केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात (Farmers Agriculture Act)सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल २६ मे रोजी(26 may) सहा महिने झालेत. यानिमित्त शेतकऱ्यांनी ‘काळा दिवस’ पळून काल दिल्लीत मोठे आंदोलन केले. याबाबत सामनातून शिवसेनेने(Shivsena) केंद्रातील मोदी सरकारवर(Modi Govt) टीका केली. केंद्राने आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला. या संदर्भात, इंग्रजांच्या काळात १९०७ च्या २६ मे रोजी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा हवाला दिला आणि सरकारने यावर तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन पुन्हा भडकेल, असा इशारा दिला. अग्रलेखात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी बुधवारी ‘काळा दिवस’(Black Day) पाळला. आणि या कायद्यांविरोधातील आपली जिद्द व ताकद जराही कमी झालेली नाही हेच दाखवून…
Author: saimat team
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अखेर पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे ( Anna Bansode) यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरीतील पावसमधून सिद्धार्थ बनसोडे(Siddharth Bansode) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तानाजी पवार (Tanaji Pawar) यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या विलंबामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट…
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही मुंबईसारख्या महानगरात मात्र दिवसागणिक रुग्णसंख्या कमी होत आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळं संसर्ग कमी झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा महापालिकेच्या या कामाचं कौतुक केलं आहे. ((Bombay High Court Praises BMC For its work against Coronavirus) राज्यातील करोनाची स्थिती व त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात करण्यात आलेल्या विविध जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं बीएमसीच्या करोनाच्या संदर्भातील कामाचा गौरव केला. ‘मुंबई महापालिकेकडून करोनाविषयक सर्व नियोजन चांगल्या पद्धतीनं होत आहे. मुंबई महापालिकेच्या मॉडेलचे इतर महापालिकांनीही अनुकरण करावं आणि त्याविषयी मुंबई महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन राज्यातील इतर महापालिका आयुक्तांसोबत व्हीसीद्वारे बैठक घ्यावी,…
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे (BJP) खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली. तसेच ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती संभाजी राजेंनी माध्यमांना दिली. मात्र या भेटीतून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या १० मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा प्रश्नही विनायक मेटे यांनी उपस्थित केला.…
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (AICTE) ने महाविद्यालयांना आठ भाषांमध्ये अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग)चे शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, तेलुगू, तमीळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या आठ स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तसंच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत इंग्रजीच्या भीतीने अनेक हुशार विद्यार्थी अभियांत्रिकीपासून दूर राहिले आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन व अन्य देशांमध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण त्यांच्या स्थानिक शिक्षण दिले जाते, हे उल्लेखनीय. अभातंपचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण घेता आले तर त्यांचा पाया मजबूत व्हायला मदत होईल. आम्हाला पूर्ण देशामधून एकूण…
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) २०१५ मध्ये म्हणाले की, माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव (Petrol prize hike) कमी झाले असते, तर चांगले झाले असते. परंतु, २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मात्र, आता हे नशीब कोणाचे आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. जगात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगावे, अशी मागणी नवाब मलिकांनी यापूर्वी केली होती. मात्र, मोदींनी या प्रश्नाचे उत्तर न देता उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहे. याच दरवाढीवरून मलिकांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची…
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 13 तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी…
जळगाव : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सूक्ष्म दृष्टीने बुद्ध स्विकारला, बुद्ध आकाराने, बाह्य सौंदर्याने सुंदर नाही तर अंतरिक सौंदर्याने सुंदर आहे. बुद्ध विचारांचे सौंदर्य आणि सुगंध अप्रतिम आहे. असे प्रतिपादन भन्ते विनय बोधीप्रिय यांनी केले. फुलेशाहू-आंबेडकर विचारमंच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अजिंठा हौसिंग सोसायटी व फुलेशाहू-आंबेडकर उत्सव समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विचार मांडतांना भन्ते विनय बोधीप्रिय बोलत होते. भन्ते विनय बोधीप्रिय म्हणाले की, भगवान तथागताने अंतरिक सौंदर्य वाढविण्यास सांगितले आपण मात्र बाह्य सौंदर्य वाढविण्यावर भर देतो. हे बाह्य सौंदर्य नष्ट होणारे असते. धम्माचे भारतातील विद्यमान अस्तित्व विशद…
जळगाव ः प्रतिनिधी कोरानाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप लक्षात घेता लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत अडीच महिन्यापूर्वी कोविड केअर सेंटर सुरू केले. यात आतापर्यंत ९२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना कडुनिंबाचे रोपटे देऊन निरोप देण्यात येत आहे. कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासनासोबतच रुग्णालये, कोविड सेंटर, सेवाभावी संस्था डॉक्टर, परिचारिका, कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न व नागरिकांच्या सहकार्याला यश येत आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील ‘शासकीय तंत्रनिकेतन’च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण…
जामनेर : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गाने आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थी यावेळी संगणक शिक्षणाचे एमएससीआयटी चे प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकले नाही व शिक्षणच बंद असल्याने शिक्षण घेऊ ही शकले नाही. हे प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. त्यातच ज्या सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यांचीही संधी हुकली आहे. वास्तविक फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून हे शिक्षण घेणे शक्य असतानाही वर्षभरातील शिक्षणाची मात्र हानी झाल्याने युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एमकेसीएल मार्फत एमएससीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले…