अशोक पाटील, विजू पाटील, दिलीप पाटील, भगवान ठाकरे, बळीराम ठाकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी थेट शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले, अशी चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती.
अमळनेर ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अमळनेर येथे शिंदे परिवाराने दशक्रिया विधीला वेगवेगळ्या गावी असलेल्या भाऊबंदांनी एकत्र न येता आपापल्या गावी राहत्या घरीच दहाव्याला केस देण्याचा विधी पार पाडला. अंत्यविधींच्या निमित्ताने गर्दी करणार्या समाजमनासमोर नवा पायंडा पडत आदर्श ठेवला आहे. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या आजी स्मृतिशेष मखमलबाई पिराजी शिंदे यांचे मालेगाव येथे वयोवृद्धत्वामुळे ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंड, भाऊबंद असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीतील अंत्ययात्रा, राख सावळणे, दशक्रिया, उत्तरकार्य अशा प्रत्येक दिवशी भाऊबंद अनेकदा एकत्र येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून इतर सर्व विधींसह दशक्रिया विधीलाही शिंदे परिवारातील…