Author: saimat team

पहूर ता. जामनेर : वार्ताहर राज्यभर तसेच जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनारुग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. पहूरमधील एक तरुण मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी जिल्ह्यातील पहिले म्युकरमायकोसिस रोगनिदान शिबिर जीएम फाउंडेशन व आर्या फाउंडेशनने आयोजित केले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे होते. पहूर ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या या शिबिरात जवळपास ५० रुग्णांची तपासणी नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करुन काळजी घेण्याचे आवाहन…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मुळे असलेल्या लोक डाऊन मुळे सेक्सवर्कर महिलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद असून आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा महिलांना मदत करण्यात येते. यावेळीही रोटरी क्लब सदस्यांनी पुढाकार घेऊन वस्तीतील गरजू महिलांना मदत करण्यात आली . यावेळी अंमळनेर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभिजित भांडारकर, विनोद पाटील, महेश देशमुख, विवेक देशमुख, रोहित शिंघवी, प्रतीक जैन, ऋषभ पारख, योगेश येवले, ताहा बुकवाला, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद , अश्विनी भदाणे, मनिषा पाटील, यास्मिन शेख, नंदिनी चौधरी, संजय कापडे, कलीम खान, जीवन मोरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Read More

यावल ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार यांनी निवडीसाठी ऑनलाइन विशेष सभा घेतली. विहित मुदतीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. तत्कालीन उपनगराध्यक्षा पौर्णिमा फालक यांनी काही दिवासांपुर्वी राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या जागेवर सोमवारी नूतन उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले. या मुदतीत सत्ताधारी गटातील देवयानी गिरीश महाजन यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक गटनेता अतुल पाटील होते तर अनुमोदक अभिमन्यु चौधरी होते. पीठासीन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभा घेऊन निवडणूक…

Read More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळं झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित घवले यांचा समावेश आहे. (GST Deputy Commissioner Killed in Accident at Mumbai Pune Expressway) हा अपघात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. घवले हे त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. या दुर्घटनेमुळे त्यांची आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली. अभिजीत घवले (जीएसटी डेप्युटी कमिशनर) यांच्यासह शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले हे त्यांची पत्नी, साडू व चालक हे इनोव्हा कारने लातूरला गावी चालले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वार्डात व परिसरात सोमवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले. राज्य शासनाने करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरामध्ये कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील सोमवारी २४ मार्च रोजी सुमारे १८० खाटा ह्या रिक्त झाले आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये साफसफाई करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुकीकरण देखील करण्यात आला. एस.एम.एस संस्थेचे सफाई व कंत्राटी कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी यात सहभाग घेतला. निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करीत असताना एसएमएस कंत्राटी कर्मचार्‍यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक (वय ७२) यांचे काल रात्री १०.३० वाजता आर्किड हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी त्याच्या शनी पेठ मधील निवास्थानातून निघेल. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी दादांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नाही. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. जळगाव ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अशी पदे…

Read More

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे . राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भुतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही, असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे…

Read More

नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालयाने (ED) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून झडती सुरू केली आहे. शिवाजी नगरातील सागर भटेवरा, सदर येथील सुमित आयझॅक यांच्यासह जाफर नगरातही आणखी एका ठिकाणी इडीच्या टीमकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकूण लागल्यानंतर इडीने हा छापा टाकल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या टीम या संदर्भातील कागदपत्रे खंगाळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या विरोधात प्राथमिक तपास करून त्या आधारावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या कामकाजासंदर्भात जयवंत भोईटे हे संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराच्या कामाबाबत वैचारीक व कायदेशीर लढाई लढत आहे. या लढ्यात ते न्यायी लढाई लढत असून संस्थेतील मानद सचिव निलेश भोईटे यांच्या गैर कारभाराबाबत नियमीत आवाज उठवतात. त्यामुळे निलेश भोईटे व त्यांच्या हस्तकांकडून जयवंत भोईटे यांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या. मात्र काल रात्री या घटनेचा कडेलोट झाला व निलेश भोईटे यांनी त्यांच्या हस्तकांसह जयवंत भोईटे यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, याबाबत जयवंत भोईटे यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्यानंतरही दखल न घेतली गेल्याने आज हा प्रकार झाला. एखाद्याचा बळी जाण्याची पोलीस…

Read More

जामनेर : प्रतिनिधी सध्या देशासह जगात कोरोनाच्या महामारीचे संकट घोंगावत असतांना भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या महामारीत जनता भयभीत आहे. देशात सर्वच राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे आहे. अशा अवस्थेत जगणे मुश्किल झाले असतांना केंद्र सरकार मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी इधन दरवाढ करत मृत्यूच्या खाईत ढकलत असल्याची भावना जनमानसात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधन दरवाढीच्या विरुध्द राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निदर्शने व आंदोलने सुरु आहे. आज सकाळी जामनेर येथे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तहसिलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने…

Read More