Author: saimat team

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात जिल्ह्यात आदर्श निर्माण केलेल्या पहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन पहूरकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले असून दीड लाख रुपये किमतीचे साहित्य तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहे. याप्रसंगी दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पहूर शहर पत्रकार संघटनेच्या पुढाकाराने पहूर ग्रामीण रुग्णालयास लोकप्रतिनिधी , व्यापारी , डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन आणि दातृत्ववान ग्रामस्थांच्या सहकार्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर , निवारा शेड , कुलर्स , पंखे , व्हीलचेयर , बेडशीट्स , बकेट्स , मेडिसिन इत्यादी आवश्यक साहित्य प्राप्त झाले. ग्रामीण…

Read More

चोपडा : प्रतिनिधी पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक असून प्रशासना सोबत सर्वच परिस्थितीत काम करत असतो.कोरोना काळात सुद्धा पत्रकार समाज जागृतीचे कार्य आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.त्यामुळे पत्रकार बांधवांना फ्रंट लाईन्स वर्कर चा दर्जा देऊन त्यांना परिवारासह कोविड लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अध्यक्ष शाम जाधव,सचिव लतीश जैन यांनी तहसीलदार अनिल गावीत यांना दिले होते. सदर निवेदनाची दखल घेत चोपडा तहसीलदार अनिल गावीत यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांना सूचना केली होती. त्याअनूशंगाने २२ रोजी चोपडा नगर परिषदेच्या रुग्णालयात दुपारी ३ वाजता पत्रकार व त्यांच्या परिवारा…

Read More

जळगाव : वृत्तसंस्था यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात रविवारी गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. पहाटे काकडा आरतीसह विविध धार्मिक विधी पार पडले. होम हवनानंतर वासुदेव बाबा भजनी मंडळाने भजने सादर केली. कोरोनाच्या संकटापासून जगाला मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली. श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे येथे, रविवारी वैशाख शुध्द बारसनिमित्त गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार येथील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. साजरा होणारा गुरु श्री समर्थ…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत, नंतरच जामीनसाठी अर्ज करावा असे निर्देश सर्वाच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पैसे भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यावर आता अनिल चौधरी काय भूमिका घेतात यावर लक्ष लागुन आहे. याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील सनांसे नामक महिलेकडून रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन शहरातील एका व्यापारी संकुलातील गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या…

Read More

मुंबई : “तोक्ते चक्रीवादळाची (Touktae Cyclone) सूचना मिळाल्यानंतरही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि दोषी असेल त्यांना शिक्षा द्या” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. “तोक्ते चक्रीवादळाच्या धोक्याबाबत सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. एक बार्ज बुडून ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही काही कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व…

Read More

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारत सरकारवर कडक टीका होत असताना, राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बीबीसी’ (BBC) सारखे नवे चॅनेल सुरू करण्याची योजना आखली आहे. याच पार्श्वभूमीवर सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या अधिकाऱ्याने याबाबत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निविदा काढण्यात आली आहे. आणि बर्‍याच वर्षांपासून यावर विचार सुरू होता. १ मे रोजी सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. दूरदर्शनला जागतिक स्तरावर नेण्यासाठी डीडी इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली आहे. ‘प्रख्यात जागतिक सल्लागारांकडून या प्रकल्पाबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारणकर्त्यांना / मीडिया हाऊसेसना सल्ला देण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) जारी केला जात आहे.’ निविदेनुसार, जागतिक आणि देशांतर्गत महत्त्व असलेल्या समकालीन मुद्द्यांवरील…

Read More

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रत्येक राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. पश्चिम बंगालचे एकही जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (Mamata Banerjee) हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. केंद्राकडे ना कोणते धोरण, ना कोणती उपाययोजना, असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले नाही. भाजपचे (BJP) काही मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी आपले मुद्दे मांडले. आम्हाला वॅक्सीन अर्थात लसीची मागणी…

Read More

मुंबई : सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे कला क्षेत्रात मोठे संकट उभे ठाकले आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार…

Read More

 देशातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी पैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्डने आपल्या काही मॉडेल्सला परत मागवले आहे. काही बाइक्समध्ये वापरलेल्या पार्ट्सपैकी एकात त्रुटी आढळली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, बाइकच्या इग्निशन कॉइलमधून मिसफायरिंग होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बाइकच्या परफॉर्मेंसवर परिणाम होईल. तसेच, काहींमध्ये या त्रुटीमुळे शॉर्ट सर्किट होण्याची देखील शक्यता आहे. या त्रुटीमुळे रॉयल एनफिल्डने Bullet ३५०, Classic ३५० आणि काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Meteor ३५० बाइकच्या २,३६,९६६ यूनिट्सला परत मागवले आहे. कंपनीने स्वतःहून या गाड्या परत मागवल्या आहेत. यात डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये निर्मिती झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीने डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये तयार झालेल्या Meteor ३५० ला परत…

Read More

नवी मुंबई :  प्रतिनिधी राज्यात सरकारने कडक लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले आहे. तसेच कठोर निर्बंधही लादले आहेत. या निर्बंधामुळे वॉकिंगला (Morning walk) बंदी असतानाही सिडकोच्या एका अभियंतांनी (CIDCO engineer) नियमाचे उल्लंघन केले. या अभियंतावर तीन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वॉकिंग करणे थांबवणार नाही म्हणत त्यांनी आगाऊ पाच हजार रुपयांचा दंड पालिकेला भरला आहे. या घटनेवरून शासकीय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहे. या काळात सरकारने मॉर्निंग वॉक करण्यावरदेखील बंदी घातली आहे. यामुळे सर्व वॉकच्या ठिकाणांवर पालिकेमार्फत नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. चार महिन्यांत १ हजाराहून अधिक व्यक्तींवर दंडात्मक…

Read More