उद्योग क्षेत्रातील कामगारांनाही करोनाची बाधा होत असून, त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय श्रम मंत्रालयाने भविष्यनिर्वाह निधीद्वारे देण्यात येणाऱ्या विमा योजनेच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ केली असून, सभासदाचा मृत्यू झाल्यास कमाल सात लाखांपर्यंत भरपाई मिळणार आहे. पूर्वी ही मर्यादा किमान अडीच लाख ते कमाल सहा लाखांपर्यंत होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कामगार, कर्मचाऱ्यांनाही त्याची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. कामगाराचा यामुळे मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंबच उघड्यावर येते. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी व सुधारणा अधिनियम १९५२ अंतर्गत कर्मचारी भविष्यनिधी सतत विमा योजना १९७६ कार्यान्वित आहे. कामगाराचा मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत सहा लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळत होती. मात्र, १५ फेब्रुवारीपासून या…
Author: saimat team
तौत्के चक्रीवादळामुळे(Tauktae Cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या कोकणच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र विरोधी पक्षनेत्याने कुठलाही वेळ न घालवता नुकसानग्रस्त भागाला भेटी देण्यास सुरूवातही केली आणि मुख्यमंत्री उशिरा जात असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे(Nilesh Rane)यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का? असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा…
मुंबई: प्रतिनिधी कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १,००० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला १,५०० कोटींची मदत दिली पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत. मोदी यांचे संपूर्ण देशावर…
प्रतिनिधी- जळगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी पाळधी येथील दैनिक देशदूत ची पत्रकार अलीम (संजू भैया) देशमुख नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार सचिन सोमवंशी, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन उपस्थित होते.
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी काल गुजरातचा दौरा करून तौक्ते चक्रीवादळाने(tauktae cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावर महाराष्ट्राची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांची टीका केली – या वादळाचा फटका ५ राज्यांना बसला आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातचाच दौरा केला, मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. ते केवळ गुजरातचेच मुख्यमंत्री असल्यासारखे का वागतात, इतर राज्यांची अवहेलना का करतात? या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा करुन राज्याला १ हजार कोटींची मदत जाहीर केली. देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका…
यावल : तालुका प्रतिनिधी यावल शहरात पोलीस, नगरपालिकेचा धाक आणि प्रभाव संपला.दंडात्मक कारवाई नियम मोडणार्यांना लाभदायक,यावल शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,डीवायएसपी यांचे दुर्लक्ष असे वस्तुस्थितीजन्य वृत्त फक्त आणि फक्त दैनिक साईमत मध्ये दि.१७मे रोजी प्रसिद्ध होता बरोबर यावल पोलीस आणि यावल नगरपालिका यांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली. परंतु त्या कारवाईत मोठ्या आर्थिक संपन्न दुकानदारांची दुकाने सील न करता फक्त दंडात्मक कारवाई करून एक किरकोळ सर्वसामान्य दुकानदार दंड भरू न शकल्याने त्याचे दुकान सील करण्यात आले त्यामुळे आजच्या कारवाईत भेदभाव आणि पक्षपातीपणा स्पष्टपणे उघड दिसून आला. जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी आज पासुन…
जळगाव : प्रतिनिधी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढत असताना दुसरीकडे ऐन खरिपाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. या प्रमुख बाबींच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून, सामान्य नागरिक, शेतकरी यातून होरपळून निघाला आहे. केंद्र सरकारने ही सर्व महागाई कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला. पेट्रोल शंभरीपार गेले आहे. रासायनिक खतांच्या ५० किलोच्या बॅगेमागे ७०० रुपयांपर्यंत किमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केलेल्या किमतीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने पक्ष कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी…
जळगाव ः प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट तर्फे आव्हाने फाटया जवळ कानळदा रस्त्या लगत कट्टा मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात येत होता तसेच तिथे बसण्यास ५ मोठ्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली, त्या कट्ट्याचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांचे हस्ते करण्यात आले. हा कट्टा गावातील वयोवृद्ध मंडळी गावाबाहेर सकाळ व संध्याकाळी सैर सपाटा मांरणारी मंडली तसेच बाहेरगावी जाणारे येणारे प्रवासी त्याच्यासाठी खूप सोयीस्कर आहे. त्याच प्रमाणे दत्तक घेतलेला बोरखेडा गावात देखील इनरव्हील कट्टा तयार करून दोन मोठे बाकड्यांचे व्यवस्था करून इनरव्हील चौक तयार करून गावकर्यांसाठी कट्टा तयार करून आज रोजी इनरव्हील कट्ट्याच्या लोकार्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाला इनरव्हील क्लब…
भुसावळ : प्रतिनिधी कोरोनाची पहिली लाट आम्ही यशस्वीपणे थोपविण्यासाठी सहकार्य केले पण आमच्या व्यथा कोण मांडणार? अशी भावनिक साद घालत राज्यातील बी.ए.एम.एस.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्रींसह सर्व संबंधितांना खुले पत्र लिहिले होते. या पत्राची व बी.ए.एम.एस. डॉक्टरांच्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र संयोजक डॉ.अजित गोपछडे यांनी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना केला असून राज्यातील या बी.ए.एम.एस. डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेतले जावे अशी विनंती केली आहे. राज्यात बी.ए.एम.एस.पदवी धारक डॉक्टरांना जून २०१९ मधे शासनाने स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट केले…
यावल ः तालुका प्रतिनिधी १६ रोजी संध्याकाळी यावल शहरात पाऊस सदृश्य वादळ निर्माण झाले होते यानंतर संध्याकाळ१९ी:३० वाजेच्या सुमारास यावल जंगलातून बकर्या चारुन घरी येत असताना यावल शहरातील मयत व्यक्तींना ज्या ठिकाणी विसावा दिला जातो त्या ठिकाणच्या चौकात हायमस्ट लॅम्प पोल जवळून जात असताना एक राजस्थानी बोकड लाल सोनेरी ठिपके असलेला, तसेच एक गावठी पांढरी बकरी सोनेरी ठिपके असलेली दोघांची किंमत अंदाजे ३० हजार रुपये यांना हायमस्ट लॅम्प पोलचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मरण पावल्या. याबाबत राहुल माधवराव निंबाळकर वय ३२ धंदा शेती मजुरी राहणार शिवाजीनगर यावल यांनी यावल पोस्टेला खबर दिल्यावरून यावल पोस्टेला या घटनेबाबत दि.१६म२०२१ेरोजी नोंद करण्यात आली…