मुंबई : प्रतिनिधी करोनाच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) राज्यभरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. परिणामी अनेक ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषत: ग्रामीण भागात मृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं. महाराष्ट्रातील तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंचं प्रमाण दुप्पट झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांत मृत्यूची संख्या पहिल्यापेक्षा दुप्पट झाली आहे. शहरी भागात दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णसंख्या वाढूनही शहरात मृत्यूंचं प्रमाण फारसं वाढलं नाही. दुसरीकडे,…
Author: saimat team
मुंबई : प्रतिनिधी मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळीपुरतं मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या पुन्हा बाहेर आल्या आहेत, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली. एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हते, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत असे म्हणत होते की, धनंजय निवडून येणार नाही,…
यूएफओवर(UFO) चित्रपट बनवणाऱ्या एका चित्रपट निर्मात्याने रडार फुटेज दाखविणारी एक व्हिडिओ क्लिप(Video clip) सामायिक केली असून दावा केला की सुमारे दोन वर्षांपूर्वी सॅन डिएगोच्या (San Diego) किनाऱ्यावरील अमेरिकेच्या नौदलाच्या (US Navy) जहाजावर कमीतकमी १४ यूएफओ दाखविण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये यूएसएस रसेलवर फिरत असलेल्या तीन यूएफओ दर्शविणार्या एका व्हिडिओची या वर्षाच्या सुरुवातीस नौदलाने पुष्टी केली आहे, हे उल्लेखनीय. अमेरिकेचे माजी नेव्ही लेफ्टनंट रायन ग्रेव्ह्स यांनी हा यूएफओना एक अज्ञात मिशनचा भाग असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचेही ते म्हणालेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, त्यांनी २०१५ ते २०१७ दरम्यान अनेकवेळा यूएफओसारख्या वस्तू आकाशात उडताना बघितल्या आहेत.…
पुणेः करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील बाणेर कोविड सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याआधीही राज्यातील काही कोविड सेंटरमध्ये असे प्रकार घडले होते. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्ण व मृत्यू झालेल्या रूग्णांच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:शुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. शारदा अंबिलढगे आणि अनिल तुकाराम संगमे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये हे दोन कर्मचारी कामाला होते. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलेले रुग्ण व करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने हे दोन कर्मचाऱ्यांनी सापळा…
औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या देवस्थानाचा कायापालट करण्याचे आश्वासन सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिले होते. दिलेला शब्द खरा करत सत्तार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवली आहे. मागच्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ ब ‘ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश करून घेतल्यानंतर या क्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळवण्याचा सत्तार सतत प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याने सत्तारांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे. श्री सिद्धेश्वर…
करोनाच्या संसर्गामुळे सर्वच जण आरोग्याची काळजी घेत असताना दुधामध्ये भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. अंधेरी येथील एका चाळीमध्ये छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे तीनशे लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये हे दोघे पाणी आणि सुमार दर्जाची भुकटी मिसळून त्याची विक्री करीत होते. अंधेरी चार बंगला परिसरात पहाटेच्या वेळी दूध वितरण करण्यापूर्वी त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १०चे सहायक पोलिस निरीक्षक धनराज चौधरी यांना मिळाली. या परिसरातून दूध भेसळीच्या अनेक तक्रारी देखील पुढे आल्या. या…
डोंबिवली (ठाणे) : प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या वसुलीला भाजपने जोरदार विरोध केला असून, भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावत थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच लक्ष्य केले आहे. तसेच त्यांनी केडीएमसी प्रशासनावर देखील टीका केली आहे. “कचरा कर लादणाऱ्या केडीएमसीचा निषेध”, अशा शब्दात भाजपने शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कराच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता हा वाद आता आणखीनच…
मुंबई : प्रतिनिधी सरोचह न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटला आहे . या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही ते भेट घेणार आहेत. गुरुवारी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. मराठा समाज सध्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. मराठा समाजाच्या मनात असलेला असंतोष व्यक्त करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसाचा फटका अनेक गावांना बसला. यात अंतुर्ली मंडळातील उचंदा, शेमळदेसह अनेक गावातील परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधून दिली तसेच याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचीही मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. झालेल्या नुकसानीची शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…
मुंबई : प्रतिनिधी महिन्याभराच्या आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात केली आहे. आजारपणानंतर ते आता ॲक्शन मोडवर आले आहेत. तसेच १ जूनपासून ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार आहेत. १ जून रोजी शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार आहेत. यामुळे आता त्यांनी पुन्हा बैठकांच्या फैरी सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे. १ जून रोजी शरद पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार असून, राजकीय परिस्थितीवर चर्चाही करणार आहेत. इतकंच नाहीतर शरद पवार हे राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत काय सूचना देतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असून यानंतर…