जळगाव, प्रतिनिधी । येथील पी ई तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये कार्यरत शिक्षक व गेंदालाल मिल मधील रहिवासी तथा मनियार बिरादरीचे सदस्य मोहम्मद आसिफ शेख रहीम यांनी नुकत्याच झालेल्या उर्दू सेट परीक्षेत ओबीसी कैटेगिरीतून महाराष्ट्र राज्यातून फक्त ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जळगाव जिल्ह्याचे व मनियार बिरादरीचे नाव अजरामर केल्या बाबत त्यांचा गौरव जळगाव जिल्हा मनियार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनियार बिरादरीचे महानगर अध्यक्ष सय्यद चाँद तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष फारुक शेख होते यावेळी बिरादरीचे सलीम मोहम्मद, तय्यब शेख, अब्दुल बारी, एजाज सैयद,अल्ताफ शेख हारून…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातली गेली त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केले असता ती बंदी कही अंशी उठवण्यात आली परंतु ज्या विद्यार्थिनी हिजाब घालून येतील त्या विद्यार्थिनींना वेगळ्या क्लास रूम( वर्ग खोली) मध्ये बसवण्यात येईल असे ठरले त्यावरही विद्यार्थिनीनी आपली सहमती दर्शवली असता आज विद्यार्थिनी आपल्या शिक्षणासाठी महाविद्यालयात येतांना त्यांना काही भगवा मफलर (पट्टा) धारण केलेले तरुण युवकांनी महाविद्यालयात येण्यास मज्जाव केला. या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील हिंदू- मुस्लिम महिला यांनी प्रतिसाद देत जिल्हाअधिकारी कार्यलय गाठुन…
जळगाव, प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती. रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात 20 बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील…
पाचोरा, प्रतिनिधी | एका १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामेभावाने वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका १९ वर्षीय तरूणीचा चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने तिच्याशी मैत्री करून त्याच्या घरी व फर्दापूर येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. संशयिताने अत्याचार केल्याची व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत केलेले अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मित्रांना प्रसारित केले. पिडीत तरूणीच्या नातेवाईकांना याचा जाब विचारला असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. पीडीतेसह नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चुलत मामे भाऊ नितीन…
जळगाव : प्रतिनिधी | माता रमाई आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनलेली आहे. जगात जे थोर महान पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरांतील महिलांचा,धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशामागे त्यांच्या आई जिजाऊंचा वाटा होता, महात्मा जोतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात, त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्यदक्ष त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा आदर्श आजच्या…
जळगाव, प्रतिनिधी । येथील काव्यरत्नावली चौकात भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल जळगाव महानगर व जळगाव ग्रामीण यांच्यातर्फे स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी विनोद ढगे, दीपक पाटील ,रवी परदेशी तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश जोशी जिल्हा सरचिटणीस ,नितीन इंगळे जिल्हा सरचिटणीस ,दिप्ती ताई चिरमाडे महिला आघाडी अध्यक्ष, रेखा वर्मा सरचिटणीस महिला आघाडी, उज्वलाताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी, ॲड. शुचिता हाडा नगरसेविका, गायत्री राणे नगरसेविका सुरेखा तायडे नगरसेविका व इतर नागरिक उपस्थित होते तसेच जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आणि महानगर अध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी यांनीही दीदींना श्रद्धांजली…
जळगाव, प्रतिनिधी । ४० वर्षीय युवकाची राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तूरखेडा येथील ४० वर्षीय तरूणाने शहरातील कांचन नगर येथे पत्नीच्या घरी दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. रविंद्र सुर्यवंशी हे मुलगा दिपक सुर्यवंशी यांच्यासह तुरखेडा येथे वास्तव्याला आहे. इमारतीचे बांधकाम करून उदरनिर्वाह करतात. तर पत्नी सुरेखा सुर्यवंशी ह्या जळगाव शहरातील कांचन नगरात…
सोयगाव, प्रतिनिधी । सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखाबाई काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या आशाबी तडवी तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा बाई काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली . अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे व जय भवानी जय…
जळगांव, प्रतिनिधी । येथील सागर मैदानावर मराठा प्रीमिर लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन समारंभ पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन या वर्षाचे मुख्य प्रयोजन के पी एंटरप्राइजचे संचालक व जळगांव नगरीचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मैदानावर चेंडू टोलवून केले. या वेळी मुख्य अतिथी डी.वाय.एस.पी शिशिकांत पाटील ,प्रतिभा शिंदे लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्षा ,श्रीराम पाटील ,स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोज पाटील, प्रमोद पाटील संचालक पाटील बायोमेट्रिक, बाळासाहेब सूर्यवंशी लक्ष्मी ऍग्रो ,भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत भव्यदिव्यपणे पार पडला. ही स्पर्धा 6 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 11 दिवस असणार आहे. सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या या…
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे तर उद्घाटक म्हणून सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट ,(गुजरात )येथील प्रा. डॉ.राकेश जोशी आभासी पद्धतीने उपस्थित होते .त्यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे. उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी व आभासी पद्धतीने उपप्राचार्य डॉ एस. व्ही. पाटील तसेच समन्वयक डॉ. प्रफुल्ल इंगोले व सह समन्वयक प्रा. एस.टी .धूम सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…