रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निराधार झालेल्या २५ महिलांना कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील तहसील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार उषाराणी देवगुणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नायब तहसीलदार सी.जी. पवार, संजय गांधी निराधार योजनेचे प्रभारी नायब तहसीलदार जी.एन. शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील मराबाई तायडे, अजनाड, धृपताबाई महाजन, आटवाडा, वामन वाघ, अभोडे बुद्रुक, दुर्गाबाई धनगर, लताबाई अटकाळे, अहिरवाडी, अनिसा तडवी, केर्हाळा खुर्द, जरीनाबी शेख अकील, खानापूर, वेलाबाई बारेला, गारखेडा, रेखाबाई झाल्टे, चिनावल, सायरा तडवी, जानोरी, वंदना पाटील, थेरोळे, कुसुमबाई सवर्णे, निंभोरासीम, कविता…
Author: saimat team
मलकापुर : प्रतिनिधी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी मारक ठरणार ७ मे २१ चा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांचेकडे बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सोशल मीडिया जिल्हा समन्वयक राजेंद्र वानखेडे यांनी ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात नमूद केले आहे की, सन २००४ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ मधील (आरक्षण कायदा) कलम ५ मधील तरतूदी. नमूद केलेला महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ (आरक्षण कायदा) राज्य शासनाने २००४ मध्ये पारित केला. या कायदयातील कलम ५ मधील तरतूदी प्रमाणे मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचा-यांना पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे भरतांना सर्व संवर्गामधे सर्व टप्प्यांवर आरक्षण…
आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय. करोनामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. आशिया कप २०२१ रद्द करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतला गेलाय. या स्पर्धेत भाग घेणारे देश सध्या करोना विरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अशा अवस्थेत स्पर्धेचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते. या वर्षी आशिया कप श्रीलंकेत होणार होता. पण लंकेत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे लंकेच्या बोर्डाने हा निर्णय घेतला. आशिया कप स्पर्धत भारत आणि पाकिस्तान यांच्यात देखील मॅच होणार होती. पण पुन्हा…
उद्योग क्षेत्रातील कामगारांनाही करोनाची बाधा होत असून, त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय श्रम मंत्रालयाने भविष्यनिर्वाह निधीद्वारे देण्यात येणाऱ्या विमा योजनेच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ केली असून, सभासदाचा मृत्यू झाल्यास कमाल सात लाखांपर्यंत भरपाई मिळणार आहे. पूर्वी ही मर्यादा किमान अडीच लाख ते कमाल सहा लाखांपर्यंत होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कामगार, कर्मचाऱ्यांनाही त्याची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. कामगाराचा यामुळे मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंबच उघड्यावर येते. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी व सुधारणा अधिनियम १९५२ अंतर्गत कर्मचारी भविष्यनिधी सतत विमा योजना १९७६ कार्यान्वित आहे. कामगाराचा मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत सहा लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळत होती. मात्र, १५ फेब्रुवारीपासून या…
तौत्के चक्रीवादळामुळे(Tauktae Cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या कोकणच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र विरोधी पक्षनेत्याने कुठलाही वेळ न घालवता नुकसानग्रस्त भागाला भेटी देण्यास सुरूवातही केली आणि मुख्यमंत्री उशिरा जात असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे(Nilesh Rane)यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का? असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा…
मुंबई: प्रतिनिधी कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १,००० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला १,५०० कोटींची मदत दिली पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत. मोदी यांचे संपूर्ण देशावर…
प्रतिनिधी- जळगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी पाळधी येथील दैनिक देशदूत ची पत्रकार अलीम (संजू भैया) देशमुख नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार सचिन सोमवंशी, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन उपस्थित होते.
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी काल गुजरातचा दौरा करून तौक्ते चक्रीवादळाने(tauktae cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावर महाराष्ट्राची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांची टीका केली – या वादळाचा फटका ५ राज्यांना बसला आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातचाच दौरा केला, मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. ते केवळ गुजरातचेच मुख्यमंत्री असल्यासारखे का वागतात, इतर राज्यांची अवहेलना का करतात? या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा करुन राज्याला १ हजार कोटींची मदत जाहीर केली. देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका…
यावल : तालुका प्रतिनिधी यावल शहरात पोलीस, नगरपालिकेचा धाक आणि प्रभाव संपला.दंडात्मक कारवाई नियम मोडणार्यांना लाभदायक,यावल शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,डीवायएसपी यांचे दुर्लक्ष असे वस्तुस्थितीजन्य वृत्त फक्त आणि फक्त दैनिक साईमत मध्ये दि.१७मे रोजी प्रसिद्ध होता बरोबर यावल पोलीस आणि यावल नगरपालिका यांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली. परंतु त्या कारवाईत मोठ्या आर्थिक संपन्न दुकानदारांची दुकाने सील न करता फक्त दंडात्मक कारवाई करून एक किरकोळ सर्वसामान्य दुकानदार दंड भरू न शकल्याने त्याचे दुकान सील करण्यात आले त्यामुळे आजच्या कारवाईत भेदभाव आणि पक्षपातीपणा स्पष्टपणे उघड दिसून आला. जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी आज पासुन…
जळगाव : प्रतिनिधी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढत असताना दुसरीकडे ऐन खरिपाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. या प्रमुख बाबींच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून, सामान्य नागरिक, शेतकरी यातून होरपळून निघाला आहे. केंद्र सरकारने ही सर्व महागाई कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला. पेट्रोल शंभरीपार गेले आहे. रासायनिक खतांच्या ५० किलोच्या बॅगेमागे ७०० रुपयांपर्यंत किमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केलेल्या किमतीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने पक्ष कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी…