यावल ः प्रतिनिधी अन्न व औषध मंत्री मा.राजेंद्र शिंगणे यांना दि.१७मे २०२१रोजी दिलेल्या निवेदनात यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की,ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसीलिझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूम मधून वितरित व्हायला पाहिजे जेणेकरून रुग्णांना वेळेवर वाजवी दरात औषधी मिळून रुग्णांच्या नातेवाईकांची फिराफिर/हेळसांड थांबेल. दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की राज्यात कोविड संदर्भात औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे अशा वेळी आपण ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांच्यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन केले त्यामुळे पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली व रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये या निर्णयाचे…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी ५ जणांची उपसमिती नेमण्यात यावी. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहे. जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा उपस्थित होते.…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो येथे आकाशात सुमारे १३५०० फूट उंचीवरून स्काय ड्रायव्हिंग करून एक चित्तथरारक यशस्वी कामगिरी केली आहे. ही अत्यंत धाडशी अशी ड्रायव्हिंग असून भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरेल. आकाश हा युवक फैजपूर येथील दादा साहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांचा मुलगा आहे. आकाशने अमेरिकेत एम. एस. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून अमेरिकेत वास्तव्याला व उच्च सेवेत आहे. त्याने केलेल्या या धाडसी कामगिरीस आई वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. या धाडसी कामगिरी बद्दल आकाश पाटील यांचे…
यावल : तालुका प्रतिनिधी कोरोनाचा सत्सर्ंग रोखण्यासाठी तसेच वाढू नये म्हणून जिल्हास्तरावरून प्रशासन रात्रंदिवस परिश्रम घेत आहे,जिवनावश्यक, अत्यावश्यक गरजा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतांना मात्र यावल शहरात मुख्य रस्त्यावर आणि ठिक-ठिकाणी गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पायदळ चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे अनेक दुकानदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पद्धतशीरपणे पायमल्ली करीत असून यावल नगरपालिका आणि यावल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दंडात्मक कारवाई करताना दुकानदाराचे व्यवसायाचे स्वरूप, रूप, हितसंबंध वशिलेबाजी लक्षात घेऊन नाम मात्र कारवाई केले जात असल्याने नागरिकांमध्ये मात्र तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी फैजपूर, डीवायएसपी फैजपूर यांनी लक्ष केंद्रीत करून…
रावेर : प्रतिनिधी सध्या कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय घातक सिद्ध झाली आहे, सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मोठं संकट उभे करत आहेत, या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात युवा महिला पुरुष मरण पावत आहेत, याचं पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावांत ही मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत असून गेल्या महिन्यात सुमारे २४ महिला- पुरुष यांचें अल्पशा आजाराने निधन झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि २१मार्च रोजी निर्मला बाई विकास बेलदार वय( ४२) यांचें निधन झाले . त्यांच दिवसांपासून सुनिल जंगले वय (४४ ),संतोष पाटील, वय (३५) बापू वेडू चौधरी, वय( ४०) संकू बाई विष्णू म्हसकर वय (६५) न्याजुदिद्न तडवी, वय( ३५)…
पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील डोगरगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पंढरीनाथ मागो पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने डोगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. डोगरगावातील जनसामान्यांचा देव माणूस , एक सच्चा समाजसेवक आपल्यातून हरवला असल्याची भावना ग्रामस्थामधून उमटत आहे. गावांतील सरपंच म्हणून आपल्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. शनिवारी दु ३.३० वा. त्यांचे निधन झाले. गावात कोणीही आजारी पडले किंवा डीलव्हेर ऑपरेशन वैद्यकीय उपचार करायचे असले तर स्वता हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ चर्चा करून सहकार्य करत होते. काही रुग्णांना स्वतः घरून जेवणाचा डब्बा पुरविणे, आर्थिक मदत करणे हे माणुकीचे काम करायचे तसेच लग्न कार्यात देखील आर्थिक…
जामनेर : प्रतिनिधी शेरी ग्रामपंचायतकडे मोफत पाणीसाठा असतांना विहीर अधिग्रहित करून शासनावार गरज नसतांना आर्थिक बोजा टाकून या विहिरी मधून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पाझर तलावामध्ये आणी त्यातील विहीरींना मुबलक पाणी असतानां शेरी गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाई भासविण्याचा प्रकार शेरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु असल्याचे चित्र आहे. मौजे शेरी तालुका जामनेर येथील १५०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात मागील १५ वर्षापासून शासनामार्फत साठवण तलाव बांधण्यात आला आहे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात किमान २ वर्ष पुरेल एवढे पाणी साचत असते आणि शेरी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्वखर्चाने साठवण तलावासाठी ज्या जमीनी अधिग्रहीत केल्या आहे. त्यामध्ये किमान ६० फूट खोल विहीरीचा उन्हाळ्यात पाझर…
मलकापूर : प्रतिनिधी शहरात कोरोना धरतीवर कडकडीत लॉकडाऊन आहे. असे असले तरी विविध सेवा द्यायच्या माध्यमातून पोलीस व विविध विभागाचे कर्मचारी रस्त्यावर आहेत , त्याचबरोबर दवाखाने व मेडिकल साठी नागरिक देखील रस्त्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात वाटचाल करणार्या सर्वांना मोफत थंडगार रस कृष्णा स्टुडिओ च्या माध्यमातून देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, घटना स्टुडिओ चे संचालक योगेश शर्मा यांनी त्यांच्या शेतातील पाच क्विंटल ऊस उसाचा रस निर्माण करणारी मशीन थंडगार बर्फ त्यास लिंबूची मिश्रण व ग्लास उपलब्ध करून देते थंडगार उसाचा आस्वाद सर्वांना दिला. या उपक्रमात आयोजकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांना…
चोपडा ः प्रतिनिधी तालुक्यातील तरूणांनी अक्षय प्राणवायूसाठी वृक्ष संवर्धनाचा मामलदेच्या तरूणाई चा संकल्प दि.१४ मे रोजी खान्देशात अक्षय तृतीया सण म्हणजे शेती पर्वाचा मुहूर्ताचा दिवस हा मुहूर्त साधत मामलदे येथे तरूण मित्रांनी एकत्र येत गतवर्षी सामाजिक वनीकरण चोपडा यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या रोपांना पाणी देवून संगोपन करत ती जगविण्याचा आज मुहूर्त साधला. अक्षय प्राणवायूसाठी अक्षय तृतीयेच्या या मुहूर्ताचे परिसरात कौतुक झाले. फाट्यापासून मामलदे गावापर्यंत रोपांना माती लावून पाणी टाकून ही झाडे जगवण्यासाठी तरूणांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकल्प केला. दीनानाथ इंगळे, सोहम कोळी, प्रथमेश पाटील, जयदीप पाटील, पवन पाटील, प्रदिप कोळी, हर्षल महाजन, राकेश पाटील, दीपक पाटील, गोपाळ कोळी, सुशिल पाटील,…
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथे स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्ति प्रकाश शास्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून मससाका संचालक नरेंद्र नारखेडे, सदगुरू शास्त्री भक्तीकिशोर दासजी महाराज, माजी सरपंच राजेंद्र महाजन, डॉ. व्ही. जे. वारके, माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांची उपस्थिती होती. हा स्वर्गरथ स्वर्गीय प्रभाकर गाजरे व स्वर्गीय मिलिंद प्रभाकर गाजरे यांचे समरणार्थ माधवी विनीत चिरमाडे यांनी संपूर्ण खर्च करून हिंगोणा ग्रामस्थांना लोकार्पण केला. या कार्यासाठी लीलाताई गाजरे व प्रसिध्द साहित्यिक प्रा.व.पु. होले सर यांनी प्रेरणा दिली. या सामाजिक कार्याबद्दल मान्यवर पाहुण्यांनी दात्यांचे…