Author: saimat team

मुंबई :  प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील कोकण दौरा करणार आहेत. येत्या शुक्रवारपासून उद्धव ठाकरे हे कोकणात असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून गावकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यानंतर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत मदत देण्यावर चर्चा केली जाईल अशी माहिती आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा आर्थिक तडाखा दिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शन चा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत, तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सूरु आहे, आज गृह विलगीकरणात असलेल्या बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटर ची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई च्या वतिने २५ ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने खतांच्या किमतीत केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष  दिनेश पाटील व पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. खतांची दरवाढ मागे न घेतल्यास पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, देण्यात भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यावश्यक कामासाठी पीपीई किट घालून प्रवेश दिला जात आहे. ज्या नातेवाइकांची हलाखीची परिस्थिती आहे अशांना ६० जणांना भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइक महिला व पुरुषांची राहण्याची व्यवस्था पद्मावती मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या रुग्णांच्या ६० नातेवाइकांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, उद्योजक रजनीकांत कोठारी, उद्योजक अमित भाटिया यांच्या हस्ते पीपीई…

Read More

चोपडा : तालुका प्रतिनिधी देशासह जगभरात कोरोना या आजाराच्या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्र प्रशासन कार्यतत्परतेने प्रयत्न करीत आहे. त्यातच लॉकडाऊन च्या काळात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असतांना अवैध धंदे मात्र जोरात सुरू आहेत. अवैध पध्दतीने जमाव करून सुरू असलेले जुगार, झन्ना- मन्ना, देशी – विदेशी दारू विक्री, कत्तलीच्या उद्देशाने गौ तस्करी सारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्याचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.राजकीय वरद हस्ताने सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी प्रसुती वेदना वाढल्याच्या बिकट स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह २१ वर्षीय गरोदर महिला डॉ. वीरेंद्र व प्रणीता झांबरे यांच्या प्रतिभा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर कोणताही धोका नको म्हणून नवजात बाळाला १० दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. आईला कोरोना असला तरी बाळ मात्र सुरक्षित राहिले. दरम्यान, दहा दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झालेल्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा शब्दही कानावर पडता की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच गरोदर महिला कोरेाना पॉझिटिव्ह आढळल्यास अनेकवेळा डॉक्टरही उपचारासाठी नकार देतात. असाच एक प्रसंग न्हावी (ता.यावल) येथील सुचिता राहूल चौधरी (वय २१) यांच्यासोबत घडला. सुचिता यांचा…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील भराडी येथे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त  भराडी येथे नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेऊन,व वाढदिवसावर वायफळ खर्च न करता गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या युवकांसाठी सुसज्ज असे वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयासाठी भाजपा कार्यकर्ते आनंदा जंजाळ यांनी पुस्तक उपलब्ध करून दिली. तसेच गावात विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात आली.यात लॉक डाऊन काळात निराधार ,विधवा, दिव्यांग नागरिकांना अन्न धान्य किट वितरण करण्यात आले. व गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावी या दृष्टीने वाचनालय सुरू  करण्यात आल्याचे आनंदा जंजाळ यांनी सांगितले. वाचनालयाचे भाजपा पाळधी गट प्रमुख नाना पाटील यांच्या हातून उद्घाटन करण्यात…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निराधार झालेल्या २५ महिलांना कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील तहसील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार उषाराणी देवगुणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नायब तहसीलदार सी.जी. पवार, संजय गांधी निराधार योजनेचे प्रभारी नायब तहसीलदार जी.एन. शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील मराबाई तायडे, अजनाड, धृपताबाई महाजन, आटवाडा, वामन वाघ, अभोडे बुद्रुक, दुर्गाबाई धनगर, लताबाई अटकाळे, अहिरवाडी, अनिसा तडवी, केर्‍हाळा खुर्द, जरीनाबी शेख अकील, खानापूर, वेलाबाई बारेला, गारखेडा, रेखाबाई झाल्टे, चिनावल, सायरा तडवी, जानोरी, वंदना पाटील, थेरोळे, कुसुमबाई सवर्णे, निंभोरासीम, कविता…

Read More

मलकापुर : प्रतिनिधी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी मारक ठरणार ७ मे २१ चा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, यांचेकडे बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सोशल मीडिया जिल्हा समन्वयक राजेंद्र वानखेडे यांनी ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात नमूद केले आहे की,  सन २००४ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ मधील (आरक्षण कायदा) कलम ५ मधील तरतूदी. नमूद केलेला महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ (आरक्षण कायदा) राज्य शासनाने २००४ मध्ये पारित केला.  या कायदयातील कलम ५ मधील तरतूदी प्रमाणे  मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचा-यांना पदोन्नतीच्या कोटयातील  रिक्त पदे भरतांना सर्व संवर्गामधे सर्व टप्प्यांवर आरक्षण…

Read More

आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय. करोनामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. आशिया कप २०२१ रद्द करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतला गेलाय. या स्पर्धेत भाग घेणारे देश सध्या करोना विरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अशा अवस्थेत स्पर्धेचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते. या वर्षी आशिया कप श्रीलंकेत होणार होता. पण लंकेत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे लंकेच्या बोर्डाने हा निर्णय घेतला. आशिया कप स्पर्धत भारत आणि पाकिस्तान यांच्यात देखील मॅच होणार होती. पण पुन्हा…

Read More