Author: saimat team

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील लोहारा येथील कापड दुकानदार प्रफुल्ल मांगिलाल राका (वय ५४) कुटुंबासह लोहारा येथे वास्तव्यास आहोत. त्यांची मोठी मुलीचा येवला येथील हितेश विजय श्रीश्रीमाळ याच्याशी विवाह झाला असून तिथे तिला त्रास होत असल्यामुळे ती लोहारा येथे प्रफुल्ल मांगिलाल राका यांच्या घरी राहते. ती सध्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याने पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, दिनांक १३ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या आसपास प्रफुल्ल राका हे…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चहार्डी येथील माहेर असलेली पिडीत महिला अर्चना अनिल बोडके या महिलेने न्यायालयात घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केला. हि बाब नाथजोगी समाजातील जातपंचायतीस मान्य नसल्यामुळे काही दिवसापुर्वी वडगांव, पिंजर ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथील नाथजोगी जातपंचांनी न्यायनिवाडा करतांना केळीच्या पानावर पंचांनी थुंकलेली थुंकी पिडीत महिलेने चाटायची तसेच पायावर नाक घासून तोंड काळे करायचे त्यानंतर सदर महिलेची मिरवणूक काढायची अशी शिक्षा सुनावली होती.तसेच एक लाख रुपये दंड वसूल करुन समाजातून बहिष्कृत केले. यामुळे पिडीत महिलेने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सहकार्याने चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविला. सदर घडलेल्या प्रकाराविषयी पिडीत महिलेने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जळगाव व…

Read More

मलकापूर ः प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांना व त्यांच्या नतेवाईकांना हॉटेल उद्योजकांनी भोजन देऊन सामाजिक बाधिंलकी जपली. दरम्यान ,या भोजनाचे वाटप नगराध्यक्ष अँड . हरीश रावळ यांचेहस्ते करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवावी याकरिता त्यांना मासांहारी जेवण देण्याची इच्छा तळणी -माकोडी फाट्यावरील हॉटेल उद्योजक स्वप्नील नारखेडे, मंगेश नारखेडे, यांनी नगराध्यक्ष अँड . हरीश रावळ यांचेकडे व्यक्त केली, त्या अनुषंगाने अँड. हरीश रावळ यांनी सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांना मासांहारी जेवण व इतरांना शाकाहारी जेवण तसेच त्यांच्यासमवेत असलेल्या नातेवाईकांना सुद्धा जेवण देणेबाबत संबंधितांना सांगितले. नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्या…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी जामठी रोड लगत पाझर तलावाच्या परिसरातील सर्व घातक कचरा जमा करून त्याचे योग्य विल्हेवाट लावून पाझर तलाव प्रदुषण मुक्त करावा अशी मागणी तालुका शिवसेने तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे. निवेदनात म्हट्ले आहे की, गेल्या तीन वर्षापासुन बोदवड शहरातील केरकचरा, घाण तसेच घातक केमीकलयुक्त कचरा हा जामठी रोड लगत पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात घनकचरा चे ठेकेदार यांचे कडून संकलीत करण्यात येत आहे, गेल्या दोन वर्षापासुन तलावात टाकला जाणारा घातक केरकचरा प्लॉस्टीक व इतर विघातक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासनाकडे वेळोवळी लेखी व तोंडी स्वरुपात निर्दषणास आणले…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी नगरपालिका हद्दीत पटेल कॉलनीत यावल नगरपालिकेतर्फे गटारीचे बांधकाम सुरू आहे,गटारीचे बांधकाम न करता आधी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद करून सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करावा मग नंतर गटारीचे बांधकाम करावे अशी मागणी पटेल कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. दि.११मे २०२१ रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट नंबर ३९ व ४० या गटातील पटेल कॉलनीत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम झालेले नाही परंतु सदर परिसरात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम होत आहे परंतु सदर भागात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम न करता आम्हास सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करून द्यावा जोपर्यंत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम करून मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावी तर महिलांना माहेरी जायचे वेध लागतात आणि यासाठी निमित्त असते आखाजी सणाचे. खान्देशात आखाजी धूमधडाक्यात साजरी केली जाते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट व कडक निर्बंध असल्याने मनात असूनही माहेरी जाणार्‍या महिलांना सासरीच आखाजी साजरी करावी लागणार आहे. अक्षय्य तृतीयेला खान्देशात घरोघरी पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांडं ठेवून त्यावरती खरबूज आणि दोन सांजोर्‍या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घोट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पूर्वजांचं स्मरण करून कुंकवाचा एकेक बोट उंबर्‍यावर उमटवत…

Read More

फैजपूर ता यावल : प्रतिनिधी येथील आठवडे बाजार परिसरात मौलाना अब्दुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर फैजपूर नगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या बांधकामात ठेकेदाराने आपला मनमानी सुरू करून बांधकामात चांगल्या वाळूचा वापर न करता घेसूचा वापर करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे. फैजपूर नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपयांच्या कॉंक्रीटीकरण आदी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्या निविदेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या बांधकामात नियम धाब्यावर ठेऊन ठेकेदाराने गिरणा किंवा उत्कृष्ट प्रतीच्या वाळूचा वापर न करता परिसरातील नद्या नाल्यातील माती मिश्रित वाळूचा सर्रास वापर करून कॉंक्रीटीकरण केले जात आहे. या बांधकामा ठिकाणी नगरपालिकेच्या अनेक नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तालुका व परिसरातील नागरिकांवर उपचार होत आहेत. ग्रामीण रुग्णालयात अनेक संसाधनांची कमतरता असल्याने मदतीचे हात पुढे येत आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश बतरा व त्यांच्या मातोश्री नगरसेविका पुष्पा बतरा यांनी रविवारी ४ कपाट, १२ खुर्च्या, ३ पल्स ऑक्सिमीटर भेट दिले. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. मातृदिनानिमित्त माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी हा उपक्रम राबवला. सुमारे ६२ हजार रुपयांच्या या साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण झाले. यावेळी डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी फेगडे, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. वैभव निकम, डॉ. नी. तू. पाटील, भाजप शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, अजय नागराणी, सरचिटणीस…

Read More

फैजपूर ता.यावल ः प्रतिनिधी सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघाने सामाजिक जाणिवेतून न्हावी (ता. यावल) ग्रामीण रुग्णालयाला तीस हजार रुपये किमतीचे प्लस ऑक्सिमीटर, पॅरामॉनिटर भेट दिले. ग्रामीण रुग्णालयाला पॅरामॉनिटरची आवश्यकता होती. गरज ओळखून शिक्षक संघाने रुग्णालयाला पल्स ऑक्सिमिटर भेट देण्याचा निर्णय घेतला. रुग्णांचे इसीजी, एच. आर, एस.पी.ओ २, एन.आय.बी.पी., तापमान अशा विविध बाबींचे मापन ही मशीन करते. रूग्णांचे प्राथमिक निदान करण्यासाठी ही मशीन अतिशय उपयोगी ठरणार आहे. रुग्णालयाला कोणतेही मदत लागल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्‍वासन महासंघाने दिले. सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रसन्न बोरोले, सचिव विक्रांत चौधरी व सदस्य सुरेश इंगळे, विजय कोल्हे, हरीश बोंडे, जितेंद्र फिरके, कुंदन वायकोळे,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकारने कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. याबाबत सावध रहावे व योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मेहरुण, तांबापूर, रामेश्वर कॉलनी या परिसरातकरिता महापालिकातर्फे जुने टी.बी.रुग्णालय येथे १०० बेड कोविड रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे. शहरातील मेहरुण परिसरात असलेले टी.बी.रुग्णालय बंद पडलेले रुग्णालय अतिशय मोठे असून जागा निसर्गरम्य परिसरात आहे. तसेच मेहरुण, तांबापूरा, रामेश्वर कॉलनी यांची एकूण लोकसंख्या एक लाखांच्या घरात आहे. महापालिका नियमानुसार या भागाकरिता आधीपासूनचा मनपा संचलित रुग्णालय आवश्यक आहे. कोविड रुग्णालयाचे नंतर…

Read More